भारताच्या 78 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर भरगोस डिस्काऊंट (फोटो सौजन्य - pinterest)
भारत यंदा 78 वा स्वातंत्र्यदिन साजरा करणार आहे. यानिमित्ताने ई कॉमर्स वेबसाईट Amazon, Flipkart सह टेक कंपन्या croma, samsung, xiaomi, hp, apple देखील इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर भरगोस डिस्काऊंट देत आहे. ज्यामुळे तुम्ही अगदी कमी किंमतीत फोन, लॅपटॉप, स्मार्टवॉच, टॅबलेट, इअरबड्स, टिव्ही अशा वस्तूंची खरेदी करू शकता. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी करायची असल्यास ही एक उत्तम ऑफर आहे.
हेदेखील वाचा- Amazon, Flipkart की Vijay Sales, कुठे मिळणार धमाकेदार ऑफर्स आणि डिस्काऊंट? जाणून घ्या
Flipkart चा flagship सेल आज 13 ऑगस्टपासून सुरु झाला असून 15 ऑगस्ट ही सेलची शेवटची तारीख आहे. डिल्स चाहीये सबको, पर मिलेगी सिर्फ इंडिया को, असं या सेलचं स्लोगन आहे. या स्लोगनप्रमाणेच सेलमध्ये आकर्षक डिल देखील देण्यात येत आहेत. स्मार्टफोनवर सेलमध्ये 15 ते 20 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट दिलं जात आहे. त्यामुळे ग्राहकांना अगदी कमी किंमतीत चांगले फीचर्स असणारे स्मार्टफोन्स मिळणार आहेत. यामध्ये vivo V40 Pro 5G, realme c63 5G, Infinix Note 40X 5G, Nothing Phone (2a) Plus, POCO F6 5G, Motorola G85, POCO M6 Plus 5G, Xiaomi Civi Panda, Realme 13 Pro 5G Series या स्मार्टफोन्सचा समावेश आहे.
तसेच या सेलमध्ये टिव्ही आणि होम अप्लायंन्सेसवर 80 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट देण्यात येणार आहे. यामध्ये मायक्रोव्हेव, फ्रीज, एसी, वॉशिंग मशीन, यासांरख्या वस्तूंचा समावेश आहे. तर स्मार्टवॉच, टॅबलेट आणि ब्लुटूथ स्पीकरवर 50 ते 80 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट दिलं जात आहे.
हेदेखील वाचा- फ्लिपकॉर्टने सुरु केली Flipkart Minutes सर्विस! आता 15 मिनिटांत मिळणार सामानाची डिलीवरी
शिवाय croma देखील स्वातंत्र्यदिनानिमित्त इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर भरगोस डिस्काऊंट देत आहे. croma मधून खरेदी केल्यास तुम्हाला फोन, लॅपटॉप, स्मार्टवॉच, टॅबलेट, इअरबड्स, टिव्ही अशा वस्तूंवर 10 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट आणि कॅशबॅक देखील दिलं जाणार आहे. शिवाय खरेदीवर तुम्हाला काही गिफ्ट वाऊचर देखील मिळणार आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त सुरु असलेल्या samsung सेलमध्ये Galaxy Z Fold6, Galaxy Z Flip6, Galaxy Watch Ultra, QLED 4K smart tv, 28 L Convection Microwave या वस्तूंवर जबरदस्त डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. याशिवाय फ्रिज आणि वॉशिंग मशीनवर देखील अनेक ऑफर्स उपलब्ध आहेत.
HP मध्ये देखील स्वातंत्र्यदिनानिमित्त सेल सुरु आहे. येथे तुम्हाला लॅपटॉपच्या खरेदीवर 8 ते 20 टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. शिवाय विविध ऑफर्स देखील उपलब्ध आहेत. टेक कंपनी xiaomi ने देखील स्वातंत्र्यदिनानिमित्त सेल सुरु केला आहे. या सेलमध्ये तुम्हाला अनेक बँक ऑफर्स देखील मिळणार आहेत. 499 रुपयांवरील ऑर्डरवर फ्री होम डिलीव्हरी मिळणार आहे. Redmi 13C 5G, Redmi Smart Fire TV 32 2024 Edition, Xiaomi Pad 6, Redmi 13 5G, Redmi Watch 3 Active, Redmi Buds 5C, Xiaomi Robot Vacuum Cleaner S10, या वस्तूंवर सेलमध्ये मोठ्या प्रमाणात डिस्काऊंट देण्यात आलं आहे.