(फोटो सौजन्य: Pinterest)
आजकाल चोरीचे प्रकार फार वाढले आहेत. मोबाईल चोरी होणे किंवा हरवणे ही आजकाल सामान्य बाब बनली आहे. चालताना कोणाचाही फोन हिसकावला जाऊ शकतो. आजच्या या डिजिटल युगात आपला स्मार्टफोन आपल्यासाठी खूप महत्त्वाचा बनला आहे. यात आपल्या अनेक पर्सनल गोष्टी सेव्ह असतात ज्यामुळे याचे हरवणे अथवा चोरीला जाणे आपल्या समस्या वाढवू शकते.
तुमचा फोन चोरीला गेला किंवा हरवला तर घाबरून जाण्याऐवजी काही महत्त्वाची पावले त्वरित उचलली पाहिजेत. यामुळे तुमचा डेटा तर सुरक्षित राहीलच, पण फोन परत मिळण्याची शक्यताही वाढू शकते. योग्य वेळी उपाययोजना केल्यास नुकसान कमी होऊ शकते. आज आम्ही तुम्हाला या लेखात अशा काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांचा अवलंब करून तुम्ही तुमचा हरवलेला फोन ट्रॅक करू शकता आणि तो रिकव्हर देखील करू शकता. तुमचा हरवलेला मोबाईल फोन परत मिळवण्यात तुम्हाला यांची मदत मिळू शकते.
Free वाय-फायच्या नावाखाली होऊ शकते तुमची फसवणूक… वेळीच ‘या’ गोष्टी ध्यानात असूद्यात
अँड्रॉइड युजर्सने करावे हे काम
जर तुमच्याकडे अँड्रॉइड असेल तर ‘फाइंड माय डिव्हाइस’ (Find My Device) ॲप किंवा साइट चा वापर करा. तुम्ही हे android.com/find वर जाऊन आणि लॉग इन करून दुसऱ्या डिव्हाइसवर किंवा संगणकावर करू शकता. येथून तुम्ही फोन फॉरमॅट करू शकता आणि लाइव्ह ट्रॅक देखील करू शकता जर तो बंद नसेल आणि इंटरनेट चालू असेल.
आयफोन युजर्सने करावे हे काम
तुमच्याकडे आयफोन असल्यास, तुमच्या हरवलेल्या आयफोनला ट्रॅक करण्यासाठी Find My iPhone वापरा. तुम्ही icloud.com/find वर जाऊन इतर कोणत्याही iOS डिव्हाइस किंवा कम्प्युटरवर देखील प्रवेश करू शकता. त्याच्या मदतीने तुम्ही तुमचा बंद झालेला फोन देखील ट्रॅक करू शकता.
सिम कार्डला ब्लॉक करा
तुमच्या मोबाइल सर्व्हिस प्रोव्हायडरला कॉल करून सिम कार्ड ताबडतोब ब्लॉक करा. याचा फायदा असा होईल की चोर तुमच्या सिमकार्डचा गैरवापर करू शकणार नाही आणि तुम्हाला कोणत्याही नवीन अडचणीत सापडणार नाही.
Jio देत आहे फ्री Set-Top-Box! लाइव्ह टीव्ही चॅनेलसह मिळेल नेटफ्लिक्सचा आनंद
पोलिसांकडे तक्रार करा
अशी घटना घडल्यास जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन एफआयआर नोंदवा आणि आयएमईआय नंबर ब्लॉक करा. तुम्ही फोन बॉक्स किंवा बिलावर IMEI नंबर शोधू शकता.
आपले अकाउंट त्वरित ब्लॉक करा
तुमच्या सर्व ऑनलाइन अकाउंट्समधून लॉगआउट करा (जसे की Google, सोशल मीडिया, बँकिंग ॲप्स) आणि पासवर्ड बदला. आपण ते कम्प्युटरवरून देखील करू शकता. सर्व आवश्यक माहितीसह https://sancharsaathi.gov.in/ वर तक्रार करा. येथे तुम्हाला एफआयआरची प्रत मागितली जाईल. या पोर्टलवर तक्रार केल्यानंतर मोबाईल मिळण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते.