
तुमचा iPhone खरा आहे की बनावट? (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
कारण आता मार्केटमध्ये कॉपी फोनचा सुळसुळाट झालाय. बाहेरून पाहिलं तर अगदी हुबेहूब आयफोन सारखाच दिसतो. बॉक्स, लोगो, डिझाईन सगळं सेम टू सेम. पहिल्या नजरेत कळणार पण नाही की हा खोटा आहे. त्यामुळे फक्त दिसण्यावर जाऊ नका. लाखो रुपये घालून जर नकली फोन हातात आला तर पूर्ण पैसा पाण्यात जाईल. खास करून जर तुम्ही सेकंड हँड फोन घेत असाल किंवा एखाद्या छोट्या दुकानातून घेत असाल तर जास्त काळजी घ्या. फोन खरा आहे की नाही हे कसं ओळखायचं, याच्या काही सोप्या ट्रिक्स आम्ही तुम्हाला सांगतो. Original or Fake Iphone 18 Pro:
नवीन फोन घेताना बॉक्स पण नीट तपासा. ॲपलचं पॅकेजिंग एकदम प्रीमियम असतं. छपाई एकदम स्पष्ट असते. जर बॉक्सवरची अक्षरं अस्पष्ट असतील, स्पेलिंग मिस्टेक असेल, किंवा बॉक्स फाटलेला, खराब झालेला असेल तर सावध व्हा.फक्त बॉक्स चांगला आहे म्हणून फोन ओरिजनल असेल असं नाही. आजकाल नकली बॉक्स पण भारी बनवतात. त्यामुळे बॉक्सवरची माहिती आणि फोनच्या आतली माहिती जुळते का ते बघणं गरजेचं आहे.
नकली आयफोनमध्ये सगळ्यात जास्त फरक कॅमेऱ्यात कळतो. iPhone 18 Pro चा कॅमेरा एकदम क्लिअर असतो. जर फोटो फुटलेले येत असतील, व्हिडिओची क्वालिटी खराब असेल तर तो खोटा असू शकतो. तसंच सिरीला बोलून बघा. “Hey Siri” बोला. जर सिरी व्यवस्थित उत्तर देत नसेल किंवा कामच करत नसेल तर तो आयफोन नाहीये.फोनचा स्पीड पण बघा. ओरिजनल आयफोन कधीच हँग होत नाही. जर फोन स्लो चालत असेल, अॅप उघडायला वेळ लागत असेल तर डाऊट घ्या.
जर तुम्ही वापरलेला फोन घेत असाल तर सेटिंगमध्ये Parts and Service History नावाचा ऑप्शन असतो. तिथे गेल्यावर कळतं की फोनमध्ये काही पार्ट बदललाय का. बॅटरी, डिस्प्ले, कॅमेरा ओरिजनल आहे की डुप्लिकेट बसवलाय हे तिथे समजतं.थोडक्यात काय तर घाई करू नका. फोन घेतल्यावर 10 मिनिटं काढून या सगळ्या गोष्टी चेक करा. नाहीतर लाखो रुपयांचं नुकसान होईल आणि मनस्ताप वेगळाच.