Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 27 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

iOS 27 अपडेट लवकरच येणार; तुमच्या iPhone ला मिळणार का? येथे वाचा सपोर्टेड डिव्हाइसेसची संपूर्ण यादी

लवकरच आयफोन यूजर्ससाठी एक नवीन अपडेट जारी केलं जाणार आहे. या नव्या अपडेटमध्ये अनेक दमदार फीचर्सचा समावेश केला जाणार आहे. नवीन अपडेट कोणत्या आयफोन मॉडेल्सना मिळणार याची यादी देखील समोर आली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 05, 2026 | 10:38 AM
iOS 27 अपडेट लवकरच येणार; तुमच्या iPhone ला मिळणार का? येथे वाचा सपोर्टेड डिव्हाइसेसची संपूर्ण यादी

iOS 27 अपडेट लवकरच येणार; तुमच्या iPhone ला मिळणार का? येथे वाचा सपोर्टेड डिव्हाइसेसची संपूर्ण यादी

Follow Us
Follow Us:
  • iOS 27 मध्ये AI-आधारित Siri आणि advanced फोटो एडिटिंग फीचर्स मिळण्याची शक्यता आहे.
  • हे अपडेट WWDC 2026 मध्ये सादर होऊन सप्टेंबरमध्ये सर्वांसाठी रिलीज होऊ शकते.
  • iPhone 12 आणि त्यानंतरच्या मॉडेल्सना अपडेट मिळेल, पण सर्व AI फीचर्स फक्त नवीन डिव्हाईसवरच उपलब्ध असतील.
गेल्या काही दिवसांपासून आओएस 27 बाबत सुरु असलेल्या चर्चा मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. कारण यावेळी नव्या अपडेटमध्ये फोकस केवळ डिझाईन किंवा छोट्या अपग्रेडवर नाही तर मोठ्या एआय अपग्रेड्सवर असणार आहे. इतर टेक कंपन्यांप्रमाणेच टेक जायंट कंपनी अ‍ॅपल देखील यावेळी त्यांच्या डिव्हाईसमध्ये एआय अधिक पावरफुल बनवण्याचा विचार करत आहे. नव्या अपडेटमध्ये अ‍ॅपल इंटेलिजेंसच्या अनेक नवीन फीचर्सचा समावेश असणार आहे. आओएस 27 अपडेट कधी जारी केले जाऊ शकते, हे अपडेट कोणत्या डिव्हाईसना मिळणार आहे आणि या अपडेटमध्ये काय खास असणार आहे, याबाबत आता जाणून घेऊया.

Google I/O 2026: तारखी ठरली! या दिवशी सुरु होणार मोठा टेक ईव्हेंट, AI पासून Android पर्यंत काय असणार खास? वाचून व्हाल हैराण

आओएस 27 अपडेट काय असणार खास?

रिपोर्ट्सवरून असा अंदाज लावला जात आहे की, आयओएस 27 मध्ये यूजर्सना एक पूर्णपणे अपग्रेडेड सिरी मिळू शकते, जी आता विजुअल अवेयरनेस देखील ऑफर करणार आहे. याचा अर्थ असा आहे की, आता तुम्ही कॅमेरा चालू करून सिरीला कोणतीही वस्तू, टेक्स्ट किंवा पॅकेजिंगबाबत माहिती विचारू शकणार आहात. यानंतर कही क्षणातच सिरी तुम्हाला सर्व माहिती देणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

एवढंच नाही तर फोटोज अ‍ॅपमध्ये AI बेस्ड एडिटिंग टूल्स मिळण्याची देखील शक्यता आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही फोटो एक्सपांड, रीफ्रेम आणि एन्हांस करू शकणार आहात. यासोबतच सिरीसाठी वेगळा अ‍ॅप इंटरफेस आणि मल्टीटास्किंग सपोर्ट देखील ऑफर केला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय थर्ड-पार्टी AI एजेंट्सचा सपोर्ट अ‍ॅप स्टोअरद्वारे जोडला जाऊ शकतो. व्हिज्युअल इंटेलिजन्सची वैशिष्ट्ये आणखी स्मार्ट होतील.

आयओएस 27 अपडेट कधी जारी केलं जाणार?

आयओएस 27 अपडेट पहिल्यांदा WWDC 2026 मध्ये सादर केले जाऊ शकते. 8 जून रोजी या अपडेटची पहिली झलक पाहायला मिळणार आहे. यानंतर सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये आयफोन 18 प्रो सिरीज आणि नवीन आयफोन अल्ट्रा सोबत आयओएस 27 अपडेट सर्वांसाठी उपलब्ध करू शकते.

BGMI 4.4 Update: लवकरच येणार नवं अपडेट; ‘सुपरफास्ट गाडी’ आणि नवीन मॅप्ससह गेमिंग अनुभव बदलणार

कोणत्या आयफोन डिव्हाईसना मिळणार नवं अपडेट?

नवीन सीरीज

  • आयफोन 18, 18 प्रो, 18 प्रो मॅक्स, आयफोन फोल्ड

मिड-जनरेशन डिव्हाईस

  • आयफोन 17, 17 प्रो, 17 प्रो मॅक्स, 17 ई, आयफोन एअर
  • आयफोन 16, 16 प्लस, 16 प्रो, 16 प्रो मॅक्स, 16 ई

जुने सपोर्टेड डिव्हाईस

  • आयफोन 15 सीरीज
  • आयफोन 14 सीरीज
  • आयफोन 13 सीरीज
  • आयफोन 12 सीरीज
  • आयफोन एसई (3rd Gen, 2022)
लक्षात ठेवा की, अ‍ॅपल इंटेलिजेंसचे सर्व AI फीचर्स प्रत्येक डिव्हाईसवर उपलब्ध असणार नाहीत. कंपनी हे फीचर्स केवळ आयफोन 15 प्रो आणि त्यानंतरच्या मॉडेल्ससाठीच उपलब्ध करून देऊ शकते.

Web Title: Ios 27 update will release soon here is the supported iphone device list tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 05, 2026 | 10:38 AM

Topics:  

  • apple
  • Apple iOS
  • iphone

संबंधित बातम्या

भारतातील Apple यूजर्सना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती… आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे
1

भारतातील Apple यूजर्सना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या या डिव्हाईसच्या किंमती… आता ग्राहकांना मोजावे लागणार अधिक पैसे

अरे देवा…Tata Electronic वर सायबर अटॅक! Apple-Tesla चे ट्रेड सीक्रेट्स केले हॅक…
2

अरे देवा…Tata Electronic वर सायबर अटॅक! Apple-Tesla चे ट्रेड सीक्रेट्स केले हॅक…

Smartphone Price Dropped: iPhone खरेदीची हीच योग्य वेळ! Amazon वर मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट, नवी किंमत पाहून थक्क व्हाल
3

Smartphone Price Dropped: iPhone खरेदीची हीच योग्य वेळ! Amazon वर मिळतंय जबरदस्त डिस्काऊंट, नवी किंमत पाहून थक्क व्हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.