ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
Huawei Watch D2 स्मार्टवॉच भारतात लाँच करण्यात आले आहे. हुवावेच्या या नवीन स्मार्टवॉचमध्ये 1.82-इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या स्मार्टवॉचमध्ये ब्लूटूथ कॉलिंग आणि ECG सह स्किन टेंप्रेचरसारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. हे स्मार्टवॉच दमदार फीचर्सनी सुसज्ज आहे. टिकाऊपणाच्या बाबतीत, Huawei Watch D2 स्मार्टवॉच IP68 रेटिंगसह येते.
Huawei Watch D2 स्मार्टवॉच कंपनीने भारतात 34,499 रुपयांच्या किंमतीत लाँच केले आहे. ग्राहक हे स्मार्टवॉच Amazon, Flipkart आणि Rtcindia.net च्या वेबसाईटवरून खरेदी करू शकतात. लाँच ऑफरबद्दल बोलायचं झालं तर 5 ऑक्टोबरपर्यंत या स्मार्टवॉचवर 1 हजार रुपयांचे डिस्काऊंट ऑफर करत आहे. कंपनीने हे स्मार्टवॉच ब्लॅक आणि गोल्ड या दोन रंगात लाँच केले आहेत. (फोटो सौजन्य – X)
Huawei Watch D2 मध्ये 1.82 इंच AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याची पीक ब्राइटनेस 1,500 निट्स आहे. यामुळे हे वॉच उन्हात अगदी सहज वापरले जाऊ शकते. या वॉचमध्ये Always-on Display (AOD) मोड देण्यात आला आहे. ज्यामुळे तुम्ही नेहमी वेळ आणि महत्त्वाची माहिती पाहू शकता. बिपी तपासण्यासाठी या लेटेस्ट लाँच स्मार्टवॉचमध्ये मॅकेनिकल एयरबॅग फीचर देण्यात आला आहे, जो ब्लड प्रेशर तपासण्यासाठी मदत करतो.
हे स्मार्टवॉच एल्युमिनियम एलॉयद्वारे तयार करण्यात आलं आहे. त्यामुळे हे घड्याळ वजनाने हलके असले तरी मजबूत आहे. Huawei Watch D2 मध्ये Ambulatory Blood Pressure Monitorin (ABPM) फीचर देण्यात आलं आहे. याला यूरोपमध्ये CE-MDR मेडिकल डिवाइस सर्टिफिकेशन आणि चीनच्या National Product Administration कडून देखील सर्टिफिकेशन मिळालं आहे. म्हणजेच हे एक मेडिकली सर्टिफाइड डिवाइस आहे.
ब्लड प्रेशर ट्रॅकिंगव्यतिरिक्त, Huawei Watch D2 हे स्मार्टवॉच रियल-टाइम सिंगल-लीड ECG डेटा देखील देते. हे डिव्हाईस इर्रेगुलर हार्ट रिदम आणि संभाव्य आपत्कालीन परिस्थिती ओळखण्यास मदत करते. हे हार्ट रेट मॉनिटरिंग, SpO₂, झोपेचे निरीक्षण, स्ट्रेस मॉनिटरिंग यासारख्या इतर अनेक आरोग्य ट्रॅकिंग वैशिष्ट्यांसह देखील येते. हे वॉच तुमच्या आरोग्य मेट्रिक्सवर आधारित पर्सनलाइज्ड रिमाइंडर आणि हेल्थ रिपोर्ट देखील प्रदान करते. Huawei Watch D2 IP68 रेटिंगसह येते. हे Android आणि iOS दोन्ही डिव्हाईससह काम करते आणि Huawei Health अॅपद्वारे जोडले जाऊ शकते.
तुम्ही या स्मार्टवॉचद्वारे सरळ कॉल उचलू शकता, रिजेक्ट करू शकता आणि कॉल लॉग देखील पाहू शकता. यामध्ये नोटिफिकेशन, कॉल अलर्ट आणि हवामानाची माहिती देखील दिली जाते. ज्यांना फीटनेसची आवड आहे अशा लोकांसाठी या स्मार्टवॉचमध्ये 80 हून अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. पेअर केलेल्या अॅपद्वारे तुम्ही वॉच फेस देखील कस्टमाइझ करू शकता. बॅटरी लाइफबद्दल, कंपनी 7 दिवसांपर्यंत मध्यम वापराचा दावा करते. हे जलद चार्जिंगला देखील सपोर्ट करते.