अखेर भारतात सुरू झालं ऑफिशियल Google Store, ऑफर्स आणि डिस्काउंटसह आता खरेदी करा Pixel डिव्हाईस
ऑफिशियल Google Store अखेर भारतात लाईव्ह झालं आहे. या गुगल स्टोअरचा ग्राहकांना बराच फायदा होणार आहे. कारण आता ग्राहकांना Google चे प्रोडक्ट्स जसे स्मार्टफोन्स, TWS ईयरबड्स आणि स्मार्टवॉच थेट OEM मधून खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे आता गुगलचे प्रोडक्ट खरेदी करण्यासाठी तुम्हाला ऑथराइज्ड रिटेल पार्टनर्स किंवा रीसेलर्सकडे जाण्याची आवश्यकता नाही.
तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, Google Store मधून Pixel Watch किंवा Pixel Watch 3 खरेदी करण्याचे अनेक फायदे आहेत. या स्टोअरमधून खरेदी केल्यानंतर ग्राहकांना केवळ ऑथेंटिक प्रॉडक्ट्सच मिळणार नाहीत तर फ्लेक्सिबल पेमेंट ऑप्शन्स आणि स्टोअर क्रेडिट आणि डिस्काउंट सारख्या एक्सक्लूसिव ऑफर्स देखील मिळणार आहेत. मात्र या ऑफर्स आणि डिस्काउंट मर्यादित काळासाठी असणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
एक ब्लॉग पोस्टमध्ये Google ने सांगितलं आहे की, भारतात ऑफिशियल Google Store मधून प्रोडक्टची खरेदी केल्यानंतर ग्राहकांना डिस्काउंट, Google स्टोर क्रेडिट किंवा इंस्टंट कॅशबॅक दिलं जाणार आहे. ग्राहक त्यांच्या जुने डिव्हाईस नवीन pixel मध्ये एक्सचेंज करू शकतात आणि बोनसचा लाभ घेऊ शकतात. लाँच ऑफर्स अंतर्गत कंपनी जुन्या डिव्हाईसच्या किंमतीवर एडिशनल बोनस देण्याचा देखील दावा करते.
Google आता Pixel 9 वर 6,000 रुपये, Pixel 9 Pro वर 12,000 रुपये आणि Pixel 9 Pro Fold वर 15,000 रुपयांचे कॅशबॅक ऑफर करत आहे. ग्राहक गुगल स्टोअरवर निवडक प्रोडक्ट्सवर 15,000 रुपयांपर्यंत डिस्काउंटचा फायदा घेऊ शकतात. याचा अर्थ इंस्टंट डिस्काउंट आणि बँक ऑफर्ससह Pixel 9 ची नेट इफेक्टिव किंमत 67,999 रुपये होणार आहे.
गेल्या वर्षी लाँच करण्यात आलेल्या Pixel 8 Pro ला 37,000 रुपये डिस्काउंट आणि 7,000 रुपयांच्या कॅशबॅकसह ऑफर केले जात आहे. ज्यामुळे या डिव्हाईसची इफेक्टिव किंमत 62,999 रुपये होणार आहे. इंस्टंट कॅशबॅक ऑफर्स HDFC Bank क्रेडिट कार्ड ट्रांजेक्शनवर व्हॅलिड आहेत. डिस्काउंट आणि इंस्टेंट कॅशबॅक ऑफर्सव्यतिरिक्त, ग्राहक नो-कॉस्ट EMI ऑफर्सचा देखील लाभ घेऊ शकतात.
ग्राहक Google Store मधून Pixel Watch 3 किंवा Pixel Buds Pro 2 देखील खरेदी करू शकतात. मात्र माउंटेन व्यू-बेस्ड टेक दिग्गजने या डिवाइसेजवर कोणत्याही ऑफर्सची घोषणा केलेली नाही. मात्र या डिव्हाईसच्या खरेदीवर अनुक्रमे 5,000 रुपये आणि 3,000 रुपये Google स्टोर क्रेडिट मिळणार आहे, जे पुढील खरेदीवर लागू केले जाणार आहे. कंपनीने सांगितलं आहे की, जर ग्राहकांना रिटर्न कालावधीत निवडक रिटेल पार्टनर किंवा Google Store वर प्रोडक्टची चांगली किंमत आढळली, तर ते Pixel प्राइस प्रॉमिसनुसार कमी किंमतसोबत जुळवून घेण्यासाठी आंशिक रिफंडसाठी पात्र ठरू शकतात.