जपानची सैर करण्यापासून ते नवीन स्कूटी खरेदी करण्यापर्यंत... iPhone 17 च्या किंमतीत करू शकता ही कामं
दिर्घ प्रतिक्षेनंतर आयफोन 17 सिरीज लाँच केली आहे. यानिमित्ताने कंपनीने एका ईव्हेंटचे देखील आयोजन केले होते. या सिरीजमध्ये कंपनीने अनेक नवीन प्रोडक्ट्ससह आयफोन 17 सिरीज लाँच केली आहे. भारतात आयफोन 17 ची सुरुवातीची किंमत 82,900 रुपये ठेवण्यात आली आहे. पण जर आपण प्रो मॅक्स मॉडेलचा विचार केला तर 2TB व्हेरिअंटची किंमत दोन लाखांहून अधिक आहे. आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, आयफोन 17 ची सुरुवातीच्या किंमतीत म्हणजे 82,900 रुपयांत तुम्ही आणखी काय करू शकता? या किंमतीत तुम्ही जपान ट्रिपपापसून स्कूटी खरेदी करण्यापर्यंत अनेक गोष्टी खरेदी करू शकतात.
आयफोन 17 खरेदी करण्यापेक्षा तुम्ही टोकियोमध्ये फिरू शकता. आयफोन 17 खरेदी करण्यासाठी तुम्ही जितके पैसे देत आहात, तितक्याच पैशांत तुम्ही जगातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर शहरांपैकी एक असलेल्या टोकियो शहराला भेट देऊ शकता. दिल्लीहून टोकियोला जाण्याचा खर्च सुमारे 55,000 रुपये असेल. उरलेल्या पैशातून तुम्ही खरेदी आणि जेवणाचा आनंद घेऊ शकता.
जर तुम्ही बँकॉक फिरण्याचा विचार करत असाल तर तुमची ही ट्रीप आयफोन 17 खरेदी करण्यापेक्षा देखील स्वस्त असणार आहे. दिल्ली ते बँकॉक राउंड ट्रिप विमान भाडे 20,000 ते 25,000 रुपयांच्या दरम्यान असेल. (फोटो सौजन्य – Pinterest)
आयफोन 17 च्या किंमतीत तुम्ही लॅपटॉप आणि टॅब्लेट दोन्ही खरेदी करू शकतात. काही दिवसांतच ई कॉमर्स कंपन्यांचा सर्वात मोठा फेस्टिव्ह सेल सुरु होणार आहे. या सेलमध्ये तुम्ही लॅपटॉप आणि टॅबलेट अगदी कमी किंमतीत खरेदी करू शकता.
आयफोन 17 ची सुरुवातीची किंमत 82,900 रुपये ठेवण्यात आली आहे. या किंमतीत तुम्ही सुमारे 7 ग्रामपपर्यंतची अंगठी खरेदी करू शकता. म्हणजेच आयफोन 17 च्या किंमतीत तुम्ही एक सोन्याची ज्वेलरी खरेदी करू शकता. त्यामुळे खर्च करण्यापेक्षा तुम्ही एक चांगली आणि सुरक्षित गुंतवणूक करू शकता.
आयफोन 17 च्या किंमतीत तुम्ही तुमच्यासाठी आणि कुटूंबासाठी एक स्कूटी देखील खरेदी करू शकता. यामुळे प्रवासाचा ताण कमी होईल. जर तुम्ही शाळेत किंवा महाविद्यालयात शिकत असाल तर हे तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल.
जर तुम्हाला गेमिंगची आवड असेल, तर तुम्ही आयफोन 17 च्या किमतीत संपूर्ण गेमिंग सेटअप खरेदी करू शकता. या सेटअपमध्ये, तुम्ही PS5, गेमिंग मॉनिटर आणि अॅक्सेसरीज सहज खरेदी करू शकता.