कोरोनाच्या काळात जगभरातील ऑनलाइन कामाच्या वाढत्या ट्रेंडमुळे केवळ इंटरनेटचा वापर झपाट्याने वाढला नाही, तर ईमेल, व्हॉट्सॲप सारख्या प्लॅटफॉर्मची मागणीही वाढली आहे. तुम्हाला ईमेलबद्दल बरेच काही माहित असेल, परंतु Gmail आणि ईमेलमध्ये काय फरक आहे हे तुम्हाला माहिती आहे का? 90 टक्के लोकांना या प्रश्नाचं उत्तर माहीत असणं अशक्य आहे. लोक सहसा या दोघांना समान मानतात, मात्र ईमेल आणि जीमेल या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आज आम्ही तुम्हाला ईमेल आणि जीमेल मधील फरक सांगणार आहोत.
ईमेल आणि जीमेलमध्ये काय आहे अंतर? 90 टक्के लोकांना माहीत नाही याचं उत्तर (फोटो सौजन्य - pinterest)
आजच्या डिजीटल जगात क्वचितच असा कोणी असेल ज्याचे ईमेल अकाऊंट नसेल. तुमचा स्मार्टफोन सुरु करण्यासाठी तुमच्याकडे ईमेल अकाऊंट असणं आवश्यक आहे.
ईमेल म्हणजे इलेक्ट्रॉनिक मेल. म्हणजेच, असे संदेश जे कोणत्याही इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसद्वारे पाठवले जातात. त्याला ईमेल म्हणतात.
लॅपटॉप, स्मार्टफोन, डेस्कटॉप आणि टॅब्लेट यांसारख्या इलेक्ट्रॉनिक डिव्हाईससह इंटरनेटद्वारे डिजिटल संदेश पाठवण्याचा ईमेल हा एक इलेक्ट्रॉनिक मार्ग आहे.
Gmail ची सेवा ईमेल संदेश पाठविण्याचे काम करते. जसे आपण ईमेल पत्त्यानंतर @gmail.com जोडतो.
राज्याच्या डिझास्टर मॅनेजमेंट कंट्रोल रूमला धमकीचा मेल
थोडक्यात सांगायचं झालं तर, Gmail संदेश पाठवण्याचे काम करते. तर ह्या संदेशाला ईमेल म्हणतात.