
Independence Day 2026: Googleच्या खास डूडलने वेधलं लक्ष; पारंपरिक कपड्यांच्या डिझाइनमध्ये काय आहे खास? जाणून घ्या
खरं तर, गूगल प्रत्येक सण आणि विशेष प्रसंगी एक खास डूडल सादर करत असते. प्रत्येक डूडलची एक वेगळी विशेषता असते. आता देखील गूगलने स्वातंत्र्यता दिनानिमित्त एक विशेष डूडल सादर केले आहे. डूडलमध्ये गूगलने त्यांच्या लोगोमधील अक्षरं भारताच्या संस्कृतीसोबत जोडण्याचा प्रयत्न केला आहे. या डूडलचा प्रत्येक भाग भारताच्या लोकसंस्कृतीशी संबंधित वस्त्रप्रकारांचा वापर करून साकारला आहे; हे देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि ‘विविधतेतील एकता’ यांचे प्रतिबिंब दर्शवते. (फोटो सौजन्य – Google)
गूगलने भारताच्या स्वातंत्र्यता दिनानिमित्त एक खास डूडल शेअर केले आहे. या डूडलमध्ये कंपनीने भारताच्या पारंपरिक वस्त्रांच्या माध्यमातून ‘विविधतेतील एकता’ हा संदेश दिला आहे. हे डूडल तयार करण्यासाठी कंपनीने भारताच्या वेगवेगळ्या राज्यांमधील स्थानिक कापड-विणकामाच्या नमुन्यांचा वापर केला आहे. इतकंच नाही तर गुगलच्या लोगोवर हातमागावरील डिझाइन देखील कोरण्यात आले आहे. यामुळे सध्याचे गूगल डूडल अतिशय आकर्षक दिसत आहे. अनेक यूजर्सनी या डूडलचे कौतुक देखील केले आहे.
सादर करण्यात आलेल्या या डूडलमध्ये समाविष्ट असलेले खास रंग आणि नक्षीकाम असलेले पारंपरिक कपडे भारत देशाचा समृद्ध सांस्कृतिक वारसा दर्शवतात. गूगल प्रत्येक सण, विशेष प्रसंग, सांस्कृतिक आयोजन, विशेष कामगिरीचा गौरव करण्यासाठी खास डूडल्स तयार करते. गूगलने आतापर्यंत 5000 हून अधिक डूडल बनवले आहेत. गूगलचे प्रत्येक डूडल अतिशय खास आणि आकर्षक असते.