Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • बजेट
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • ajit pawar plane crash |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘AI’च्या गैरवापरातून वाघाच्या अफवेने खळबळ; व्हिडिओ सायबर क्राईमकडे सुपूर्द

नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या संशयास्पद व्हिडिओ किंवा संदेशांची खातरजमा केल्याशिवाय ते पुढे पाठवू नयेत, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Jan 31, 2026 | 02:35 AM
‘AI’च्या गैरवापरातून वाघाच्या अफवेने खळबळ; व्हिडिओ सायबर क्राईमकडे सुपूर्द
Follow Us
Close
Follow Us:

‘एआय’च्या गैरवापरातून वाघाच्या अफवेने खळबळ
वनविभागाकडून नागरिकांना सतर्कतेचे आवाहन
व्हिडिओ सायबर क्राईमकडे सुपूर्द

कराड: शहरातील मुजावर कॉलनी परिसरात वाघाचा वावर असल्याचा खोटी व्हिडिओ कृत्रिम बुद्धिमत्ता (एअाय) तंत्रज्ञानाच्या साहाय्याने तयार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ही अफवा सोशल मीडियावर, विशेषतः व्हॉट्सअ‍ॅपद्वारे मोठ्या प्रमाणावर पसरवून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.

ओमकार खंडु बोबाटे (रा. मुजावर कॉलनी, कराड) याच्याकडून हा बनावट व्हिडिओ प्रसारित झाल्याची माहिती समोर आली असून, वनविभागाने तत्काळ याची दखल घेतली. प्राप्त मोबाईल संदेशांच्या आधारे संबंधित ठिकाणी वनविभागाच्या पथकाने प्रत्यक्ष पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. मात्र कोणत्याही ठिकाणी वाघाचा वावर आढळून आला नाही. परिसरातील कोणत्याही नागरिकाने वाघ प्रत्यक्ष पाहिल्याचा पुरावा समोर आलेला नाही.

वनविभागाच्यावतीने करण्यात आले आहे. या व्हिडिओची तांत्रिक तपासणी करण्यासाठी तो कराड सायबर क्राईम विभागाकडे पाठविण्यात आला असून, पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहाय्यक वनसंरक्षक जयश्री जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात अाली. यात वनक्षेत्रपाल ललिता पाटील, वनपाल आनंद जगताप, वनरक्षक अक्षय पाटील, वनरक्षक अभिजीत शेळके, आरआरटी टीमचे अजय महाडीक व रोहित कुलकर्णी यांनी सहभाग घेतला.

यहा के राजा हम है! सह्याद्रीमध्ये ‘सेनापती’ आणि ‘चंदा’चा एकत्र वावर; चांदोली वन्यजीव….

संशयास्पद संदेशांची खातरजमा करा
दरम्यान, नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, सोशल मीडियावर प्रसारित होणाऱ्या संशयास्पद व्हिडिओ किंवा संदेशांची खातरजमा केल्याशिवाय ते पुढे पाठवू नयेत, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे. कराड कृत्रिम बुद्धिमत्तेच्या गैरवापरातून अशा प्रकारे अफवा पसरविण्याचे प्रकार वाढत असून, यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी सजग राहावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

‘सेनापती’ आणि ‘चंदा’चा एकत्र वावर

सह्याद्री व्याघ्र राखीवमध्ये वाघांची नैसर्गिक संख्या पुन्हा स्थिर करण्याच्या दृष्टीने सुरू असलेल्या ‘वाघ पुनर्स्थापना प्रकल्पा’ला मोठे यश मिळाले असून, ‘सेनापती’ हा नर वाघ आणि ताडोबा येथून स्थलांतरित करण्यात आलेली ‘चंदा’ ही वाघीण एकत्रितपणे वावरत असल्याचे स्पष्ट झाले आहे. चांदोली वन्यजीव विभागातील आंबा वनपरिक्षेत्रात हा वावर कॅमेरा ट्रॅप आणि प्रत्यक्ष निरीक्षणातून नोंदविण्यात आला आहे.

कोयनेच्या जंगलात घुमतेय ‘बाजी’ची डरकाळी! चांदोली परिसरात सेनापती-सुभेदाराचा दबदबा

सन २०१७ मध्ये सह्याद्री व्याघ्र राखीव, भारतीय वन्यजीव संस्था देहरादून आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने ‘वाघ पुनर्स्थापना प्रकल्प’ हाती घेण्यात आला. सन २०२७ पर्यंत सह्याद्रीमध्ये मुक्त संचार करणाऱ्या वाघांची इष्टतम संख्या स्थापन करणे व पर्यावरणीय समतोल बळकट करणे, हे या प्रकल्पाचे मुख्य उद्दिष्ट आहे.

Web Title: Tiger viral ai video in karad sent to cyber crime fake news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 31, 2026 | 02:35 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • cyber crime
  • tiger

संबंधित बातम्या

यहा के राजा हम है! सह्याद्रीमध्ये ‘सेनापती’ आणि ‘चंदा’चा एकत्र वावर; चांदोली वन्यजीव….
1

यहा के राजा हम है! सह्याद्रीमध्ये ‘सेनापती’ आणि ‘चंदा’चा एकत्र वावर; चांदोली वन्यजीव….

Starlink : Elon Musk चा ‘ब्रह्मांड’ प्लॅन! AI साठी सज्ज होतोय जगातील पहिला ‘स्पेस क्लाउड’; चीननेही कसली कंबर
2

Starlink : Elon Musk चा ‘ब्रह्मांड’ प्लॅन! AI साठी सज्ज होतोय जगातील पहिला ‘स्पेस क्लाउड’; चीननेही कसली कंबर

TECH EXPLAINED: AI Voice Assistant म्हणजे काय? कसं करतं काम? वापरण्यापूर्वी वाचा सविस्तर
3

TECH EXPLAINED: AI Voice Assistant म्हणजे काय? कसं करतं काम? वापरण्यापूर्वी वाचा सविस्तर

Confer Launch: डेटा लीकची भीती संपली! Signal फाऊंडरने लाँच केला जगातील सर्वात सुरक्षित AI चॅटबोट, प्रायव्हसीवर असणार फोकस
4

Confer Launch: डेटा लीकची भीती संपली! Signal फाऊंडरने लाँच केला जगातील सर्वात सुरक्षित AI चॅटबोट, प्रायव्हसीवर असणार फोकस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.