Google Map Update: गुगल मॅपवर भारत सर्च करताच दिसतात India चे रिझल्ट, तुम्हीही करा ट्राय
गुगल मॅपल भारतात सर्वाधिक वापरलं जाणारं नेव्हिगेशन अॅप आहे. तुम्ही गुगल मॅपवर जगभरातील देश सर्च करू शकता. म्हणजेच तुम्ही गुगल मॅपवर आपल्या भारताचं नाव देखील सर्च करू शकता. पण तुम्ही गुगल मॅपवर भारतासाठी सर्च करता तेव्हा इंडिया या नावाने सर्च रिझल्ट पेज ओपन होतं. आता तुम्ही गुगलवर ‘India’, ‘Bharat’ आणि नंतर ‘भारत’ असे सर्च केल्यास सर्च रिझल्ट सारखेच आहेत. जेव्हा तुम्ही गुगल मॅपवर India किंवा Bharat शोधता तेव्हा ते दक्षिण आशियातील देश म्हणून प्रदर्शित होते. म्हणजे गुगलवर आता India चीच नव्हे तर देशाला भारताची ओळख देखील मिळाली आहे.
हेदेखील वाचा- Google Map Update: पैसे वाचवण्यासाठी गुगल मॅप करणार मदत, या फीचरच्या मदतीने गाडी चालवताना होणार इंधनाची बचत
तुम्ही गुगल मॅपवर Bharat शोधल्यास, तुम्हाला सर्च रिकमेन्डेशनमध्ये देशाच्या ध्वजासह Bharat, दक्षिण आशियातील देश टॅग दिसेल. त्यावर क्लिक केल्यावर पुढच्या पानावर India चे पेज उघडेल, ज्यामध्ये देशाच्या अधिकृत नकाशासह इतर काही महत्त्वाची माहिती आणि फोटो दिसू लागतील. (फोटो सौजन्य – गुगल मॅप)
एवढेच नाही तर तुम्ही हिंदीमध्ये ‘भारत’ सर्च केल्यास तुम्हाला देशाच्या ध्वजासह भारत असे लिहिलेले सर्च रेकमेंडेशन पर्यायही दिसेल, जो तुम्हाला इंडिया पेजवर घेऊन जाईल. अशा प्रकारे तुम्ही ‘Bharat’, ‘भारत’ किंवा India यापैकी कोणताही शब्द सर्च केला तरी तुमचे रिझल्ट पेज India असंच ओपन होईल.
यापूर्वी अनेक प्रसंगातून असं दिसून आलं आहे की, केंद्र सरकार अधिकृतपणे देशाच्या नावासाठी India शब्दाऐवजी ‘भारत’ शब्द वापरत आहे.
Google च्या इतर प्रोडक्टमध्ये जसे की Google Search, Google News आणि अगदी Google Translator मध्ये Bharat आणि India शोधताना असेच परिणाम दिसत आहेत.
हेदेखील वाचा- Google Map Update: अशा पद्धतीने गुगल मॅपमध्ये मिळणार वेदर अपडेट, एयर क्वालिटी इंडेक्सचीही माहिती मिळणार
गुगल युजर्सचा अनुभव सुधारण्यासाठी, गुगल मॅपवर सतत नवीन अपडेट जोडत आहे. आता गुगल मॅपने एक असं फीचर अॅड केलं आहे, ज्यामध्ये लॉक स्क्रीनवर टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन दिसणार आहे. Glanceable directions असे या फीचरचे नाव आहे. यामध्ये दिशा पाहण्यासाठी फोन अनलॉक करण्याची गरज नाही, उलट लॉक न उघडता सर्व माहिती दिसेल. हे रिअल टाइम अपडेट्सची सुविधा प्रदान करेल. हे फीचर लाँच करण्यामागील गुगल मॅपचा उद्देश वापरकर्त्यांचा नेव्हिगेशन अनुभव सुधारणे हा आहे.