पुन्हा एकदा Google Pixel 6a चा ब्लास्ट, युजरलाही झाली दुखापत! पावसाळ्यात फोन चार्ज करताना करू नका 'ही' चूक
फोन चार्जिंग लावल्यानंतर ब्लास्ट होण्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. या घटनांमध्ये काही वेळा फोनचे नुकसान होते तर काही वेळा युजर्सला देखील जखमा होतात. आता देखील फोनमध्ये ब्लास्ट होण्याची अशीच एक घटना समोर आली आहे. यावेळी गुगल पिक्सल फोनमध्ये ब्लास्ट झाला आहे. तसेच फोनच्या युजरला देखील जखमा झाल्या आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, Google Pixel 6a फोन मध्ये ब्लास्ट झाला. गुगलच्या या फोनमध्ये आग लागल्याने युजरला देखील काही जखमा झाल्या आहेत. माइक्रोब्लॉगिंग प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात आलेल्या माहितीनुसार चार्जिंगदरम्यान फोनमध्ये आग लागली. या घटनेचे काही फोटो देखील शेअर करण्यात आले आहे. फोटोमध्ये दिसत आहे की फोनच्या बॅटरीवर ब्लास्टचे निशाण आहे. अचानक आग लागल्यामुळे फोनचा बॅक पॅनल पूर्णपणे जळाला आहे आणि फ्रंट पॅनल देखील बाहेर निघाला आहे. (फोटो सौजन्य – X)
यूजरने गूगलच्या फोनमध्ये आग लागल्याच्या घटनेबद्दल माहिती देताना सांगितलं की, त्याने त्याच्या बेडच्या बाजूला फोन चार्जिंगला लावला होता. युजर फोनपासून 40 सेंटीमीटर दूर होता. यानंतर काही वेळातच फोनमध्ये आग लागली. मोठा धमाका झाला आणि यूजरच्या डोक्याला मार लागला. एवढेच नाही तर फोनमध्ये आग लागल्यानंतर बेडवरील चादर देखील जळाली. त्यानंतर युजरने लगेचच फोन चार्जिंग वरून काढला फोन आणि चादरीला आग लागल्यामुळे संपूर्ण घरात धूर पसरला होता.
Pixel 6a caught fire.
From the owner, he was sleeping when he got up by the horrible smell of battery. And a loud sound next to his nightstand. Only to find out that his Pixel 6a was absolutly cooked.
From what he said he hasn’t gotten a response from google or any follow up. pic.twitter.com/5Ppm5HQZ8X
— Lenisita (@TechWithLeni) July 28, 2025
या घटनेनंतर यूजरने गूगलच्या कस्टमर सपोर्टला ई-मेल केला आणि संपूर्ण घटनेची सविस्तर माहिती दिली. या ईमेलनंतर गुगलने युजरला काय प्रतिक्रिया दिली, याबद्दल अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. असं सांगितलं जात आहे की पावसाळ्यात फोन चार्जिंगला लावताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आणि काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. कारण ओलाव्यामुळे फोन ब्लास्ट होण्याच्या घटना सर्रास घडत असतात. ओलाव्यामुळे आणि दमट वातावरणामुळे फोनमध्ये शॉर्ट सर्किट होण्याची देखील शक्यता असते.
Google Pixel 6a ची किंमती किती आहे?
41,219 रुपये
स्मार्टफोन चार्जिंगचा नियम काय आहे?
फोनची चार्जिंग 20 टक्क्यांपेक्षा कमी आणि 80 टक्क्यांपेक्षा जास्त असू नये
Google Pixel 6a मधील बॅटरी स्पेस्पिफिकेशन्स काय आहेत?
फोनमध्ये Li-Po 4410 mAh बॅटरी आहे, जी 18W वायर्ड चार्जिंगला सपोर्ट करते.