iPhone 17 Air की iPhone 17 Slim? कोणत्या नावाने लाँच केला जाणार Apple चा सर्वात पातळ iPhone?
टेक जायंट कंपनी Apple ने अलीकडेच एका मोठ्या ईव्हेंटची घोषणा केली आहे. कंपनीने पुढील महिन्यात म्हणजेच सप्टेंबरमध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या ईव्हेंटची तारीख देखील जाहिर केली आहे. कंपनीने त्यांच्या एक्स अकाऊंटवर शेअर केलेल्या पोस्टनुसार, Awe Dropping नावाचा ईव्हेंट पुढील महिन्यात 9 सप्टेंबर रोजी आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी त्यांच्या आगामी आयफोन सिरीज 17 सोबत इतर अनेक डिव्हाईस लाँच करणार आहे.
कंपनीच्या आगामी आयफोन सिरीजमध्ये एक बेस, एक प्रो आणि एक प्रो मॅक्स व्हेरिअंटचा तर समावेश असणार आहे. मात्र यासोबतच कंपनी या सिरीजमध्ये आणखी एका नव्या मॉडेलचा समावेश असणार आहे. हे मॉडेल म्हणजे Air मॉडेल. रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, Air हा आतापर्यंतचा सर्वात पातळ आयफोन असणार आहे. मात्र या स्लिम आयफोनच्या नावाबाबत सोशल मीडियावर गोंधळ उडाला आहे. हा आगामी आयफोन नक्की कोणत्या नावाने लाँच केला जाणार, याबात युजर्स गोंधळले आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टनुसार, आगामी सिरीजमधील सर्वात पातळ आयफोन हा iPhone 17 Air या नावाने लाँच केला जाऊ शकतो. तर सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या काही पोस्टनुसार, हा पातळ आयफोन हा iPhone 17 Slim या नावाने लाँच केला जाऊ शकतो. कंपनीने अद्याप अधिकृतपणे या आगामी पातळ आयफोच्या नावाबाबत कोणतीही माहिती दिली नाही. तथापि, एका अॅक्सेसरीज उत्पादक कंपनीने माहिती दिली आहे की हे डिव्हाइस iPhone 17 Slim नसून iPhone 17 Air असणार आहे.
काही रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला आहे की, अॅपलचा सर्वात पातळ आयफोन हा iPhone 17 मॉडल ‘स्लिम’ नाही तर ‘एयर’ नावाने लाँच केला जाऊ शकतो. @FrigidJW या यूजरने एक्सवर शेअर केलेल्या एका फोटोमध्ये असे दिसून आले आहे की येणाऱ्या iPhone 17 सीरीजमध्ये iPhone 17 Air व्हेरिअंटचा समावेश असेल. ही यादी मॅन्युफॅक्चरर, सप्लायर आणि किरकोळ विक्रेत्यांकडून अॅक्सेसरी ऑर्डर ट्रॅक करण्यासाठी आणि व्यवस्थापित करण्यासाठी तयार केलेली दिसते.
अनेक रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की, iPhone 17 Air खूपच पातळ असणार आहे, ज्याची जाडी फक्त 5.5 मिमी असू शकते. त्याच्या बेस मॉडेलची किंमत 949 डॉलर म्हणजेच सुमारे 83,000 रुपये असण्याची अपेक्षा आहे. कंपनी हे डिव्हाइस काळ्या, हलक्या निळ्या, हलक्या सोनेरी आणि पांढऱ्या रंगात लाँच करू शकते. तसेच, या डिव्हाइसमध्ये 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 6.6 इंचाचा प्रमोशनल डिस्प्ले असू शकतो. तसेच, या फोनमध्ये A19 प्रो चिपसेट आणि 3,000mAh बॅटरी असू शकते.