तिरंग्या सोबत सेल्फी अपलोड करा आणि मिळवा हर घर तिरंगा सर्टिफिकेट (फोटो सौजन्य - istock)
भारत उद्या 15 ऑगस्ट रोजी 78 व्या स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. भारताच्या स्वातंत्र्यदिनाची तयारी सर्वत्र सुरु आहे. शाळा, कॉलेज, ऑफीस, बिल्डींग सर्व भारतीय उद्या 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहेत. उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतील. उद्याचा दिवस प्रत्येक भारतीसाठी खास आहे. उद्या भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 78 वर्षे पूर्ण होत आहे. उद्या आपण आपल्या स्वातंत्र्यांची 78 वर्षे साजरी करणार आहोत. उद्याच्या या खास दिवसासाठी सर्व भारतीय एकत्र यावेत यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक मोहिम सुरु केली आहे. ही मोहिम म्हणजे हर घर तिरंगा मोहिम.
हेदेखील वाचा- ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यामधील फरक तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या
‘हर घर तिरंगा’ मोहिमेचा तिसरा टप्पा ९ ऑगस्टपासून सुरू झाला आहे. ही मोहीम 15 ऑगस्टपर्यंत सुरु राहणार आहे. भारत सरकारचा हा उपक्रम देशाच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनाच्या उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतीय तिरंग्याला आदरांजली वाहण्यासाठी भारतीय नागरिकांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. यंदा ‘हर घर तिरंगा’ मोहिमेचे तिसरे वर्ष आहे. 2022 मध्ये प्रथमच आझादी का अमृत महोत्सवाचा भाग म्हणून ही मोहीम सुरू करण्यात आली.
या मोहिमेअंतर्गत, भारत सरकार नागरिकांना प्रत्येक घरात राष्ट्रध्वज आणि तिरंगा लावण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. तसेच या मोहिमेअंतर्गत तुम्ही भारताच्या तिरंग्या सोबत सेल्फी अपलोड केल्यास तुम्हाला हर घर तिरंगा सर्टिफिकेट देखील मिळणार आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला सांस्कृतिक मंत्रालयाने दिलेल्या प्रत्येक घरासाठी हर घर तिरंगा सर्टिफिकेट मिळू शकते.
हेदेखील वाचा- भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर भरगोस डिस्काऊंट! खरेदीची ही संधी चुकवू नका