Infinix Zero 40 VS Nothing Phone 2a Plus: Infinix की nothing कोणता फोन देणार पैसेवसुल फिचर्स
Infinix आणि Nothing दोन्ही कंपन्यांनी आपले दमदार स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. दोन्ही कंपन्यांचे फिचर्स आणि किंमत वेगळी असली तरी दोन्ही फोन बेस्ट आहेत. पण यातील कोणता फोन तुमच्यासाठी बेस्ट ठरू शकते आणि तुम्हाला पैसेवसूल फिचर्स देऊ शकतो, हेच आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
Infinix Zero 40 आणि Nothing Phone (2a) Plus हे एकाच श्रेणीत ऑफर केलेले स्मार्टफोन आहेत. Infinix Zero 40 नुकताच लाँच करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही दोन फोनमध्ये गोंधळात असाल तर आम्ही येथे दोन्ही फोनच्या फिचर्स च्या आधारावर त्यांची तुलना करणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला दोघांची पूर्ण कल्पना येईल.
हेदेखील वाचा- ईमेल आणि जीमेलमध्ये काय आहे अंतर? 90 टक्के लोकांना माहीत नाही याचं उत्तर
Infinix Zero 40 भारतात Zero 30 चा उत्तराधिकारी म्हणून लाँच करण्यात आला आहे. फोनमध्ये उत्तम डिझाइन, कॅमेरा आणि अपग्रेडचा समावेश करण्यात आला आहे. त्याची किंमत 29,999 रुपयांपासून सुरू होते. Nothing Phone (2a) Plus या किंमत श्रेणीमध्ये येत नाही. अशा परिस्थितीत, जर तुम्ही या दोघांमध्ये गोंधळलेले असाल, तर येथे आम्ही दोन्हीची वैशिष्ट्ये आणि वैशिष्ट्यांच्या बाबतीत संपूर्ण तुलना करणार आहोत, जेणेकरून तुम्हाला दोघांची कल्पना येईल. (फोटो सौजन्य – Infinix-Nothing)
Infinix Zero 40 भारतात दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याच्या 12GB+ 256GB व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये आहे तर 12GB+512GB व्हेरिअंटची किंमत 30,999 रुपये आहे. Nothing Phone (2a) Plus दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. त्याच्या 8GB+256GB व्हेरिअंटची किंमत 27,999 रुपये तर 12GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 29,999 रुपये आहे.
Nothing Phone 2a Plus स्वस्त असल्याने दोन्ही फोन भारतात 30,000 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहेत. 12GB/256GB स्टोरेज पर्यायाची किंमत दोन्ही फोनसाठी समान आहे. तर Nothing Phone (2a) Plus चे बेस मॉडेल स्वस्त आहे. Infinix Zero 40 तीन रंगांमध्ये वायलेट गार्डन, मूव्हिंग टायटॅनियम आणि रॉक ब्लॅकमध्ये येतो, दुसरीकडे Nothing Phone (2a) Plus मेटॅलिक ग्रे आणि ब्लॅक कलरमध्ये खरेदी करता येतो. दोन्ही फोनमध्ये संरक्षणासाठी IP54 रेटिंग आहे.
हेदेखील वाचा- Apple iPhone 16 ची क्रेझ, खरेदीसाठी सलग 21 तास रांगेत उभा राहिला, या व्यक्तिने खरेदी केला मुंबईतील पहिला आयफोन 16
Infinix Zero 40 मध्ये 6.78 इंच FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तर Nothing Phone (2a) मध्ये 6.7 इंच FHD+ AMOLED डिस्प्ले आहे. Infinix Zero 40 मध्ये MediaTek Dimensity 8200 Ultimate प्रोसेसर देण्यात आला असून या फोनमध्ये Android 14 with XOS, 2+3 अपडेट पॉलिसी आहे. तर Nothing Phone (2a) मध्ये MediaTek Dimensity 7350 Pro प्रोसेसर देण्यात आला असून या फोनमध्ये Android 14 with Nothing OS, 3+4 अपडेट पॉलिसी आहे. Infinix Zero 40 स्मार्टफोन 108MP (OIS)+ 50MP+2MP कॅमेऱ्यासह लाँच करण्यात आला आहे. तर Nothing Phone (2a) मध्ये 50MP+50MP देण्यात आला आहे.