अँड्रॉइड युजर्सना मिळणार गुगलच्या Gemini AI ची मोफत सुविधा (फोटो सौजन्य -pinterest)
अँड्रॉइड युजर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. Google लवकरच अँड्रॉइड युजर्ससाठी एक नविन फिचर लाँच करण्याच्या तयारीत आहे. Google चे AI आधारित Gemini AI लवकरच अँड्रॉइड युजर्सच्या Gmail अकाऊंटसाठी लाँच केलं जाणार आहे. AI gemini मुळे आपली अनेक कामं सोपी होणार आहेत. मेल करणे किंवा समोरून आलेल्या मेलला रिप्लाय देणं, ही सर्व काम आता युजर्स अगदी सहज करू शकणार आहेत. काही अँड्रॉइड युजर्सच्या Gmail अकाऊंटमध्ये Gemini AI फीचर दिसण्यास सुरुवात झाली आहे. उर्वरित युजर्सच्या Gmail अकाऊंटमध्ये देखील लवकरच हे फीचर दिसण्यास सुरुवात होईल.
हेदेखील वाचा- Microsoft साठी ग्लोबल आउटेजमधून सावरणं झालं कठीण; कंपनीने डेल्टावर केले आरोप
ज्या युजर्सना वर्कस्पेसचा प्रीमियम ॲक्सेस नाही त्यांच्यासाठी अँड्रॉइडवर चालणाऱ्या सर्व Gmail अकाउंट्समध्ये Gemini AI फीचर दिसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता युजर्सना मेल करणं अधिक सोप होणार आहे. युजर्स Gemini AI साइडफोन फीचर विनामूल्य वापरण्यास सक्षम असतील. आता या नवीन फीचरच्या मदतीने यूजर्सना Gmail वर ईमेलचे उत्तर देण्यासाठी अनेक पर्याय मिळतील. हे फीचर पूर्णपणे वर्कस्पेस ॲप्ससारखेच आहे.
हेदेखील वाचा-WhatsApp DP सोबत दिसणाऱ्या QR Code चं नक्की काम काय? जाणून घ्या सविस्तर
युजर्सना एखाद्या मेलला उत्तर द्यायचे असल्यास Google AI च्या मदतीने ईमेल स्कॅन करून तुम्हाला त्यांची अनेक उत्तरे सादर केली जातील. आपल्याला एखादा मेल आला की त्याला नक्की काय उत्तर द्यायचं, यासाठी आपण नेहमी गोंधळलेले असतो. मात्र आता असं होणार नाही. इतर कामांप्रमाणेच AI आता आपल्याला मेलमध्ये उत्तर देण्यासाठी देखील मदत करणार आहे. गुगलच्या AI पॉवर्ड Gemini च्या नवीन फिचरमुळे लोकांसाठी मेलचा वापर करणं अधिक सोपे होणार आहे. यासह, आता तुम्हाला जीमेल ॲपमध्ये चॅटसाठी विविध प्रॉम्प्ट्सचा पर्याय मिळेल. याशिवाय या नवीन फीचरच्या मदतीने यूजर्स अनेक प्रश्नही विचारू शकतील. हे फीचर सुरू केल्याने तुमची लांबलचक ईमेलच्या त्रासातूनही सुटका होईल.
गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे की, जेमिनी Gmail मध्ये अनेक प्रकारची कामे करण्यास सक्षम असेल. या वैशिष्ट्याची ओळख करून दिल्याने, आता ईमेल थ्रेड्सचा सारांश देणं सोपं होईल. मिथुन AI ईमेल थ्रेडला उत्तर देण्यासाठी अनेक पर्याय देखील असतील. तसेच या नवीन फीचरच्या मदतीने ईमेल ड्राफ्ट करणं सोपं होणार आहे. युजर्स Gemini AI साइडफोन फीचर विनामूल्य वापरण्यास सक्षम असतील.
Gmail मधील Google चे Gemini AI चॅटबोट यापूर्वी केवळ पेड यूजर्ससाठी उपलब्ध होते. मात्र आता Google सर्व Gmail वापरकर्त्यांसाठी Gemini AI चॅटबोट मोफत उपलब्ध करून देत आहे. Google चे Gemini AI चॅटबोट Gmail युजर्ससाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. एखाद्याचा Mail आल्यास त्याला काय उत्तर द्यायचे याचा विचार करण्यात बराच वेळ वाया जातो. आपल्याला एखाद्या Mail ला उत्तर द्यायचे असल्यास आपण Google वरून त्यासंबंधित माहिती घेतो. या सगळ्यामध्ये खूप वेळ वाया जातो. पण आता Gemini AI च्या मदतीने ही सगळी कामे काही क्षणात शक्य होणार आहेत.