iPhone 17 सीरीजच्या लाँचपूर्वीच स्वस्त झाला iPhone 16 Pro! मोठ्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी, ही Deal मिस करू नका
तुम्ही देखील गेल्या अनेक महिन्यांपासून आयफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. पुढील महिन्यात आयफोन 17 सिरीज लाँच केली जाणार आहे. या सिरीजच्या लाँचिंगपूर्वीच iPhone 16 Pro मॉडेलची किंमत कमी झाली आहे. iPhone 16 Pro गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये लाँच करण्यात आला होता. आता या मॉडेलवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे ग्राहकांना हा आयफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. विजय सेल्स सध्या या हाय-एंड अॅपल डिव्हाइसवर थेट 14,000 रुपयांची मोठी सूट देत आहे. त्यामुळे ग्राहक अगदी कमी किंमतीत हा आयफोन खरेदी करू शकतात.
आता स्कॅमर्सची खैर नाही! WhatsApp युजर्सची सुरक्षा आणखी वाढणार, नवीन ‘सेफ्टी ओव्हरव्यू’ टूल लाँच
याशिवाय फोनवर जबरदस्त बँक ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. त्यामुळे या फोनची किंमत 3000 रुपयांपर्यंत आणखी कमी होणार आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही जुना आयफोन अपग्रेड करत असाल किंवा दुसऱ्या ब्रँडमधून आयफोनवर स्विच करणार असाल, तर ही तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. या ऑफरसह तुम्ही फक्त 1,02,900 रुपयांमध्ये iPhone 16 Pro खरेदी करू शकता. (फोटो सौजन्य – Pinterest)
Apple ने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात iPhone 16 सीरीज लाँच केली होती. या सिरीजमध्ये कंपनीने iPhone 16 Pro मॉडल लाँच केले होते. कंपनीने हे मॉडेल 1,19,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केले होते. मात्र आता हे प्रिमियम फ्लॅगशिप डिव्हाईस केवळ 1,05,900 रुपयांमध्ये उपलब्ध असणार आहे. म्हणजे तुम्हाला या स्मार्टफोनवर 14 हजार रुपयांचं फ्लॅट डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे.
एवढेच नाही तर कंपनी या फोनवर एक जबरदस्त बँक ऑफर देखील देत आहे, जिथे ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्ड SBI क्रेडिट कार्डवर 3000 रुपयांचे डिस्काऊंट उपलब्ध आहे. बँक डिस्काउंट ऑफरसह, तुम्ही हा फोन फक्त 1,02,900 रुपयांना खरेदी करू शकता. त्यामुळे या आयफोनच्या खरेदीवर आता मोठी बचत होणार आहे. तसेच HDFC बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डसह फ्लॅट 4500 रुपयांपर्यंत डिस्काउंट ऑफर केलं जाणार आहे. याशिवाय येस बँक क्रेडिट कार्डसह EMI पर्यायावर 2500 रुपयांची सूट दिली जात आहे, तर अमेरिकन एक्सप्रेस क्रेडिट कार्डवर कंपनी 7500 रुपयांची सूट देत आहे. या ऑफरसह, तुम्ही 1 लाख रुपयांपेक्षा कमी किमतीत फोन खरेदी करू शकता.
स्पेसिफिकेशनबद्दल बोलायचं झालं तर iPhone 16 Pro मध्ये नॉन प्रो मॉडलच्या तुलनेत थोडा मोठा म्हणजेच 6.3 इंच LTPO OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्यामध्ये 120Hz स्मूथ रिफ्रेश रेट आणि 2000 मिनटांपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर केली जात आहे. यासोबतच हा फोन HDR10 आणि डॉल्बी विजनला देखील सपोर्ट करतो. फोनमध्ये पावरफुल A18 Pro चिपसेट देखील आहे. जो Apple इंटेलिजेंसला देखील सपोर्ट करतो. यासोबतच फोनमध्ये 8GB रॅम आणि 1TB पर्यंत स्टोरेज आहे.
फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 48 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा, 12 मेगापिक्सलचा पेरिस्कोप टेलीफोटो लेंस आणि 48 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल लेंस देण्यात आली आहे.