Telegram आणि X ची ऐतिहासिक डील! आता या प्लॅटफॉर्मवरही मिळणार Grok चॅटबोटची मजा, युजर्सना असा होणार फायदा
एलन मस्कने त्याच्या मालकिच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर अनेक बदल केले आहेत. मस्कने त्यांच्या युजर्ससाठी आतापर्यंत वेगवेगळे फीचर्स देखील लाँच केले आहेत. शिवाय कंपनीने एक्सवर एआय देखील जोडला आहे. एलन मस्कच्या आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनी xAI च्या Grok एक्सवर उपलब्ध आहे. युजर्सने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आणि त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी ग्रोक युजर्सना मदत करतो. एक्सवरील हाच Grok आता टेलिग्रामवर देखील उपलब्ध होणार आहे. ग्रोक टेलिग्राम अॅपमध्ये डायरेक्ट चॅट टॅबवर पिन केले जाईल, जेणेकरून युजर्स ते सहजपणे वापरू शकतील.
एलन मस्कची आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंपनी xAI आणि चॅटिंग अॅप Telegram यांंच्यात एक जबरदस्त पार्टनरशिप झाली आहे. या भागिदारीनंतर टेलिग्रामवर मस्कचा लोकप्रिय AI चॅटबॉट Grok उपलब्ध होणार आहे. टेलिग्रामचे फाउंडर पावेल ड्यूरोवने याबद्दल माहिती दिली आहे. पावेल ड्यूरोवने सांगितलं आहे की, ही भागिदारी एका वर्षासाठी करण्यात आली आहे. याचा फायदा थेट एक अरब युजर्सना होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
या भागिदारीनंतर आता Grok चॅटबोट टेलिग्राममध्ये थेट इंटीग्रेट केला जाणार आहे. म्हणजेच आता टेलिग्रामवर चॅटिंग करताना यूजर्स स्मार्ट AI हेल्प मागू शकणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या भागीदारीमुळे टेलिग्रामला 300 मिलियन डॉलरचा निधी मिळणार आहे, ज्याचा काही भाग शेअर्सच्या स्वरूपात असेल. एवढेच नाही तर, टेलिग्रामला xAI च्या कमाईच्या 50 टक्के रक्कम मिळेल, जी चॅटबॉटच्या सबस्क्रिप्शनमधून दिली जाणार आहे. त्यामुळे मस्कसोबत करण्यात आलेली ही डिल पावेल ड्यूरोवसाठी फायद्याची ठरणार आहे.
Grok च्या एंट्रीमुळे आता टेलिग्राममध्ये अनेक नवीन फीचर्स आणि स्मार्ट AI फीचर्स जोडले जाणार आहेत. जून 2025 नंतर सर्व युजर्ससाठी हे फीचर रोलआऊट केलं जाणार आहेत.
Smart Text Editing: आता तुम्ही पाठवलेले मेसेज एडीट करू शकणार आहेत. या मेसेजचा टोन बदलू शकता आणि त्यामध्ये नवीन माहिती जोडू शकता.
Chat Summaries: मोठ्या – मोठ्या मेसेजसाठी चॅटचा सारांश देखील उपलब्ध होणार आहे.
Document Summarization: कोणतेही डॉक्यूमेंट पाठवण्यापूर्वी किंवा पाठवल्यानंतर तुम्हाला त्याचा थोडक्यात आणि सोपा सारांश कळेल.
नवा Realme स्मार्टफोन चीनमध्ये लाँच! Powerful Battery आणि तगड्या फिचर्सने सुसज्ज, जाणून घ्या किंमत
Link Insights: कोणतीही लिंक न उघडता, तुम्हाला त्यात काय आहे ते एका नजरेत कळेल.
Fact Check: टेलिग्राम चॅनेलसाठी हे फीचर सुरु केलं जाणार आहे. कोणतीही माहिती पुढे शेअर करण्यापूर्वी हे फीचर त्याची सत्यता तपासणार आहे.
Sticker आणि Avatar Creation: AI च्या मदतीने तुम्ही तुमचे कस्टम स्टिकर आणि प्रोफाइल फोटो बनवू शकता.
अद्याप याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.