Operation Sindoor: जर इंडिया-पाकिस्तान युद्ध झालं, तर तुमची मदत करणार ही 5 महत्त्वाची गॅजेट्स! आत्ताच करा ऑर्डर
रोज ज्याप्रमाणे नवीन बातम्या कानावर पडत आहेत, त्याचा विचार करता पुढे काय होईल याचा अंदाज लावणं देखील कठीण आहे. कारण पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेला हल्ला, याचा बदला घेण्यासाठी भारताने केलेली कारवाई, 6 मे रोजी भारताने पाकिस्तानवर केलेला हल्ला या सर्व गोष्टींमुळे सर्वत्र भितीचे वातावरण निर्माण झालं आहे. पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर 6 मे रोजी भारताने देखील पाकिस्तानवर हल्ला केला आणि त्यांची दहशतवादी ठिकाणं उध्वस्त केली. 6 मे रोजी रात्री उशीरा हा हल्ला करण्यात आला.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध दिवसेंदिवस बिघडत आहेत. अशातच भारत – पाकिस्तान युद्ध होण्याची शक्यता देखील मोठ्या प्रमाणात वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत, आपण केवळ सरकार आणि सैन्यावर अवलंबून न राहता, स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी देखील तयार राहणे महत्वाचे आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान युद्ध झालं तर असे काही गॅझेट्स आहेत, जी तुमची मदत करू शकतात. हे गॅझेट्स तुमच्या अनेक अडचणींत तुमची मदत करणार आहे. यामध्ये सोलर चार्जिंग पॉवर बँक, हँड क्रँक रेडियो, टॅक्टिकल टॉर्च, मल्टीटूल किट आणि पोर्टेबल स्टोव यांचा समावेश आहे. ही गॅझेट्स कठीण परिस्थितीत तुमची मदत करणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर अचानक लाईट बंद गेली आणि अनेक दिवस आलीच नाही तर मोबाइल, टॉर्च आणि महत्त्वाचे डिवाइस चार्ज करण्यात अनेक अडचणी निर्माण होतात. अशावेळी केवळ सूर्यप्रकाश तुम्हाला मदत करू शकतो. सूर्यप्रकाशच्या मदतीने चालणारी सोलर चार्जिंग पॉवर बँक तुमची लाइफलाइन बनू शकतो. लाईट नसताना देखील हे गॅझेट डिव्हाईस चार्ज करण्यासाठी मदत करणार आहे.
युद्ध किंवा इमरजेंसीमध्ये सहसा मोबाईल नेटवर्क ठप्प होतो. अशावेळी केवळ रेडियोवर सुरु असणाऱ्या वृत्तांवर विश्वास ठेवला जाऊ शकतो. विशेष म्हणजे हँड क्रँक रेडियोला ऐकण्यासाठी बॅटरीची गरज नाही. तुम्ही याला तुमच्या हाताने फिरवून चार्ज करू शकता आणि भारत आणि जगभरातील ताज्या बातम्या ऐकू शकता.
टॅक्टिकल टॉर्च केवळ अंधार दूर करत नाही, तर तुमच्या सुरक्षेत देखील मदत करते. टॅक्टिकल फ्लॅशलाइट केवळ अंधार दूर करत नाही तर यामध्ये विंडो ब्रेकर आणि सेल्फ डिफेंस सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत.
मोठ्या मोठ्या अडचणींच्या वेळी तुम्हाला मल्टीटूल किट मदत करणार आहे. यामध्ये चाकू, प्लायर, स्क्रूड्राइवर, कैची, आणि अनेक महत्त्वाच्या टूल्स असतात.
गॅस संपला असेल तर पोर्टेबल स्टोव तुमची मदत करणार आहे. या सर्व गॅझेट्सची किंमत 1000 ते 6000 रुपयांच्या दरम्यान आहे. तुम्ही हे Amazon किंवा Flipkart वरून ऑर्ड करू शकता.