गुगलचा नवा AI असिस्टेंट प्रोजेक्ट कंप्यूटरवर मिळवणार नियंत्रण, खरचं फायदेशीर ठरणार का? जाणून घ्या
गूगल एका नवीन AI एजंट प्रोजेक्टवर काम करत आहे. हा AI एजंट तुमच्या कंप्यूटरवर अगदी सहजपणे नियंत्रण मिळवू शकतो. या AI एजंटला, प्रोजेक्ट JARVIS असं नाव देण्यात आलं आहे. आयर्न मॅन चित्रपटातील JARVIS व्हॉईस असिस्टंटचा संदर्भ देत हे नाव देण्यात आल्याचं म्हटलं जात आहे. सर्च रिझल्ट गोळा करण्यासाठी, प्रोडक्ट्सबद्दल माहिती देण्यासाठी आणि अधिक कार्ये करण्यासाठी या AI एजंटला विशेष प्रशिक्षित केले गेले आहे. या AI एजंटच्या मदतीने फ्लाइट बुकींग करणं अधिक सोपं होणार आहे.
हेदेखील वाचा- सॅमसंगचे दोन नवीन फोल्डेबल फोन लाँच, प्रीमियम डिझाइन आणि मजबूत वैशिष्ट्यांसह सुसज्ज
अहवालानुसार, प्रोजेक्ट जार्विस हे ग्राहक-केंद्रित वैशिष्ट्य असेल जे गुगल क्रोममध्ये कार्य करेल आणि रोजच्या वेब-आधारित सर्चवर ऑटोमॅटिक कार्य करेल. अहवालात म्हटले आहे की गूगल डिसेंबरच्या सुरुवातीस AI एजंटचे प्रिव्ह्यु करण्याची तसेच त्याच्या पुढील फ्लॅगशिप जेमिनी AI मॉडेलचे प्रिव्ह्यु करण्याची योजना आखत आहे. पुढील फ्लॅगशिप जेमिनी AI मॉडेल जेमिनी 2.0 म्हणून ओळखले जाते. प्रिव्ह्युनंतर, जार्विसला काही निवडक युजर्ससाठी उपलब्ध करून दिलं जाणार आहे. त्यानंतर चाचणी यशस्वी झाल्यानंतर त्याला सगळ्यांसाठी लाँच करण्यात येईल.
अहवालानुसार, जार्विस युजर्सच्या स्क्रीनचे “सतत स्क्रीनशॉट” घेऊन आणि बटणावर क्लिक करणे किंवा मजकूर फील्डमध्ये टाइप करणे यासारख्या क्रियांचा अर्थ लावेल, त्यानुसार कार्य करण्यास सुरुवात करेल. कारण कोणतीही कारवाई करण्यापूर्वी काही सेकंद विचार करणे आवश्यक आहे.
जार्विस हे भविष्यातील तंत्रज्ञान असल्याचे दिसते आहे ज्याची सर्वचजण वाट पाहत होतो. जार्विस डिव्हाइसेसवर कार्य करेल की क्लाउडमध्ये कार्य करेल याबाबत अद्याप कंपनीने स्पष्टिकरण दिलं नाही. तसेच, जार्विस वेबवर फक्त गूगल क्रोमसोबत काम करेल की मोबाईलवर गूगल क्रोम ॲपसह काम करेल हे देखील अस्पष्ट आहे.
हेदेखील वाचा- Google Map Update: गुगल मॅपवरून सुध्दा शेअर करू शकता तुमचं लाईव्ह लोकेशन, जाणून घ्या प्रोसेस
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी या वर्षाच्या सुरुवातीला एका संभाषणात AI एजंट्सची प्रशंसा केली होती. ते म्हणाले की, “मी AI एजंट्सना बुद्धीमान प्रणाली म्हणून पाहतो जे तर्क, नियोजन आणि स्मरणशक्ती दर्शवते. ते अनेक पावले पुढे विचार करू शकतात, सॉफ्टवेअर आणि सिस्टममध्ये काम करू शकतात आणि तुमच्या वतीने आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या देखरेखीखाली हे सर्व काही करू शकतात.
ओपनएआय डिसेंबरमध्ये त्याचे फ्लॅगशिप AI मॉडेल लाँच करण्याची योजना आखत असल्याच्या वृत्तानंतर, आता गूगल त्याच महिन्यात जेमिनीचे नवीनतम वर्जन लाँच करण्याची योजना आखत आहे. अहवालानुसार, गूगल डिसेंबरमध्ये जेमिनी 2.0 मॉडेल्स रिलीज करण्याची योजना आखत आहे. नवीन मॉडेल Google DeepMind चे मुख्य कार्यकारी अधिकारी डेमिस हसाबिस यांना अपेक्षित असलेले कार्यप्रदर्शन बेनिफिट्स दर्शवत नाही. मात्र अहवाल सूचित करतात की मोठ्या मॉडेल्स विकसित करणाऱ्या कंपन्यांमध्ये हा एक ट्रेंड आहे.