पुन्हा पुन्हा लॅपटॉप चार्ज करून हैराण झालात? या स्मार्ट ट्रिक्सने वाढवता येईल लॅपटॉपची बॅटरी लाइफ
आजच्या डिजिटल युगात लॅपटॉप हा आपल्या कामाचा आणि मनोरंजनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. आपले प्रोफेशनल काम असो वा वैक्तीगत आपण आपली सर्वच कामे लॅपटॉपवर सहज करू शकतो. परंतु अनेकदा लॅपटॉपचा वापर करताना आपल्याला कमी बॅटरी बॅकअपची समस्या आपल्याला त्रास देते. सामान्यतः लॅपटॉपची बॅटरी चार ते पाच तास चालते, परंतु काही वेळा आपण लॅपटॉपवर काही काम करतो ज्यामुळे बॅटरी लवकर डिस्चार्ज होऊ लागते. ज्यामुळे आपले कामावरची लक्ष हटते किंवा आपल्या कामात यामुळे व्यत्यय येतो. पुन्हा पुन्हा लॅपटॉप चार्ज केल्यामुळे तो गरम देखील होऊ लागतो. तुमच्यासोबतही असेच होत असेल तर आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्या तुमच्या फार कामी येणार आहेत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमच्या लॅपटॉपचा बॅटरी बॅकअप वाढवू शकता.
स्क्रीन ब्राइटनेस कमी ठेवा
लॅपटॉप स्क्रीनची ब्राइटनेस बॅटरीच्या वापरावर परिणाम करत असते. जर ब्राइटनेस जास्त असेल तर बॅटरी लवकर संपू लागते. तसेच जर ब्राइटनेस कमी किंवा मध्यम ठेवली तर बॅटरी जास्त काळ टिकण्यास मदत होईल. यासाठी कीबोर्ड शॉर्टकट किंवा सेटिंग्जद्वारे तुम्ही ब्राइटनेस कमी करू शकता.
AI Smartphones: AI फीचर्सने सुसज्ज नववर्षातील तगडे स्मार्टफोन्स; किंमत 20 हजाराहून कमी
बॅकग्राउंड ॲप्स बंद करा
अनेक वेळा लॅपटॉपमध्ये ॲप्स बॅकग्राउंडमध्ये चालू राहतात. तुम्ही लॅपटॉप चालू करताच हे ॲप्स बॅकग्राउंडमध्ये चालू होतात, ज्यामुळे बॅटरी झपाट्याने संपते.
तुम्ही टास्क मॅनेजर किंवा सेटिंग्जमध्ये जाऊन स्टार्टअप ॲप्स पर्यायावर जाऊन अनावश्यक ॲप्स बंद करू शकता. असे केल्याने, जेव्हा तुम्ही लॅपटॉप चालू कराल तेव्हा बॅकग्राउंडमध्ये चालणारे ॲप्स थांबतील आणि यामुळे तुमची बॅटरी लवकर संपणार नाही.
पॉवर सेव्हिंग मोडचा वापर करा
पॉवर सेव्हिंग मोड बॅटरीचे आयुष्य वाढवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत असतं. हा मोड Windows आणि macOS दोन्हींमध्ये प्रदान केला आहे, ज्यामुळे बॅटरीचा वापर कमी होईल. कंट्रोल पॅनल → पॉवर ऑप्शन्स वर जाऊन बॅटरी सेव्हर किंवा इको मोडवर सेट करा.
वाय-फाय आणि ब्लूटूथ ऑफ करा
अनावश्यक वाय-फाय आणि ब्लूटूथ ऑन करून ठेवल्यानेही बॅटरीचे आयुष्य कमी होऊ शकते. अशात तुम्हाला इंटरनेट किंवा ब्लूटूथची आवश्यकता नसल्यास, ते बंद करा. हे बॅटरीचे आयुष्य सुधारण्यास मदत करते.
Tech Tips: मोबाईल फोन चोरीला गेलाय? मग लगेच हे काम करा
लॅपटॉप ओव्हरहीट होऊ देऊ नका
लॅपटॉपचा अतिवापर केल्यास तो गरम होतो. लॅपटॉप जास्त गरम झाल्यास, त्याची बॅटरी देखील लवकर संपते. यामुळे शक्यतो तुमच्या लॅपटॉपला थंड आणि सपाट ठिकाणी ठेवा. लॅपटॉपला बेडवर ठेवून वापरू नका, यामुळे एअर व्हेंट्स ब्लॉक होतात ज्यामुळे लॅपटॉप गरम होऊ लागतो. आवश्यक असल्यास कूलिंग पॅड वापरा.