Tech Tips: ChatGPT एकाच झटक्यात लिहिणार परफेक्ट कंटेंट, अशी द्या कमांड आणि तुमच्या प्रश्नाचं मिळणार योग्य उत्तर
AI म्हणजे सध्याच्या काळात आपला साथीदार बनला आहे. आपल्या अनेक प्रश्नांची उत्तर देण्यासाठी AI आपल्याला मदत करते. सध्याच्या काळात सर्वाधिक वापरलं जाणारं AI टूल म्हणजेच ChatGPT. शाळेच्या असाईंमेंटपासून ऑफिसच्या कामांपर्यंत AI चॅटबोट ChatGPT आपल्याला सर्व कामात मदत करतो.
कंटेंट राइटिंग, सोशल मीडिया पोस्ट, ब्लॉग्स, रिसर्चपासून स्कूल असाइनमेंट करण्यापर्यंत ChatGPT आपल्याला मदत करते. पण अनेकदा आपण विचारलेल्या प्रश्नांची ChatGPT कडून वेगळीच उत्तरं मिळतात. अशावेळी AI ला योग्य कमांड देणं गरजेचं असते. परंतु बहुतेक लोकांना हे समजत नाही की ChatGPT कडून योग्य उत्तर मिळविण्यासाठी, एक विशेष पद्धत अवलंबणे आवश्यक आहे. जर प्रश्न अस्पष्ट किंवा अपूर्ण असेल तर उत्तर देखील तसंच असेल. आता, आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगत आहोत, ज्याद्वारे तुम्ही ChatGPT कडून इच्छित कंटेंट मिळवू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
ChatGPT तुम्हाला योग्य आणि सोपं उत्तर तेव्हाच देईल जेव्हा तुम्ही सरळ, स्पष्ट आणि पूर्ण वाक्यात प्रश्न विचाराल. उदाहरणार्थ, ब्लॉग लिहा बोलण्यापेक्षा 500 शब्दांत एक सोपा मराठी ब्लॉग बनवं, ज्याचा विषय ऑनलाईन पैसे कसे कमवावे असा असेल. तुमचा प्रश्न जेवढा सोप्या शब्दात असेल तेवढच उत्तर देखील सोप आणि सरळ असेल
जर तुमची इच्छा असेल की कंटेंट फॉर्मल, फ्रेंडली, इमोशनल आणि मोटिवेशनल असावा, तर तुम्ही याबाबत ChatGPT ला आधीच माहिती द्या. जस की तुम्ही ChatGPT ला सुरुवातीला सांगू शकता की,”एक फ्रेंडली टोनमध्ये आर्टिकल लिही, जे विद्यार्थी अगदी सहज समजू शकतात किंवा एक असं आर्टिकल लिही जे वाचताना सस्पेंस आणि थ्रिलचा अनुभव येईल.
जर तुम्हाला मोजक्या शब्दांत किंवा जास्त शब्दात कंटेंट लिहून पाहिजे असेल तर त्याबाबत ChatGPT ला माहिती द्या आणि शब्दांची लिमिट स्पष्ट करा. जसं की”100 शब्दांत शॉर्ट एक्सप्लनेशन द्या” किंवा “1000 शब्दांत सविस्तर माहिती द्या”
वेबसाइट किंवा ब्लॉगसाठी कंटेंट लिहित असाल, तर कीवर्ड, SEO टाइटल आणि मेटा डिस्क्रिप्शनची डिमांड देखील कमांडमध्ये सांगा. यामुळे कंटेंट सर्च इंजिनमध्ये जास्त चांगला रँक करेल.
पहिले उत्तर अंतिम नसेल तर ChatGPT ला उत्तर सोपे करण्यास, ते लहान परिच्छेदांमध्ये ठेवण्यास, उदाहरणे जोडण्यास किंवा शीर्षकासह देण्यास सांगू शकता. ChatGPT तुम्ही दिलेल्या सूचनांनुसार पुन्हा चांगली उत्तरे देईल.
Google वर लीक झाले ChatGPT युजर्सचे पर्सनल चॅट! तुमच्या संभाषणाचाही समावेश आहे का? असं करा चेक
तुम्ही जितकी स्पेसिफिक आणि क्रिएटिव कमांड द्याल, ChatGPT तुम्हाला तेवढंच यूनिक आणि स्पष्ट कंटेंट देईल. उदाहरणार्थ – एक भावनिक कथा लिहा ज्यामध्ये एक गरीब मुलगा कठोर परिश्रम करून यश मिळवतो.
योग्य उत्तरासाठी ChatGPT ला फीडबॅक देऊ शकता का?
हो
ChatGPT ला योग्य कंटेटसाठी कशी कमांड द्यावी?
क्रिएटिव आणि स्पेसिफिक