Vivo चा अचानक नवा फोन बाजारात दाखल! 6500mAh बॅटरीपासून 100x झूमपर्यंत मिळणार खास फीचर्स, जाणून घ्या किंमत
कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 12GB+256GB आणि 12GB+512GB या दोन रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. डिव्हाईसच्या 12GB+256GB व्हेरिअंटची किंमत 3,299 युआन म्हणजेच सुमारे 47 हजार रुपये आणि 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत 3,599 युआन म्हणजेच सुमारे 51 हजार रुपये आहे. ग्राहक हा स्मार्टफोन स्पेस ब्लॅक, इंस्पिरेशन पर्पल, कन्फेशन व्हाइट आणि सेरीन ब्लू रंगांच्या पर्यायांत खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: Pinterest)
विवोने त्यांच्या या नवीन डिव्हाईसमध्ये 6.59-इंच अमोलेड डिस्प्ले दिला आहे. यासोबतच या फोनमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट आणि 2000Hz पर्यंत इंस्टँटेनियस टच सँपलिंग रेट मिळणार आहे. फोनला पावर देण्यासाठी या डिव्हाईसमध्ये स्नॅपड्रॅगन 8s जेन 3 चिपसेट देण्यात आला आहे. यासोबतच कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन 8s जेन 3 चिपसेट देण्यात आला आहे. या नव्या फोनमध्ये 12GB रॅम आणि 512GB पर्यंत स्टोरेज देण्यात आले आहे.
कंपनीच्या या नव्या डिव्हाईसमध्ये 90W वायर्ड चार्जिंग सपोर्टसह 6,500mAh बॅटरी देण्यात आली आहे. तथापी, कंपनीचे हे डिव्हाईस वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करत नाही. मात्र यूएसबी टाईप-सीद्वारे रिवर्स चार्जिंग सपोर्ट मिळणार आहे. फोनमध्ये अँड्रॉईड 16 वर आधारित ओरिजीनओएस 6 मिळणार आहे. फोनमध्ये अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट रिकग्निशन आणि फेस अनलॉकची सुविधा देखील मिळणार आहे.
फोटोग्राफी लवर्ससाठी या फोनमध्ये ऑटोफोकससह 50-मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. तर डिव्हाईसच्या रिअर कॅमेरा सेटअपमध्ये ओआयएससह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रा-वाइड लेंस आणि ओआयएससह 50-मेगापिक्सेलचा पेरिस्कोप टेलीफोटो कॅमेरा देखील मिळणार आहे. डिव्हाईसमध्ये टेलिफोटो कॅमेराद्वारे 100x पर्यंत डिजिटल झूम सपोर्ट देखील मिळणार आहे.



