
photo- Ai generated
काही छुपे कॅमेरे अंधारात रेकॉर्ड करण्यासाठी इन्फ्रारेड (IR) प्रकाशाचा वापर करतात. हा प्रकाश सामान्यतः मानवी डोळ्यांना दिसत नाही. परंतु काही स्मार्टफोन कॅमेरे तो ओळखू शकतात.
सर्वप्रथम तुमच्या हॉटेलच्या रुममधील सर्व लाइट्स बंद करा. पडदे ओढून घ्या जेणेकरून रुममध्ये पूर्णपणे अंधार होईल. त्यानंतर, तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा चालू करा आणि तो हळूहळू रुममभर फिरवा. फोनच्या स्क्रीनवर काही लहान, लुकलुकणारे दिवे दिसतात का, याकडे लक्ष द्या.
रुममधील एसी व्हेंट, टीव्ही, भिंतीवरील घड्याळ आणि इतर ठिकाणी काळजीपूर्वक पाहा. जिथे एक छोटा कॅमेरा लपवलेला असू शकतो. जर तुमच्या फोनच्या स्क्रीनवर एक लहान, लाल, जांभळा किंवा पांढरा चमकणारा ठिपका दिसला, तर त्या ठिकाणी कॅमेरा किंवा इन्फ्रारेड (IR) लाईट असलेले उपकरण असू शकते. परंतु, केवळ प्रकाश दिसल्याने तिथे छुपा कॅमेरा असेलच असे नाही.
ही पद्धत प्रत्येक स्मार्टफोनवर काम करेलच असे नाही. अनेक स्मार्टफोन कॅमेरे इन्फ्रारेड (IR) प्रकाश ओळखण्यास सक्षम नसतात. विशेषतः अनेक आयफोनच्या मागील कॅमेऱ्यांमध्ये IR फिल्टर्स असतात. त्यामुळे, जर तुम्हाला तुमच्या फोनच्या मागील कॅमेऱ्याने कोणताही प्रकाश दिसत नसेल, तर तुमच्या फ्रंट कॅमेऱ्याने किंवा सेल्फी कॅमेऱ्याने रुम स्कॅन करून पहा.
तुमच्या स्मार्टफोनचा फ्लॅशलाइटसुद्धा छुपा कॅमेरा लेन्स शोधायला मदत करू शकतो. रुममधील लाइट्स बंद करा आणि फोनचा फ्लॅशलाइट चालू करा. एसी व्हेंट, घड्याळ, टीव्ही आणि इतर संशयास्पद भागांवर प्रकाश टाका. काचेसारख्या दिसणाऱ्या कोणत्याही लहान रिफ्लेक्शनकडे लक्ष द्या.
जर कुठे कॅमेऱ्याची लेन्स असेल, तर त्यावर टॉर्चचा प्रकाश टाकल्यावर ती चमकू शकते. हे रिफ्लेक्शन निळे किंवा पांढरे दिसू शकते. जर तुम्हाला अशी चमक दिसली, तर त्या जागेची काळजीपूर्वक तपासणी करा. परंतु, प्रत्येक चमकदार वस्तू कॅमेऱ्याची लेन्स नसते. रुममधील इतर काचेच्या चमकदार पृष्ठभागांवरूनही असे रिफ्लेक्शन दिसू शकते.
छुपे कॅमेरे शोधण्यासाठी प्राथमिक पद्धत म्हणून तुमच्या स्मार्टफोनचा कॅमेरा आणि फ्लॅशलाइट वापरून तपासण्याचा विचार करा. सर्वच कॅमेरे इन्फ्रारेड (IR) प्रकाश वापरत नाहीत आणि प्रत्येक फोनचा कॅमेरा हा प्रकाश ओळखू शकत नाही. त्यामुळे, एखाद्या भागात रिफ्लेक्शन दिसल्याने तिथे कॅमेरा असल्याची खात्री होत नाही.
रुममधील संशयास्पद ठिकाणी कॅमेरा असल्याचा तुम्हाला दाट संशय असल्यास, हॉटेल व्यवस्थापनाला कळवा. गरज भासल्यास पोलिसांशी संपर्क साधा. कोणतेही संशयास्पद डिव्हाईस स्वतः उघडणे किंवा त्याला हात लावणे टाळा. हॉटेलच्या खोलीत कुटुंबासोबत वेळ घालवताना आपल्या प्रायव्हसीची महत्वाची आहे. त्यामुळे, हॉटेलमध्ये पोहोचल्यावर आपल्या खोलीचे निरीक्षण करून काही संशयास्पद डिव्हाईस आहेत का हे तपासा.
Ans: स्मार्टफोनचा कॅमेरा आणि फ्लॅशलाइट वापरून प्राथमिक तपासणी करा.
Ans: काही स्मार्टफोन कॅमेऱ्याचा IR प्रकाश ओळखू शकतात.
Ans: उपकरणाला हात न लावता हॉटेल व्यवस्थापन आणि पोलिसांना कळवा.