फोटो सौजन्य - सोशल मीडिया
सर्वोच्च न्यायालय : आता एक सर्वाच्च न्यायालयासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे अधिकृत यूट्यूब चॅनल शुक्रवारी बंद म्हणजेच हॅक झाल्याची बातमी समोर आली आहे. चॅनलवर क्रिप्टोकरन्सी XRP ची जाहिरात व्हिडिओ दाखवली जात होती. XRP क्रिप्टोकरन्सी यूएस-आधारित कंपनी रिपल लॅब्सने विकसित केली आहे. सर्वोच्च न्यायालय घटनात्मक खंडपीठांसमोर सूचीबद्ध प्रकरणे आणि सार्वजनिक हिताच्या प्रकरणांची सुनावणी थेट प्रवाहित करण्यासाठी YouTube चॅनेल वापरलं जात आहे. अलीकडेच, कोलकात्याच्या आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील महिला प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या यूट्यूब चॅनेलवर थेट प्रक्षेपित करण्यात आली होती. असा मोठ्या घटना किंवा सुनावण्या या युट्युब चॅनेलवर दाखवल्या जातात.
आता यासंदर्भात असे सांगण्यात येत आहे की, सर्वोच्च न्यायालयाच्या YouTube चॅनेलवर अपलोड करण्यात आलेला व्हिडीओ हॅकर्सनी स्वतः खाजगी बनवला होता आणि ‘ब्रॅड गार्लिंगहाऊस: रिपल रिस्पॉन्स टू द एसईसी’च्या $2 बिलियन दंड! हॅक झालेल्या चॅनलवर ‘XRP किंमत अंदाज’ नावाचा एक रिक्त व्हिडिओ सध्या सुरु आहे.
Supreme Court of India’s YouTube channel appears to be hacked and is currently showing videos of US-based company Ripple. pic.twitter.com/zuIMQ5GTFZ
— ANI (@ANI) September 20, 2024
सध्या हॅकिंगचे क्राईम प्रचंड सुरु आहेत, त्यामुळे आजकाल, हॅकर्स मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय YouTube चॅनेल लक्ष्य करत आहेत. रिपलने स्वतःचे सीईओ ब्रॅड गार्लिंगहाऊसचे बनावट खाते तयार करण्यापासून हॅकर्सना रोखण्यात अयशस्वी झाल्याबद्दल YouTube वर आता दावा केला जात आहे.
सुप्रीम कोर्टाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, नेमके काय झाले याबद्दल आम्हाला खात्री नाही. मात्र संकेतस्थळाशी छेडछाड झाल्याचे दिसून येत आहे. ते म्हणाले की, शुक्रवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर ही समस्या उघडकीस आली आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आयटी टीमने एनआयसी (नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटर) कडे ती सोडवण्यासाठी मदत मागितली आहे.