Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘अशाप्रकारे’ तुमचे YouTube Channel ठेवा सुरक्षित, कोणीच नाही करू शकणार हॅक

सध्या हॅकर्स कोणाला आपला शिकार बनवेल याचा नेम नाही. नुकतेच त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनल हॅक केले आहे. यासोबतच सर्वोच्च न्यायालयाचे यूट्यूब चॅनलवर हॅकर्सनी क्रिप्टोशी संबंधित व्हिडिओही पोस्ट केले आहेत. अशावेळी तुम्ही तुमचे युट्युब चॅनल कसे सुरक्षित ठेऊ शकतात याबद्दल आपण जाणून घेऊया.

  • By मयुर नवले
Updated On: Sep 20, 2024 | 08:31 PM
फोटो सौजन्य: Freepik

फोटो सौजन्य: Freepik

Follow Us
Close
Follow Us:

सध्या देशात खळबळ माजली आहे ती एका गोष्टीमुळे. ती म्हणजे चक्क देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे युट्युब चॅनल हॅकर्सने हॅक केले आहे. तसेच हॅकर्स मंडळींनी या चॅनलचे नाव बदलून त्यावर क्रिप्टो करन्सी संबंधित व्हिडिओ पोस्ट केले आहेत. अशावेळी जर तुमचे सुद्धा युट्युब चॅनल असेल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.

जर तुमच्या YouTube चॅनलचे सुद्धा लाखो सबस्क्राइबर्स असतील किंवा भविष्यात तुम्हाला युट्युबच्या माध्यमातून तुमचे करिअर चालू करायचे असेल तर तुम्हाला जास्त सावध राहण्याची गरज आहे. हॅकर्स अनेकदा नवीन आणि जुन्या चॅनलला लक्ष्य करतात. एकदा तुमचे YouTube खाते हॅक झाल्यानंतर तुम्ही तुमच्या चॅनलमध्ये प्रवेश करू शकणार नाही.

हे देखील वाचा: मोठी बातमी! सर्वोच्च न्यायालयाचे YouTube चॅनल हॅक, नेमकं कारण काय?

हॅकर्स तुमचे YouTube चॅनल कंट्रोल करू शकतात. तसेच ते विकू किंवा जाहिरात कमाईसाठी वापरू शकतात. जर तुमचे युट्युब चॅनल कधी हॅक झालेच तर तुम्ही काय केले पाहिजे? याबद्दल आपण सविस्तर माहिती घेऊयात.

कसे कळेल की आपले युट्युब चॅनल हॅक आहे की नाही?

एकदा का तुमचे YouTube चॅनल हॅक झाले की मग तुम्ही तुमचे चॅनल लॉग इन करू शकणार नाही. यासह, तुमच्या YouTube चॅनेलचे डिस्क्रिप्शन, प्रोफाइल पिक्चर, YouTube हँडल आणि इतर माहिती बदललेली दिसेल.

युट्युब चॅनल हॅक झाल्यास काय करावे?

जर तुमचे यूट्यूब अकाउंट हॅक झाले तर तुमच्यासमोर दोन परिस्थिती निर्माण होतील. पहिल्या प्रकरणात तुम्ही तुमचे चॅनल लॉग इन करू शकाल आणि दुसऱ्या प्रकरणात तुम्ही लॉग इन करू शकणार नाही. दोन्ही परिस्थितींमध्ये काय करावे याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया.

जर तुम्हाला चॅनल लॉगिन करता येत असेल तर काय करावे?

जर तुमचे अकाउंट हॅक झाल्यानंतरही लॉग इन होतं असेल, तर तुम्हाला सर्वप्रथम तुमचा पासवर्ड बदलणे आणि सर्व डिव्हाइसेसवरून अकाउंट लॉगआउट करणे आवश्यक आहे. चला याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती घेऊयात.

अकाऊंटचा पासवर्ड कसा बदलायचा?

स्टेप 1. सर्व प्रथम तुम्हाला ब्राउझरमध्ये Google अकाउंट लॉग इन करावे लागेल.
स्टेप 2. Google प्रोफाइल फोटोवर क्लिक करून, तुम्हाला Manage your Google Account वर टॅप करावे लागेल.
स्टेप 3. येथे तुम्हाला सिक्युरिटीवर टॅप करा आणि Google वर साइन इन करा.
स्टेप 4. येथे पासवर्ड पर्याय निवडल्यानंतर, तुम्हाला तुमचा नवीन पासवर्ड टाकावा लागेल. स्ट्रॉंग पासवर्ड ठेवण्याचा प्रयत्न करा.

सर्व डिवाइसमधून लॉगआउट कसे करावे?

स्टेप 1. सर्वप्रथम, तुमच्या Google अकाउंट लॉग इन करा.
स्टेप 2. Google प्रोफाइल चिन्हावर क्लिक करा आणि Manage your Google Account वर जा.
स्टेप 3. येथे तुम्ही सिक्युरिटी आणि युवर डिव्हायसेस या पर्यायावर टॅप कराल.
स्टेप 4. युवर डिव्हाइसेस पर्यायाच्या अंतर्गत, तुम्हाला सर्व डिव्हाइसेसची सूची मिळेल ज्यामध्ये तुमचे अकाउंट लॉग इन आहे. येथून जी डिवाइस तुम्हाला नसेल ती रिमूव्ह करा.

जर तुमचे चॅनल लॉग इन होतं नाही आहे तर काय करावे?

जेव्हा तुम्ही तुमचे YouTube चॅनल लॉग इन करू शकत नाही, तेव्हा तुमच्यासाठी YouTube अकाउंट रिकवरी प्रोसेस हा एकमेव पर्याय उरतो.

Web Title: How to secure youtube channel from hackers

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 20, 2024 | 08:31 PM

Topics:  

  • YouTube Channel

संबंधित बातम्या

YouTube वरील कमाईचा नवा मार्ग खुला, ‘हे’ फीचर क्रिएटर्सना बनवणार मालामाल
1

YouTube वरील कमाईचा नवा मार्ग खुला, ‘हे’ फीचर क्रिएटर्सना बनवणार मालामाल

2025 मधील सर्वात मोठी कारवाई! Google ने YouTube वरून हटवले तब्बल 11 हजार चॅनल्स, काय आहे कारण? जाणून घ्या
2

2025 मधील सर्वात मोठी कारवाई! Google ने YouTube वरून हटवले तब्बल 11 हजार चॅनल्स, काय आहे कारण? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.