रिचार्जशिवाय किती दिवस चालू राहतं SIM कार्ड? काय सांगतात TRAI चे नियम, जाणून घ्या सविस्तर
सध्या अनेक मोबाईल युजर्स दोन सिम कार्डचा वापर करतात. पण यातील एकच सिमकार्डमध्ये रिचार्ज केला जातो तर दुसरं सिम कार्ड अनेक महिन्यांपर्यंत वापरला देखील जात नाही. काही लोक असेही असतात पहिलं सिम कार्ड कॉलिंग आणि मेसेजिंगसाठी वापरतात तर दुसरं सिम कार्ड व्हाट्सअपसाठी वापरतात. त्यामुळे दुसरे सिम रिचार्ज न केल्याने थोड्या दिवसातच बंद होते, ज्यामुळे या सीममध्ये आऊटगोइंग आणि इनकमिंग असे दोन्ही कॉल बंद होतात. अशीच घटना क्रिकेटर रजत पाटीदार सोबत सुद्धा घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रजत पाटीदार याचा जुना नंबर रिचार्ज न केल्यामुळे काही काळाने बंद झाला आणि हा नंबर काही काळाने एका दुसऱ्या व्यक्तीला अलॉट झाला. त्यामुळे त्या व्यक्तीला विराट कोहलीपासून एबी डेव्हिलियर्सपर्यंत अनेकांचे कॉल आले होते. या घटनेनंतर सर्व लोकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला तो म्हणजे रिचार्ज न केल्यास किती दिवसात सिम कार्ड बंद होतं. याबाबत ट्रायने काही नियम जारी केले आहेत आणि या नियमांबाबत सविस्तर जाणून घेऊया.
टेलिकॉम रेगुलेटर ऑफ इंडिया म्हणजेच ट्रायने सर्व टेलिकॉम कंपन्यांसाठी काही नियम जारी केले आहेत. या नियमांतर्गत जर एखादे सिम कार्ड एका काळापर्यंत रिचार्ज केले नाही तर त्या व्यक्तीचा नंबर बंद होतो आणि तो नंबर दुसऱ्याला दिला जातो. हाच प्रकार रजत पाटीदारसोबत घडला. भारतातील टेलिकॉम कंपन्यांचे वेगवेगळे नियम आहेत, याच नियमांबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest)
एअरटेल आणि जिओचे सिम रिचार्जशिवाय 90 दिवसांपर्यंत सुरू राहू शकते. मात्र रिचार्ज रिचार्ज केला नाही तर काही आठवड्यातच इन्कमिंग कॉल बंद होते. एवढेच नाही तर वेळोवेळी रिचार्ज केला नाही तर तुमचा नंबर एखाद्या दुसऱ्याला दिला जातो. एअरटेल त्यांच्या युजर्सना पंधरा दिवसांचे ग्रेस पिरियड ऑफर करते पण या कालावधीतही युजरने रिचार्ज केला नाही तर त्यांचे सिम बंद होऊ शकते आणि त्यांचा नंबर दुसऱ्याला दिला जातो.
वोडाफोन आयडिया म्हणजेच व्हीआय सिम रिचार्ज शिवाय 90 दिवसांपर्यंत चालू राहते. या सर्व खाजगी कंपन्यांमध्ये एकच समान गोष्ट आहे ती म्हणजे रिचार्जशिवाय त्यांचे सिम कार्ड 90 दिवसांपर्यंत वापरू शकतात. पण जर भारतातील सहकारी टेलिकॉम कंपनीचा विचार केला तर ही कंपनी त्यांच्या युजर्सना खाजगी कंपन्यांपेक्षा डबल फायदा देते. म्हणजेच बीएसएनएल युजर रिचार्जशिवाय त्यांचे सिम 90 दिवसांपर्यंत वापरू शकतात पण या काळात युजर्सना आउटगोइंग कॉलची सुविधा दिली जात नाही. त्यामुळे जर रिचार्जशिवाय सिम वापरायचे असेल तर बीएसएनएल एक उत्तम पर्याय ठरू शकतो.