प्रतिक्षा संपली! या महिन्यात लाँच होणार Apple iPhone SE 4, अपडेटेड प्रोसेसरसह मिळणार नवीन डिझाईन
टेक कंपनी Apple च्या आगामी स्मार्टफोन Apple iPhone SE 4 बाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. Apple युजर्स देखील नवीन फोनच्या लाँचिंगबद्दल उत्सुक आहेत. हा फोन कधी लाँच होणार, त्याची किंमत काय असणार आणि त्याचे फीचर्स काय असणार याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहे. मात्र आता या फोनच्या लाँचिंगबाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
कंपनीचा आगामी आयफोन पुढील वर्षी म्हणजेच 2025 मध्ये लाँच होऊ शकतं असं सांगितलं जात आहे. त्यामुळे आयफोन युजर्सना नवीन फोनच्या खरेदीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे. Apple चा नवीन iPhone मॉडेल iPhone SE 4 बजेट किंमतीत लाँच केला जाऊ शकतो. रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर हा Apple फोन मार्च 2025 मध्ये लाँच केला जाऊ शकतो. (फोटो सौजन्य – pinterest)
iPhone SE 4 च्या डिझाईन बद्दल बोलायचं झालं तर हा फोन नवीन डिझाईनसह लाँच केला जाऊ शकतो, असं कंपनीने सांगितलं आहे. iPhone SE 4 मध्ये पातळ बेझल आणि फेस आयडी सपोर्टसह 6.1 इंच OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. यासोबतच कंपनी एसई मॉडेलमधून टच आयडी काढून टाकू शकते. कंपनीच्या सध्याच्या iPhone SE मॉडेलची रचना iPhone 8 सारखी आहे. यावेळी कंपनी यामध्ये अनेक बदल करणार आहे.
परफॉर्मंसबद्दल बोलायचे झाले तर आगामी iPhone SE 4 ला कंपनीच्या A सीरीजचा अपडेटेड चिपसेट दिला जाऊ शकतो, जो पूर्वीपेक्षा अधिक शक्तिशाली आणि कार्यक्षम आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाले तर यात सिंगल रियर कॅमेरा सेटअप दिला जाण्याची शक्यता आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 48MP असेल. यासोबतच रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की हा फोन 8 GB रॅम सोबत AI फीचर्सलाही सपोर्ट करेल. कंपनी iPhone SE 4 मध्ये USB-C पोर्ट देईल.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
Apple चे स्वस्त आयफोन मॉडेल्स कंपनी स्वतःच्या 5G मॉडेमसह लाँच करणार आहे. कंपनी 2018 पासून या मोडेमवर काम करत आहे. हे डिव्हाइसची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात सुधारेल. ॲपलने या मॉडेमसाठी यापूर्वी क्वालकॉमसोबत भागीदारी केली होती. दोन्ही कंपन्यांची ही भागीदारी फार काळ टिकली नाही आणि वादामुळे दोघेही कोर्टात पोहोचले. यानंतर ॲपलने इंटेलचा स्मार्टफोन मोडेम व्यवसाय विकत घेतला. आता कंपनी स्वतःच्या मॉडेमसह फोन लाँच करणार आहे.
iPhone SE 4 च्या किंमतीबाबत असे सांगितले जात आहे की, तो 429 डॉलर म्हणजेच जवळपास 36,195 रुपयांच्या किमतीत लाँच केला जाऊ शकतो. Apple मार्च 2025 मध्ये आपला आगामी परवडणारा iPhone SE 4 लाँच करू शकते.