India Pakistan War: पाकिस्तानच्या कुरापती थांबेनाच! WhatsApp वर शेअर केल्या जातायत धोकादायक फाईल्स, ओपन करताच...
22 एप्रिल 2025 रोजी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पहलगाममध्ये हल्ला केला. यावेळ अनेक निष्पाप भारतीयांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई करण्यासाठी भारताने त्यांच्या देशाला केला जाणार पाणीपुरवठा बंद केला. यानंतर 6 मे रोजी रात्रीच्या सुमारास भारताने पाकिस्तानवर हल्ला करत त्यांची 9 दहशतवादी स्थळ उध्वस्त केली. यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानने 8 मे रोजी रात्री भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने पाकिस्तानचे हे हल्ले परतवू लावले. एवढंच नाही, तर भारताने पाकिस्तानच्या या हल्ल्यांना प्रत्युत्तर देखील दिलं.
भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या या युद्धादरम्यान आता सायबर अटॅकची मोठी बातमी समोर येत आहे. पाकिस्तान भारतीय नागरिकांना टार्गेट करून त्यांना वेगवेगळ्या फाईल्स पाठवत आहे. या फाईल्स जर ओपन केल्या तर स्मार्टफोन हॅक होऊ शकतो आणि संपूर्ण माहिती पाकिस्तानच्या हॅकर्सकडे जाऊ शकते. भारतीय नागरिकांच्या WhatsApp, Email व अन्य सोशल मीडिया अकाऊंटवर ‘Dance of the Hillary’ नावाने एक लिंक आणि फाईल शेअर केली जात आहे, ज्यामध्ये व्हायरस आहे. हा व्हायरस स्मार्टफोनमधील सर्व माहिती आपल्या शत्रू राष्ट्रापर्यंत पोहोचवू शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रत्येक भारतीयाने सावध राहणं गरजेचं आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
पाकिस्तानातून केल्या जाणाऱ्या या सायबर अटॅकबाबत आता अलर्ट जारी करण्यात आला आहे. यावेळी सांगण्यात आलं आहे की, जर तुमच्या WhatsApp, Email किंवा कोणत्याही सोशल मीडिया अकाऊंटवर कोणत्याही अनोळखी नंबरवरून किंवा अकाऊंटवरून ‘Dance of the Hillary’ नावाने एखादी फाईल शेअर करण्यात आली तर ती चूकूनही ओपन करू नका.
खरं तर हा एक धोकादायक सायबर अटॅक आहे. जर तुम्ही ही फाईल ओपन किंवा डाऊनलोड केली तर तुमची सर्व माहिती पाकिस्तानी हॅकर्सकडे जाऊ शकते. ज्यामुळे तुमच्या माहितीचा चुकीचा वापर केला जाऊ शकतो. याशिवाय जर तुम्हाला कोणत्याही अनोळखी नंबरवरून किंवा अकाऊंटवरून tasksche.exe फॉर्मेट फाइल किंवा .exe फॉर्मेट फाइल शेअर करण्यात आली असेल तर त्यावर देखील क्लिक करू नका. हेदेखील तुमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं.
या सायबर अटॅकद्वारे हॅकर्स तुमच्या डिव्हाईसमधील पर्सनल डेटा अॅक्सेस करू शकतात आणि त्याचा गैरवापर करू शकतात. यामुळे कोणत्याही अनोळखी नंबरवरून किंवा अकाऊंटवरून मेसेज आल्यास सावध राहा. याशिवाय जर एखाद व्हिडीओ तुम्हाला शेअर करण्यात आला असेल तर सावध राहा. भारतीयांची सुरक्षा लक्षात घेऊन सरकारने अनेक X हँडल्स ब्लॉक केले आहेत.
भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरु असलेल्या या तणावाचा फायदा हॅकर्सने घेतला असून नागरिकांचे स्मार्टफोन हॅक करण्यासाठी अनेक प्रयत्न केले जात आहे. अशी परिस्थितीत आपण सावध राहणं गरजेचं आहे. कारण सध्याच्या तणावाच्या वातावरणात आपली सुरक्षा आपल्या हातात आहे.