ॲपल कंपनीद्वारे आता आयफोन 16 भारतात लाँच करण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही नवीन आयफोन घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही आयफोन 15 आणि आयफोन 16 पैकी नक्की कोणता फोन खरेदी करावा , कारण दोन्ही फोनच्या किंमतीत फक्त 10,000 रुपयांचा फरक आहे. असे फोन खरेदी करण्यापूर्वी जाणून घ्या दोन फोनमध्ये काय फरक आहे आणि नवीन iPhone 16 जुन्या iPhone 15 पेक्षा किती वेगळा आहे?
आयफोन 16 चा ओव्हरऑल साइझ आणि शेपआयफोन 15 सारखाच आहे. तसेच असाच 6.1 इंचाचा डिस्प्ले उपलब्ध आहे. जर आपण याच्या बदलांबद्दल बोललो तर, आयफोन 16 सीरिजला एक नवीन पिल शेप्ड आकाराचा बॅक कॅमेरा उपलब्ध आहे. बेझल्स पूर्वीपेक्षा किंचित कमी झाले आहेत, परंतु प्रो मॉडेलइतके कमी नाही.
हेदेखील वाचा – Samsung Galaxy S24 आणि S23 सिरीजसाठी लाँच झालं नवीन अपडेट! AI फीचर्ससह फोन वापरण्याचा अनुभव होईस अधिक मजेदार
आयफोन 15 मध्ये ॲक्शन बटण उपलब्ध नाही, परंतु यावेळी ॲक्शन बटण आयफोन 16 मध्ये प्रदान करण्यात आले आहे. तसेच एकदम नवीन कॅमेरा कंट्रोल बटण देण्यात आले आहे. हे फोटो आणि व्हिडिओ दरम्यान लक्ष केंद्रित करण्यात मदत करेल. यामुळे एकूणच, चांगला फोटो क्लिक करणे सोपे होईल. फोनच्या आकारात आणि वजनात कोणताही बदल झालेला नाही. पाहिल्यासारखेच फोनला USB-C पोर्ट आणि IP68 रेटिंग मिळेल.
जर आपण आयफोन 15 सीरीजच्या तुलनेत आयफोन 16 बद्दल बोलणे केले, तर यातील सर्वात मोठा बदल नवीन Apple A18 चिप असेल. हे दुसऱ्या पिढीच्या 3nm तंत्रज्ञानावर आधारित आहे. या तंत्रज्ञानावर दुसरा कोणताही फोन नाही. iPhone 15 मध्ये A16 Bionic चिप देण्यात आली आहे. नवीन Apple A18 चिपसेट AI वैशिष्ट्यांना सपोर्ट करेल, जो iPhone 15 मध्ये मिळणार नाही. जर तुम्हाला आयफोनमध्ये AI फीचर वापरायचे असेल तर तुम्हाला नवीन iPhone 16 घ्यावा लागेल. iPhone 16 8GB रॅमसह येतो, तर iPhone 15 स्मार्टफोन 6GB रॅम सपोर्टसह येतो. Apple A18 चिपसेट ChatGPT आणि सर्व नवीन Siri सपोर्टसह येईल.’
हेदेखील वाचा – स्मार्टफोनमधील धुळीने हैराण झालात? हे अल्कोहोल करेल मदत; फोन चालेल नव्या सारखा
आयफोन 16 ला नवीन फिजिकल कॅमेरा कंट्रोल मिळेल. हे कॅमेरा ॲप आणि तृतीय पक्षांसाठी सानुकूलित केले जाऊ शकते. iPhone 15 च्या बेस मॉडेलमध्ये 48MP मुख्य कॅमेरा आहे. आणखी एक 12MP कॅमेरा देखील देण्यात आला आहे. हाच कॅमेरा सेटअप iPhone 16 मध्ये दिसेल. तथापि, यात मॅक्रो फोटोग्राफीसाठी समर्थन आहे. AI सपोर्टच्या मदतीने iPhone 16 मध्ये फोटो एडिटिंग फीचर उपलब्ध आहे.
ॲपलच्या मते, iPhone 16 मध्ये 22 तासांचा व्हिडिओ प्लेबॅक उपलब्ध आहे, जो iPhone 15 मध्ये 20 तासांचा आहे. याचा अर्थ बॅटरी लाइफमध्ये 10 टक्के वाढ होईल. लीक झालेल्या रिपोर्टनुसार, iPhone 16 मध्ये 3561mAh बॅटरी असेल, तर iPhone 15 मध्ये 3349mAh बॅटरी असेल.