फोटो सौजन्य - pinterest
HP ने भारतात AI फीचर्ससह दोन जबरदस्त लॅपटॉप लाँच केले आहेत. यामध्ये HP EliteBook Ultra आणि HP OmniBook X यांचा समावेश आहे. या दोन्ही लॅपटॉप पर्सनल AI असिस्टंट फीचर्ससह लाँच करण्यात आले आहे. याशिवाय त्यात एक न्यूरल प्रोसेसिंग युनिटही देण्यात आलं आहे. कंपनीने हे दोन्ही लॅपटॉप व्यवसाय आणि रिटेल ग्राहकांसाठी लाँच केले आहेत. HP OmniBook आणि EliteBook Ultra या दोन्ही लॅपटॉपमध्ये HP AI Companion, Copilot+, Poly Camera Pro सारखे प्रगत AI फीचर्स देण्यात आले आहेत. दोन्ही लॅपटॉपमध्ये टचस्क्रीन डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. चला तर मग या दोन्ही लॅपटॉपविषयी अधिक माहिती जाणून घेऊया.
हेदेखील वाचा- Apple ने लाँच केलं Apple Watch For Your Kids फीचर! आता मुलांच्या सुरक्षेची चिंता मिटली
सर्वात आधी EliteBook Ultra बद्दल बोलूया. EliteBook Ultra मध्ये 2.2K पिक्सेल रिझोल्यूशनसह 14-इंच टचस्क्रीन IPS डिस्प्ले
देण्यात आला आहे. प्रोसेसर बद्दल बोलायचे झाले तर यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन X Elite X1E-78-100 आहे. यासोबतच AI फीचरला सपोर्ट करण्यासाठी Qualcomm Hexagon NPU देखील देण्यात आला आहे. स्टोरेजसाठी, यात 32GB पर्यंत LPDDR5X रॅम आणि 1TB पर्यंत SSD सपोर्ट आहे. EliteBook Ultra मध्ये ग्राफिक्ससाठी Qualcomm Adreno GPU देण्यात आला आहे. 59Wh बॅटरी 65W USB टाइप C फास्ट चार्जिंगसह प्रदान केली आहे. या लॅपटॉपमध्ये HP AI Companion, Copilot+, Poly Camera Pro सारखे प्रगत AI फीचर्स देण्यात आले आहेत.
हेदेखील वाचा- Google सर्चचे ‘हे’ फीचर्स तुमचा अनुभव बनवतील अधिक मजेदार! आत्ताच ट्राय करा
HP OmniBook X या HP लॅपटॉपमध्ये 2.2K रिझोल्यूशनसह 14 इंच स्क्रीन देण्यात आली आहे. हा लॅपटॉप Qualcomm Snapdragon X Elite X1E प्रोसेसरवर चालणार आहे. HP OmniBook X लॅपटॉपमध्ये स्टोरेजसाठी 16GB LPDDR5X रॅम आणि 1TB पर्यंत SSD साठी सपोर्ट आहे. यात 65W USB टाइप C फास्ट चार्जिंगसह 59Wh बॅटरी असेल. HP OmniBook X मध्ये देखील HP AI Companion, Copilot+, Poly Camera Pro सारखे AI फीचर्स आहेत.
HP EliteBook Ultra ची किंमत 1,69,934 रुपयांपासून सुरू होते. कलर ऑप्शनबद्दल बोलायचे झाले तर त्यात ॲटमॉस्फेरिक ब्लू शेड उपलब्ध असेल. तर HP OmniBook X ची किंमत 1,39,999 रुपयांपासून सुरू होते. यामध्ये यूजर्सला Meteor सिल्व्हर कलर ऑप्शन उपलब्ध आहे.