Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गॅस सिलेंडर बुकिंगसाठी लोकांची झुंबड! या अ‍ॅपने ChatGPT ला टाकले मागे, डाउनलोडमध्ये ठरला नंबर 1

LPG Cylinder Shortage: भारतात निर्माण झालेल्या गॅस सिलेंडर टंचाईचा फायदा IndianOil ONE अ‍ॅपला होत असल्याचे पाहायला मिळाले आहे. सर्वाधिक डाऊनलोड होणाऱ्या अ‍ॅप्सच्या यादीत IndianOil ONE ने बाजी मारली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 16, 2026 | 11:45 AM
गॅस सिलेंडर बुकिंगसाठी लोकांची झुंबड! या अ‍ॅपने ChatGPT ला टाकले मागे, डाउनलोडमध्ये ठरला नंबर 1

गॅस सिलेंडर बुकिंगसाठी लोकांची झुंबड! या अ‍ॅपने ChatGPT ला टाकले मागे, डाउनलोडमध्ये ठरला नंबर 1

Follow Us
Close
Follow Us:
  • गॅस बुकिंगसाठी लोकांचा ओघ वाढला, IndianOil ONE app प्ले स्टोअरवर अव्वल
  • ChatGPT दुसऱ्या क्रमांकावर! LPG मुळे IndianOil ONE app ची मोठी चर्चा
  • गॅस सिलेंडरच्या वाढत्या मागणीचा थेट परिणाम; IndianOil ONE app ट्रेंडिंगमध्ये अव्वल
अमेरिका आणि ईराण यांच्यामध्ये सुरु असलेल्या युद्धाचा परिणाम भारतात मोठ्या प्रमाणात होत असल्याचा पाहायला मिळत आहे. भारतात गॅस सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे. रांगेत थांबून आणि फोन करून कंटाळलेले ग्राहक आता अ‍ॅपच्या माध्यमातून गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी प्रयत्न करत आहे. याचा सर्वात जास्त फायदा IndianOil ONE अ‍ॅपला झाला आहे. ग्राहक हा अ‍ॅप डाऊनलोड करून गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अत्यंत कमी कालावधीत या अ‍ॅपची डाऊनलोड संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. यामुळे हा अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरील फ्रीमध्ये डाऊनलोड होणाऱ्या अ‍ॅप्सच्या यादीत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. या अ‍ॅपने एआय चॅटबॉट ChatGPT ला देखील मागे सोडलं आहे.

तुमचे Android डिव्हाईस सुरक्षित आहे का? नव्या त्रुटीमुळे हॅकर्स 1 मिनिटात चोरू शकतात फोनमधील डेटा, यूजर्सची चिंता वाढली

IndianOil ONE अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवरील सर्वाधिक डाऊनलोड झालेला अ‍ॅप ठरला आहे. या यादीत अव्वल असणारा चॅटजीपीटी आता दुसऱ्या स्थानावर आहे. मोठ्या रांगेत थांबण्यापेक्षा आता लोकं अ‍ॅपच्या माध्यमातून गॅस सिलेंडर बुक करण्याला प्राधान्य देत आहेत. अ‍ॅपवर होणाऱ्या गॅस बुकींगमुळे गॅस एजेंसी समोरील लोकांची गर्दी देखील कमी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

IndianOil ONE मध्ये फीचर्स काय आहेत?

हा अ‍ॅप कंपनीने ग्राहकांसाठी एक सेंट्रल प्लॅटफॉर्मच्या स्वरुपात तयार केला आहे. यामध्ये यूजर्सना LPG कनेक्शनची सर्व माहिती एक्सेस करण्याचा पर्याया मिळतो. IndianOil ONE अ‍ॅपच्या फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर ग्राहक या अ‍ॅपमध्ये LPG सिलेंडर बुकिंग, बुकिंग हिस्ट्री ट्रॅकिंग, डिस्ट्रीब्यूटर सर्च करणं आणि सर्विस रिक्वेस्ट मॅनेजमेंटसह इतर अनेक कामं पूर्ण करू शकतात. अ‍ॅपद्वारेच, यूजर्स त्यांचे वितरक बदलू शकतात आणि यांत्रिक सेवेची विनंती करू शकतात.

LPG सिलेंडरची मागणी वाढली

LPG सिलेंडरचा तुटवडा आहे. याच परिस्थितीत बुकिंग आणि डिलीव्हरी ट्रॅक करण्याऱ्या अ‍ॅप्सची डाऊनलोड संख्या देखील वाढत असल्याचे पाहायला मिळत आहे. IndianOil ONE सारखे अ‍ॅप्स यूजर्सना घरबसल्या गॅस सिलेंडर बुक करण्याची सुविधा देतात. यामुळे त्यांना वितरकाकडे जाऊन किंवा फोन करून गॅस सिलेंडर बुक करण्याची गरज पडत नाही.

Jio Recharge Plan: प्लॅन एक अन् फायदे अनेक! जिओ घेऊन आला डेटा आणि AI चा डबल धमाका, हा रिचार्ज तुमच्यासाठी ठरेल फायद्याचा

टॉप डाऊनलोड अ‍ॅप्सच्या यादीत या नावांचाही समावेश

इंडियनऑइल वन आणि चॅटजीपीटी व्यतिरिक्त, मनोरंजन आणि ई-कॉमर्स अ‍ॅप्सनाही फ्री चार्टच्या टॉप अ‍ॅप्समध्ये स्थान मिळाले. स्टोरी टीव्ही तिसऱ्या क्रमांकावर, फ्रीरील्स चौथ्या क्रमांकावर आणि मीशो पाचव्या क्रमांकावर आहे. इतर अ‍ॅप्समध्ये फ्लिपकार्ट, जिओहॉटस्टार, फोनपे आणि इंस्टाग्राम यांचा समावेश आहे. हा चार्ट सतत बदलत असतो आणि लोक कोणत्या वेळी कोणत्या कामांना प्राधान्य देत आहेत याची कल्पना देतो.

Web Title: Indianoil one become the most downloaded app on google play store because of gas cylinder shortage tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 16, 2026 | 11:45 AM

Topics:  

  • Gas Cylinder
  • google play store
  • LPG gas cylinder

संबंधित बातम्या

LPG सिलिंडरच्या किमती बदलल्या! तुमच्या खिशावर किती भार पडणार? पाहा आजचे ताजे दर
1

LPG सिलिंडरच्या किमती बदलल्या! तुमच्या खिशावर किती भार पडणार? पाहा आजचे ताजे दर

ग्रामीण भागात गॅसपुरवठ्यात विलंब, ग्राहकांमध्ये नाराजी; 25 दिवसांत सिलिंडर देण्याची मागणी
2

ग्रामीण भागात गॅसपुरवठ्यात विलंब, ग्राहकांमध्ये नाराजी; 25 दिवसांत सिलिंडर देण्याची मागणी

LPG New Rules: आता Booking ची पद्धतही बदलली? ‘या’ नियमांशिवाय एलपीजी गॅस Cylinder ची डिलिव्हरी होणार नाही
3

LPG New Rules: आता Booking ची पद्धतही बदलली? ‘या’ नियमांशिवाय एलपीजी गॅस Cylinder ची डिलिव्हरी होणार नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.