15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन्ही दिवस भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. 15 ऑगस्ट रोजी आपल्याला स्वातंत्र्य मिळालं, त्यामुळे आपण 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिन आणि 26 जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिन साजरा करतो. पण या दोन्ही दिवशी ध्वज फडकवण्यामध्ये फरक असतो, हे तुम्हाला माहिती आहे का?
ध्वजारोहण आणि ध्वज फडकवणे यामधील फरक जाणून घ्या (फोटो सौजन्य - pinterest)
भारत यावर्षी 15 ऑगस्ट रोजी आपला 77 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी राजधानी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून भारतीय तिरंगा फडकवणार आहेत.
15 ऑगस्ट 1947 रोजी आपण ब्रिटीशांपासून स्वातंत्र्य झालो तर 26 जानेवारी रोजी आपले संविधान लागू झाले. त्यामुळे 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी हे दोन्ही दिवस भारतीयांसाठी अतिशय महत्त्वाचे आहेत.
आपल्या देशात दरवर्षी 26 जानेवारी आणि 15 ऑगस्ट या दोन्ही दिवशी भारतीय तिरंगा फडकवला जातो. पण या दोन्ही दिवशी ध्वज फडकवण्यामध्ये फरक असतो, हे तुम्हाला माहिती आहे का?
15 ऑगस्ट या स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाला दोरीद्वारे खालून वर नेले जातं, आणि त्यानंतर ध्वज उघडून तिरंगा फडकवला जातो. कारण 15 ऑगस्टला ब्रिटिशांचा युनियन जॅक खाली उतरवून भरताचा तिरंगा वरती चढवला गेला होता. म्हणून त्याला ध्वजारोहण असं म्हणतात.
26 जानेवारी रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज अगोदरच वर बांधलेला असतो, नंतर तो दोरीव्दारे उघडून फडकवला जातो. याला ध्वज फडकवणं असं म्हणतात.
15 ऑगस्ट रोजी देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात, तर 26 जानेवारी रोजी राष्ट्रपती राजपथ येथे ध्वज फडकवतात.