Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 16 येताच iPhone 15 आणि 14 च्या किमतीत मोठी कपात, त्वरित जाणून घ्या नवीन किमती

iPhone 16 सिरीज जागतिक स्तरावर लाँच करण्यात आली आहे. या सीरिजमध्ये एकूण चार मॉडेल्स आहेत. AI वैशिष्ट्यांसह सुसज्ज असलेल्या सिरीजची सुरुवातीची किंमत 79900 रुपये आहे. नवीन मालिका लाँच केल्यामुळे, Apple ने जुन्या iPhone 15 आणि iPhone 14 सह अनेक मॉडेल्सच्या किमतीत कमालीची घट केली आहे. त्यानंतर त्यांच्या नवीन किंमती मोठ्या प्रमाणात कमी झाल्या आहेत.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 10, 2024 | 08:58 AM
iPhone 16 येताच iPhone 15 आणि 14 च्या किमतीत मोठी कपात, त्वरित जाणून घ्या नवीन किमती

iPhone 16 येताच iPhone 15 आणि 14 च्या किमतीत मोठी कपात, त्वरित जाणून घ्या नवीन किमती

Follow Us
Close
Follow Us:

ॲपलने आपल्या Glowtime इव्हेंटमध्ये iPhone 16 सिरीज लाँच केली आहे. ही सिरीज Apple Intelligence सह आणण्यात आली आहे. यावेळी सर्व मॉडेल्समध्ये ॲक्शन बटण देण्यात आले आहे. तसेच, सर्व iPhone मॉडेल्समध्ये 48MP मुख्य कॅमेरा आहे. नवीन iPhone लाँच करण्यासोबतच कंपनीने जुन्या iPhone 15 आणि iPhone 14 च्या किमती कमी केल्या आहेत.

iPhone 15 ची किंमत झाली कमी

आयफोन 16 च्या 128 GB व्हेरियंटची सुरवातीची किंमत $799 आणि iPhone 16 Plus साठी $899 वर सेट केली गेली आहे. त्याचबरोबर Apple चा जुना iPhone 15 आता जवळपास 10 हजार रुपयांनी स्वस्त करण्यात आला आहे. म्हणजेच आता, ग्राहकांना आता 128 GB व्हेरियंटसाठी $699 (रु. 58,688) द्यावे लागतील.

हेदेखील वाचा – iPhone 16 vs iPhone 15: आयफोन 15 पेक्षा आयफोन 16 किती वेगळा आहे? खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या या गोष्टी

iPhone 14 च्या किमतीतही झाली कपात

ॲपल iPhone 14 ची किंमत देखील आता कमी करण्यात आली आहे. आयोफोन 14 देखील आता $599 म्हणजेच अंदाजे 50,000 रुपयांना खरेदी करता येईल. ही किंमत त्याच्या 128 GB स्टोरेज वेरिएंटसाठी आहे. तुम्ही आता iPhone SE $429 च्या सुरुवातीच्या किमतीत खरेदी करू शकता, जी अंदाजे 36000 रुपये इतकी आहे.

iPhone 16 सिरीज किंमत

iPhone 16

128GB: 79,900 रुपये
256GB: 89,900 रुपये
512GB: 1,09,900 रुपये

iPhone 16 Plus

128GB: 89,900 रुपये
256GB: 99,900 रुपये
512GB: 1,19,900 रुपये

iPhone 16 Pro

128GB: 1,19,900 रुपये
256GB: 1,29,900 रुपये
512GB: 1,49,900 रुपये
1TB: 1,69,900 रुपये

iPhone 16 Pro Max

256GB: 1,44,900 रुपये
512GB: 1,64,900 रुपये
1TB: 1,84,900 रुपये

  हेदेखील वाचा – Samsung Galaxy S24 आणि S23 सिरीजसाठी लाँच झालं नवीन अपडेट! AI फीचर्ससह फोन वापरण्याचा अनुभव होईस अधिक मजेदार

नवीन iPhone 16 मध्ये काय खास आहे

आपल्याला iPhone 16 मध्ये एक नवीन चिपसेट पाहायला मिळेल. Apple ॲपल A18 प्रोसेसर देऊ शकते. यामध्ये आम्हाला 6.1-इंचाचा डिस्प्ले देखील उपलब्ध होईल. याशिवाय या स्मार्टफोनच्या डिझाईनच्या बाबतीतही मोठा बदल पाहायला मिळू शकतो. फोनमध्ये iOS 18 दिला जाईल. यासोबतच ॲपल इंटेलिजन्सचाही सपोर्ट यात असणार आहे. कंपनी ॲक्शन बटण आणि प्रो मॉडेलसारखे नवीन बटण देऊ शकते. या सीरिजसाठी प्री-ऑर्डर 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता सुरू होतील. तर याची विक्री 20 सप्टेंबरपासून सुरू करण्यात येईल

Web Title: Iphone 15 and 14 huge price cut as soon as iphone 16 arrives check the new price immediately

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 10, 2024 | 08:58 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.