Chrome यूजर्ससाठी धोक्याची घंटा! सरकारने जारी केली चेतावणी, अनेक वर्जनमध्ये सिक्योरिटी रिस्क
गुगल क्रोम वापरकर्त्यांसाठी सरकारकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. सरकारी एजन्सीला Chrome ब्राउझरच्या अनेक वर्जनमध्ये सिक्योरिटी रिस्क आढळल्या आहेत, ज्यामुळे युजर्सच्या डेटाला धोका निर्माण होऊ शकतो. याबाबत एजन्सीने काही सिक्योरिटी टीप्स देखील शेअर केल्या आहेत. ज्याच्या मदतीने युजर्स स्वत:ला सुरक्षित ठेऊ शकतात.
हेदेखील वाचा- Jiostar Coming Soon! नेटफ्लिक्स आणि प्राइम व्हिडिओच्या अडचणी वाढल्या, लवकरच लाँच होणार नाव ॲप
इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने सांगितले की, सिस्टममधील त्रुटींचा फायदा घेऊन हॅकर्स तुमची वैयक्तिक माहिती चोरू शकतात. एजन्सीच्या मते, विंडोज आणि मॅक युजर्सवर या सिक्योरिटी त्रुटींमुळे विशेष परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत, आपल्या स्वत: च्या सुरक्षिततेसाठी हे महत्वाचे आहे की आपण कोणतीही चूक करू नका. (फोटो सौजन्य – pinterest)
CERT-In ने सांगितले की काही निवडक वर्जनमध्ये सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत. याचा विंडोज आणि लिनक्स सिस्टमवर परिणाम होऊ शकतो. एजन्सीच्या सिक्युरिटी नोटमध्ये असे म्हटले आहे की Google Chrome कॉन्पोनेंट्स सिरीयल आणि फॅमिली एक्सपिरियन्समध्ये या सिक्योरिटी रिस्क आढळल्या आहेत. याचा फायदा घेऊन हॅकर्स युजर्सची वैयक्तिक माहिती चोरू शकतात. तसेच याचा सिस्टमवर देखील परिणाम होऊ शकतो. हॅकर्स सिस्टममध्ये अनियंत्रित कोड एग्जिक्यूट करू शकतात. डेनियल ऑफ सर्विस DoS च्या बाबतीत, आढळलेल्या सिक्योरिटी रिस्क्स युजर्ससाठी धोकादायक ठरू शकतात.
हेदेखील वाचा- Google Map Update: गुगल मॅपवर भारत सर्च करताच दिसतात India चे रिझल्ट, तुम्हीही करा ट्राय
या अलर्टचा स्मार्टफोन वापरकर्त्यांवर परिणाम होत नाही. त्यामुळे त्यांनी काळजी करण्याची गरज नाही. मात्र जे युजर्स डेकस्टॉपवर क्रोमचा वापर करतात, त्यांच्यासाठी हा अलर्ट महत्त्वाचा आहे.