Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google ची एक चूक युजर्सना पडली महागात; 1.5 करोड लोकांचे पासवर्ड धोक्यात

Google युजर्सच्या पासनर्डना धोका निर्माण झाल्याची बातमी समोर आली आहे. Google Chrome मधील बगमुळे 1.5 कोटी विंडोज यूजर्सचे पासवर्ड गायब झाल्याचं समोर आलं आहे. Google Chrome च्या उत्पादनातील बदलामुळे गुगल पासवर्ड मॅनेजरवर परिणाम झाला आहे. बगमुळे 1.5 कोटी विंडोज यूजर्सचे पासवर्ड धोक्यात आले होते.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 30, 2024 | 01:15 PM
फोटो सौजन्य- istock

फोटो सौजन्य- istock

Follow Us
Close
Follow Us:

काही दिवसांपूर्वीच संपूर्ण जगाने Microsoft CrowdStrike अटॅकचा सामना केला होता. CrowdStrike मुळे संपूर्ण जगावर मोठा परिणाम झाला होता. जगभरातील Microsoft युजर्सची कामं ठप्प झाली होती. एवढेच नाही तर दवाखाने, रुग्णालय, विमानतळं, अशा ठिकाणी Microsoft डाऊनचा परिणाम पाहायला मिळाला. या दिवशी तब्बल 200 उड्डाणे रद्द करण्यात आली होती. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. जग अद्याप Microsoft डाऊनच्या नुकसानीतून सावरले देखील नव्हते, अशातच आता Google युजर्सच्या पासनर्डना धोका निर्माण झाल्याची बातमी समोर आली आहे. Google Chrome मधील बगमुळे 1.5 कोटी विंडोज यूजर्सचे पासवर्ड गायब झाल्याचं समोर आलं आहे.

हेदेखील वाचा- Featurephones vs Smartphones: ग्राहकांची स्मार्टफोनऐवजी फीचर फोनला पसंती! काय आहे कारण जाणून घ्या

पासवर्ड सेव्ह आणि ऑटोफिल करण्यासाठी युजर्स Google पासवर्ड मॅनेजर वापरतात. आपण आपल्या अनेक अकाऊंट्सचे पासवर्ड Google Chrome च्या पासवर्ड मॅनेजरमध्ये सेव्ह करून ठेवतो. आपल्याला आपलं अकाऊंट कोणत्याही दुसऱ्या डिव्हाइसवर लॉगइन करताना पासवर्ड आठवत नाही. अशावेळी पासवर्ड मॅनेजर कामी येतो. पासवर्ड मॅनेजरमध्ये सेव्ह करून ठेवलेले पासवर्ड आपल्याला कधीही उपयोगी पडतात. अनेकदा तर आपण सेव्ह केलेला पासवर्ड ऑटोफील केला जातो. त्यामुळे आपल्याला पासवर्ड लक्षात ठेवण्याची देखील गरज भासत नाही. पण पासवर्ड मॅनेजरच आपला पासवर्ड विसरला तर काय होईल? Google Chrome मधील बगमुळे 1.5 कोटी विंडोज यूजर्सचे पासवर्ड गायब झाले आहेत.

हेदेखील वाचा- वेबसाईटवरील जाहिरातींनी हैराण झालात? Google Chrome वर आत्ताच करा ‘ही’ सेटिंग

या बगमुळे मेडिकलपासून एअरलाइन्स आणि बँकांपर्यंत सर्व गोष्टींवर परिणाम झाला आहे. हा बग Google Chrome च्या M127 आवृत्तीमध्ये होता जो Windows साठी आहे. त्यामुळे मॅक वापरकर्त्यांना या बगचा फटका बसला नाही. फोर्ब्सच्या अहवालानुसार, Google Chrome च्या उत्पादनातील बदलामुळे गुगल पासवर्ड मॅनेजरवर परिणाम झाला आहे. बगमुळे 1.5 कोटी विंडोज यूजर्सचे पासवर्ड धोक्यात आले होते. बगमुळे, लोक त्यांचे सेव्ह केलेले पासवर्ड देखील वापरू शकत नव्हते आणि काही लोकांना त्यांचे पासवर्ड देखील पाहता आले नाहीत. मात्र, Google ने ही समस्या केवळ १८ तासांत सोडवली. समस्येचे निराकरण केल्यानंतर, Google ने युजर्सना ब्राउझर रीस्टार्ट करण्यास सांगितलं. ज्यामुळे युजर्सची ही समस्या सुटली आणि त्यांना पुन्हा पासवर्ड मॅनेजरमध्ये सेव्ह केलेले पासवर्ड दिसू लागले.

या संपूर्ण घटनेनंतर कंपनीने युजर्सची माफी देखील मागितली आणि लगेचच नवीन अपडेट जारी केलं. याबाबत Google ने सांगितलं की, युजर्सला झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत. Google Chrome च्या उत्पादनातील बदलामुळे गुगल पासवर्ड मॅनेजरवर परिणाम झाला आणि त्यामुळे युजर्सना समस्येचा सामना करावा लागला. अशा परिस्थितीत ऑनलाइन पासवर्ड मॅनेजरवर अवलंबून राहणाऱ्या युजर्ससाठी मोठी समस्या निर्माण झाली. बहुतेक युजर्स ऑनलाइन पासवर्ड आणि ऑटोफिलवर अवलंबून असतात, ज्यामुळे ते पासवर्ड देखील लक्षात ठेवू शकत नाहीत. अशा परिस्थितीत ऑनलाइन पासवर्ड मॅनेजरवर अवलंबून राहणे अनेक प्रश्न निर्माण करत आहे.

Web Title: Google news one and half crore users password is at risk due to google one mistake

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2024 | 01:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.