फोटो सौजन्य - pinterest
सायबर स्कॅमची एक नवीन घटना आता समोर आली आहे. या स्कॅमचा सर्वाधिक धोका अँड्रॉईड युजर्सना आहे. अँड्रॉईड युजर्सच्या WhatsApp वर वाहतूक दंडाच्या नावाखाली एक मॅसेज पाठवण्यात येत आहे. या मॅसेजव्दारे युजर्सना एक अॅप डाऊनलोड करण्यास सांगितलं जात आहे. हा अॅप अँड्रॉईड युजर्सची फसवूणक करण्यासाठी तयार करण्यात आला असून हा अॅप आपल्या फोनमध्ये डाऊनलोड केल्यास अँड्रॉईड युजर्सचे लाखोंचे नुकसान होऊ शकते.
हेदेखील वाचा- India Post मधून तुम्हाला तुमचा पत्ता अपडेट करण्यासाठी मॅसेज आला आहे का? आताच सावध व्हा
सायबर स्कॅमर लोकांची फसवणूक करण्यासाठी नवनवीन मार्ग शोधत आहेत. कधी बनावट वेबसाईट तर कधी बनावट अॅप्स आणि आता बनावट मॅसेज. लोकांच्या फोनवर बनावट मॅसेज पाठवून त्यांची फसवणूक करण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढले आहे. नुकतीच एक घटना समोर आली होती, ज्यामध्ये सायबर स्कॅमर लोकांच्या फोनवर India Post च्या नावाखाली बनावट मॅसेज पाठवून त्यांची फसवूणक करत होते. India Post च्या नावाखाली आलेल्या या बनावट मॅसेजमध्ये दिलेल्या लिंकवर तुम्ही केल्यास तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. एवढंच नाही तर तुमचा संपूर्ण डेटा सायबर स्कॅमरकडे जातो. या स्कॅमनंतर आता पुन्हा एक नवा स्कॅम सुरु झाला आहे. यामध्ये अँड्रॉईड युजर्सच्या WhatsApp वर एक मॅसेज येत आहे. वाहतूक दंडाच्या नावाखाली हा मॅसेज पाठवला जात आहे. पण या मॅसेजमध्ये दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक केल्यास तुमचं लाखो रुपयांचं नुकसान होऊ शकतं.
CloudSEEK च्या अहवालानुसार, देशभरातील अनेक अँड्रॉईड युजर्सच्या WhatsApp वर एक मॅसेज आला आहे. या मॅसेजमध्ये युजर्सना बनावट वाहतूक दंड लागू करण्यात आला आहे. या मेसेजमध्ये युजर्सना दंड भरण्यासाठी ॲप डाउनलोड करण्यास सांगितलं जातं आहे. तुम्ही दिलेल्या लिंक वर क्लिक करून अॅप डाऊनलोड केल्यास इंस्टॉलेशननंतर, हे ॲप स्वतःला लपवतो आणि होम स्क्रीनवर दिसत नाही. ॲप डाऊनलोड होताच हॅकर्स ॲपद्वारे तुमची महत्त्वाची माहिती सायबर स्कॅमर पर्यंत पोहोचते, ज्यामुळे तुमचं मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं. हे सर्व प्रकरण Maorisbot Malware सोबत संबंधित आहे.
हेदेखील वाचा- घरातील सामानासह आता दारूही ऑनलाईन ऑर्डर करता येणार! Swiggy-Zomato लवकरच सुरु करणार नवी सेवा
हे ॲप यूजरकडून अनेक परवानग्या मागते. परवानगी मिळाल्यानंतर, Maorisbot Malware तुमच्या डिव्हाइसमधील संपर्क क्रमांक, मॅसेज इत्यादीसारखी अनेक महत्त्वाची आणि वैयक्तिक माहिती चोरतो. यानंतर युजर्सचा हा डेटा टेलीग्राम बॉटला पाठवला जातो, जो हॅकर्सद्वारे नियंत्रित केला जातो. डेटा चोरीनंतर, हॅकर्स OTP मध्ये अडथळा आणून अनधिकृत व्यवहार देखील करू शकतात. CloudSEEK च्या अहवालानुसार, Maorisbot मालवेअरची सर्वाधिक प्रकरणे गुजरात आणि कर्नाटकमधून नोंदवली गेली आहेत. सायबर फ्रॉडचे शिकार झालेले बहुतांश लोक जिओ आणि एअरटेल सिम वापरत आहेत. आतापर्यंत 4,400 हून अधिक डिव्हाईसमध्ये हा मालवेअर सापडला आहे. सायबर ठगांनी यापूर्वीच 16 लाखांहून अधिक रक्कम लंपास केली आहे.