कॉल रेकॉर्डिंग महागात पडू शकते, iPhone चे फीचर वापरण्यापूर्वी या गोष्टी समजून घ्या
जगभरात आयफोनचे लाखो युजर्स आहेत. प्रसिद्ध टेक कंपन्यांमध्ये आयफोनचे नाव प्रामुख्याने समोर येते. कंपनीने नुकतीच आपली आयोफोन 16 सिरीज लाँच केली, जिला युजर्सचा उत्तम प्रतिसाद मिळाला. तुम्हीही आयोफोन युजर असाल तर आजची ही बातमी तुमच्या फायद्याची ठरू शकते. अनेकजण आपल्या स्मार्टफोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगच्या फिचरचा वापर करतात. तुम्ही तुमच्या आयफोनमध्ये (iPhone) या फीचरला वापर करण्याचा विचार करत असाल तर प्रथम काही गोष्टी समजून घेणे महत्त्वाचे आहे.
लोकांकडून मागणी असल्याने कंपन्या कॉल रेकॉर्डिंगवर सतत काम करत आहेत. यूजर्सची मागणी लक्षात घेऊन आयफोनमध्येही कॉल रेकॉर्डिंगचे नवीन फीचर दिले जात आहे. मात्र, हे फीचर वापरण्यापूर्वी तुम्ही अनेक गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. कारण एक चूक तुमच्या अडचणी वाढवू शकते. आज आम्ही तुम्हाला काही टिप्सची माहिती देणार आहोत, ज्या कॉल रेकॉर्डिंग दरम्यान तुमच्या कामी येतील.
हेदेखील वाचा – 5 वर्ष जुन्या स्मार्टफोनचा डिस्प्लेही होईल नव्यासारखा, फक्त या सेटिंग्ज करा
भारतात इतर देशांप्रमाणे कॉल रेकॉर्डिंग बेकायदेशीर नाही. येथे कोणतेही दोन लोक त्यांच्यातील संभाषण रेकॉर्ड करू शकतात. जेव्हा तुम्ही कॉल रेकॉर्डिंग सुरू करता तेव्हा सहसा एक सूचना दिली जाते. या नोटिफिकेशनच्या मदतीने दुसऱ्या यूजरलाही कळते की त्याचा कॉल रेकॉर्ड होत आहे. यामुळेच अनेक युजर्स असे करणे टाळतात. तथापि, असे अनेक देश आहेत जेथे तुम्ही कॉल रेकॉर्ड करू शकत नाही आणि तसे केल्यास तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते.
कॉल रेकॉर्डिंगचे फिचर
अँड्रॉइड डिव्हाइसवर कॉल रेकॉर्डिंग फीचर आधीच दिले जात आहे. अनेक स्मार्टफोन्समध्ये यासंबंधीची सूचना आधीच देण्यात आली आहे. तुम्हीही असेच करत असाल तर तुमच्यासाठी खूप कठीण जाऊ शकते. आम्ही तुम्हाला सांगतो की, चुकूनही हे करू नये. कॉल रेकॉर्डिंगबाबत तुम्ही खूप सावध असले पाहिजे. मात्र, सध्या ॲपल आयफोन युजर्सना कॉल रेकॉर्डिंगची सुविधा देत आहे.
हेदेखील वाचा – आधार कार्ड शेअर करण्यापूर्वी या दोन गोष्टी करा, अन्यथा होईल नुकसान
कसे करू शकता रेकॉर्डिंग?
कॉल रेकॉर्डिंग फीचर स्मार्टफोनमध्ये कंपन्यांकडून स्वतंत्रपणे दिले जात आहे. तुम्हालाही कॉल रेकॉर्ड करायचे असेल तर तुम्हाला त्या फीचरवर क्लिक करावे लागेल. एकदा तुम्ही त्यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंग सुरू होईल.