आयफोन युजर्ससाठी धोक्याची घंटा! सरकारने जारी केला अलर्ट, अशी घ्या योग्य काळजी
तुम्ही देखील आयफोन युजर असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकारने देशातील आयफोन युजर्ससाठी अलर्ट जारी केला आहे. सरकारला आयफोनच्या जुन्या सॉफ्टवेअरमध्ये काही त्रुटी आढळल्या आहेत, ज्यामुळे आयफोन युजर्सचा डाटा हॅक होण्याची शक्यता आहे. यामुळे सरकारने आयफोन युजर्ससाठी अलर्ट जारी केला आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
वास्तविक, भारत सरकारच्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने आयफोन आणि इतर अॅपल डिव्हाइस वापरकर्त्यांसाठी एक अलर्ट जारी केला आहे. हा अलर्ट विशेषत: जुन्या सॉफ्टवेअर आवृत्त्यांचा वापर करणाऱ्या उपकरणांसाठी जारी करण्यात आला आहे. अहवालानुसार, या उपकरणांमध्ये गंभीर सुरक्षा त्रुटी आढळल्या आहेत, ज्यामुळे सायबर धोके वाढू शकतात. तसेच यामुळे हॅकर्स आयफोन युजर्सचा डाटा लिक करू शकतात. (फोटो सौजन्य – pinterest)
भारत सरकारच्या इंडियन कॉम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमने ॲपल सॉफ्टवेअरच्या जुन्या आवृत्तीवर आधारित उपकरणांसाठी हा अलर्ट जारी केला आहे. आयफोन, आयपॅड, मॅक आणि सफारी सारख्या उत्पादनांचाही या यादीत समावेश करण्यात आला आहे. अॅपलद्वारे प्रत्येक डिव्हाईससाठी सॉफ्टवेअर अपडेट ठराविक वर्षांसाठी प्रदान केले जाते. त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर कंपनी संबंधित डिव्हाईससाठी अपडेट प्रदान करणं थांबवते.
तुमचा आयफोन किंवा अॅपल डिव्हाईस यापैकी कोणत्याही वर्जनवर आधारित असेल, तर ते असुरक्षित असू शकते. सायबर हल्ल्यांमुळे तुमचा डाटा लिक होऊ शकतो.
जुन्या सॉफ्टवेअरमध्ये अशा त्रुटी आढळल्या आहेत, ज्याचा सायबर गुन्हेगार फायदा घेऊ शकतात. CERT-In ने सल्ला दिला आहे की वापरकर्त्यांनी त्यांचे डिव्हाईस तात्काळ नवीनतम आवृत्तीवर अपडेट करावे. तुमच्या डिव्हाइससाठी सॉफ्टवेअर अपडेट उपलब्ध नसल्यास, तुम्ही नवीन डिव्हाइस खरेदी करण्याचा विचार करावा. कारण सॉफ्टवेअर अपडेट न केल्यास तुमचे डिव्हाईस हॅक होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे डाटा देखील होऊ शकते. त्यामुळे सुरक्षित उपाय म्हणून तुम्ही लवकरात लवकर तुमचं डिव्हाईस नवीनतम आवृत्तीवर अपडेट करावे.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा