स्मार्टफोन खरेदी करायचाय? Flipkart चा ब्लॅक फ्रायडे सेल आहे ना! स्वस्तात स्मार्टफोन खरेदी करण्याची संधी
हल्ली लोक बाजारात जाऊन खरेदी करण्याऐवजी घरी राहून ऑनलाईन शॉपिंग करण्याला प्राधान्य देतात. ऑनलाईन शॉपिंग करताना वेळ देखील वाचतो आणि अनेक ऑफर्ससह शॉपिंग करण्याची संधी मिळते. त्यामुळे पैशांची देखील बचत होते. त्यामुळे अनेक लोकं ऑनलाईन शॉपिंगसाठी ऑफर्स शोधत असतात. तुम्हाला देखील ऑनलाईन शॉपिंग करायची असेल आणि तुम्ही कोणती ऑफर शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे.
टेकसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
फ्लिपकार्टने ब्लॅक फ्रायडे सेलची घोषणा केली आहे. आज 24 नोव्हेंबरपासून हा सेल सुरु झाला असून 29 नोव्हेंबर ही या सेलची शेवटची तारीख आहे. या सेलदरम्यान तुम्ही iPhone 15, Moto G85, Samsung Galaxy S24, Moto Edge 50 Pro, Nothing CMF फोन 1 आणि Pixel 9 सारखे स्मार्टफोन ऑकर्षक डिस्काऊंटसह खरेदी करू शकता. ज्या लोकांना नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा आहे, त्यांच्यासाठी फ्लिपकार्टचा ब्लॅक फ्रायडे ही एक उत्तम संधी आहे. फ्लिपकार्टने त्यांच्या ब्लॅक फ्रायडे सेलचा टीझर रिलीज झाला आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
फ्लिपकार्टच्या या सेलमध्ये ग्राहकांना आयफोन 15 हा केवळ 57,749 रुपयांच्या किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. आयफोन 15 ची लाँचिंग किंमत 79,900 रुपये आहे. मात्र सेलमध्ये हा फोन तुम्हला डिस्काऊंटमध्ये खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. iPhone 15 Plus ची किंमत 65,999 रुपयांपर्यंत कमी केली जाऊ शकते. जी कोणत्याही बँक ऑफर किंवा अटींशिवाय अपेक्षित आहे कारण फ्लिपकार्टने या डीलमध्ये कोणताही स्टार आयकॉन जोडलेला नाही.
फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये iPhone 15 Pro Max हा केवळ 1,23,999 रुपयांमध्ये ऑफर केला जाणार आहे. तर या फोनची लाँचिग किंमत 1,59,999 रुपये आहे. मात्र सेलमध्ये ग्राहकांना हा फोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.
स्मार्टफोनसंबंधित बातम्या वाचण्यासाठी इथे क्लिक करा
फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेल इव्हेंट दरम्यान Samsung Galaxy S24+ केवळ 64,999 रुपयांना उपलब्ध असेल. Pixel 9 केवळ 71,999 रुपयांमध्ये ऑफर केला जाणार आहे. तर या फोनची लाँचिग किंमत 79,999 रुपये आहे. फ्लिपकार्ट ब्लॅक फ्रायडे सेलमध्ये Samsung Galaxy S 23 38,999 रुपयांना ऑफर केला आहे.
फ्लिपकार्ट सेलमध्ये Moto G85 वर 1,000 रुपयांची सूट असेल. अशा परिस्थितीत फोनची प्रभावी किंमत 16,999 रुपयांपर्यंत कमी होईल. Vivo V30 Pro 33,999 रुपयांना विकला जाईल. त्याच वेळी, ग्राहक Moto Edge 50 Pro 29,999 रुपयांच्या प्रभावी किमतीत खरेदी करू शकतील. त्याचप्रमाणे, CMF फोन 1 13,999 रुपयांना विकला जाणार आहे.
या सर्वांशिवाय Moto Edge 50 Fusion, Vivo T3 Ultra, Nothing Phone 2a Plus, Galaxy Z Flip 6, Realme P1, Vivo T3, Realme 12X आणि Moto Edge 50 Neo हे स्मार्टफोन देखील ग्राहकांना कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.