HMD Skyline स्मार्टफोन भारतात झाला लाँच! बिघडलेला फोन स्वत: करू शकाल दुरुस्त, आज होणार पहिली विक्री (फोटो सौजन्य- X)
स्मार्टफोन कंपनी HMD (Human Mobile Devices) ने आपला नवीन स्मार्टफोन HMD Skyline भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनची खास गोष्ट म्हणजे HMD Skyline स्मार्टफोन अशा प्रकारे डिझाईन करण्यात आला आहे की, हा बिघडलेला स्मार्टफोन तुम्ही स्वत: घरीच दुरुस्त करू शकता. HMD Skyline स्मार्टफोन दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही रिपेरिंग शॉपमध्ये किंवा मोबाईल सेंटरमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे तुमचा वेळ आणि पैसा दोन्हींची बचत होणार आहे.
हेदेखील वाचा- Amazon Great Indian Festival Sale: 10 हजार रुपयांहून कमी किमतीत मिळणार स्मार्टफोन्स आणि टीव्ही
HMD Skyline स्मार्टफोन दुरुस्त करण्यासाठी तुम्हाला केवळ स्क्रू ड्रायव्हर आणि गिटार पिकची गरज भासणार आहे. स्क्रू ड्रायव्हर आणि गिटार पिकच्या मदतीने तुम्ही तुमचा बिघडलेला HMD Skyline स्मार्टफोन दुरुस्त करू शकाल. HMD चा हा भापरतील तिसरा स्मार्टफोन असून या स्मार्टफोनची विक्री आज 17 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. आज HMD स्मार्टफोनची पहिली विक्री असणार आहे. Amazon.in, HMD.com आणि इतर रिटेल स्टोअर्सवरून तुम्ही HMD Skyline स्मार्टफोनची खरेदी करू शकता.
कंपनीने सांगितलं आहे की, HMD Skyline स्मार्टफोनची पहिली विक्री आज 17 सप्टेंबरपासून Amazon.in, HMD.com आणि इतर रिटेल स्टोअर्सवर थेट होईल. हा डिवाइस 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज सह लाँच करण्यात आला आहे. त्याची किंमत 35,999 रुपये आहे. हे ट्विस्टेड काळ्या आणि निऑन गुलाबी रंगात खरेदी केले जाऊ शकते.
हेदेखील वाचा- Motorola Edge 50 Neo: या दिवशी लाँच होणार! लेदर फिनिशसह मिळणार दमदार फीचर्स
HMD Skyline स्मार्टफोनमध्ये 6.55-इंचाचा poOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. नवीनतम फोनमध्ये 144 Hz रिफ्रेश रेट आणि HDR10 व्हिडिओ प्लेबॅक देखील देण्यात आला आहे. स्मार्टफोन Snapdragon 7s Gen 2 SoC द्वारे समर्थित आहे. HMD Skyline स्मार्टफोनमध्ये नेविगेशन आणि AI-पावर्ड असिस्टंट देण्यात आलं आहे.
HMD Skyline स्मार्टफोनमध्ये हायब्रीड OIS सह 108MP रियर कॅमेरा, 13MP अल्ट्रा-वाइड आणि 50mm पोर्ट्रेटसाठी 50MP टेलिफोटो कॅमेरा देण्यात आला आहे. ऑटोफोकस आणि आय-ट्रॅकिंगसह 50MP फ्रंट कॅमेरा आहे. स्मार्टफोन बिल्ट ‘सेल्फी जेस्चर’ हार्डवेअरसह येते.
HMD Skyline स्मार्टफोनमध्ये 4600mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 48 तासांपर्यंत वापरण्यास सक्षम आहे. 33W फास्ट चार्जिंग व्यतिरिक्त, हे Qi वायरलेस चार्जिंगसह देखील येते जे तुम्हाला कोणत्याही चुंबकीय Qi2 चार्जरने फोन चार्ज करण्याची परवानगी देते.
HMD Skyline स्मार्टफोनमध्ये एक कस्टम बटण देण्यात आलं आहे, जे युजर्सकडे त्यांच्या गरजेनुसार कस्टमायझेशन पर्याय प्रदान करते. हे आपल्या आवडीनुसार सेट केले जाऊ शकते. जेव्हा ते बटण दाबून ठेवतात तेव्हा ते एक कार्य करेल आणि जेव्हा ते दोनदा दाबतात तेव्हा ते दुसरे कार्य करेल. याद्वारे तुमच्या आवडत्या गेमचे शॉर्टकट, घरातील नेव्हिगेटिंग, पर्सनल असिस्टंट अशा सुविधा उपलब्ध होऊ शकतात.
HMD Skyline स्मार्टफोनची पहिली विक्री आज 17 सप्टेंबरपासून Amazon.in, HMD.com आणि इतर रिटेल स्टोअर्सवर लाईव्ह होणार आहे. हा डिवाइस 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज सह लाँच करण्यात आला आहे. HMD Skyline स्मार्टफोनची किंमत 35,999 रुपये आहे. हे ट्विस्टेड काळ्या आणि निऑन गुलाबी रंगात खरेदी केले जाऊ शकते.