स्वस्त iPhone SE 4 लाँचची तयारी सुरु, ऍपल इंटेलिजेंस आणि 48MP कॅमेरासह करणार एंट्री
टेक कंपनी Apple ने काही दिवसांपूर्वीच iPhone 16 सीरीज लाँच केली. त्यानंतर आता कंपनी नवीन फोन लाँच करण्याच्या तयारीत आहे. कंपनी नवीन फोनवर काम करत आहे, जो पुढील जनरेशनचा iPhone SE 4 आहे. अनेक अपग्रेडेड फीचर्ससह iPhone SE 4 2025 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे. लाँच होण्यापूर्वीच SE 4 च्या वैशिष्ट्यांबद्दल अनेक डिटेल्स समोर आले आहेत. Apple ने 2022 पासून iPhone SE मॉडेल लाँच केलेले नाही. iPhone SE व्यतिरिक्त Apple नवीन iPads देखील लाँच करणार आहे.
हेदेखील वाचा- iPhone 16 Pro म्हणजे फक्त वेळेचा अपव्यय! टेक एक्झिक्युटिव्ह आदित्य अग्रवालचं वक्तव्य चर्चेत
iPhone SE संदर्भात बातमी आहे की हा नवीन iPhone होम बटणाशिवाय लाँच केला जाईल. Apple ने पहिल्यांदा iPhone SE लाँच केला तेव्हा त्यात आयफोनचे आयकॉनिक बटण होते. आतापर्यंत, आयफोन एसईचे दोन मॉडेल लाँच केले गेले आहेत आणि दोन्हीमध्ये होम बटण आहे, तर नियमित आयफोन मॉडेल आता होम बटणाशिवाय येत आहेत. असे सांगितले जात आहे की पुढील वर्षी लाँच होणाऱ्या iPhone SE मधून होम बटण हटवले जाईल आणि नवीन फोनची रचना iPhone 14 सारखी असेल. (फोटो सौजन्य -X)
अहवालानुसार, नवीन मॉडेलमध्ये फ्लॅट बाजूंसह OLED पॅनेल आणि वर एक नॉच असेल, जो iPhone 14 च्या डिझाइनप्रमाणे आहे. iPhone SE 4 मध्ये 6.1-इंचाचा डिस्प्ले असू शकतो, जो iPhone 14 सारखाच आहे. याचे रिझोल्यूशन 1170 x 2532 पिक्सेल आहे आणि कोडनेम V59 आहे.
आयफोन SE 4 मध्ये होम बटण टच आयडीसह बदलून फेस आयडी सादर केला जाईल. केवळ टॉप मॉडेलसाठी यात डायनॅमिक आयलंड फीचर देखील असेल. आयफोनमध्ये ॲपल इंटेलिजन्स फीचर्सही देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. परफॉर्मेंससाठी, यात 8GB रॅमसह A18 बायोनिक चिप असेल.
हेदेखील वाचा- मुकेश अंबानींची दिवाळी मेगा ऑफर, फक्त 12,483 रुपयांमध्ये घरी घेऊन जा iPhone 16
iPhone SE 4 मध्ये iPhone 15 आणि 15 Plus प्रमाणेच 48MP वाइड कॅमेरा आणि 12MP फ्रंट कॅमेरा असण्याची अपेक्षा आहे. तथापि, यात अल्ट्रा-वाइड किंवा टेलिफोटो लेन्स नसतील. यात Apple चे पहिले 5G मॉडेम असेल, ज्याचे कोडनेम सेंटॉरी असेल. हे Wi-Fi, ब्लूटूथ आणि GPS सारख्या वायरलेस कनेक्टिव्हिटी हाताळण्यासाठी डिझाइन केलेले आहे. iPhone SE 4 हा SE सीरीजचा पहिला iPhone असेल ज्यामध्ये तुम्हाला 48 मेगापिक्सेल कॅमेरा मिळेल. जर लीकवर विश्वास ठेवाला, तर iPhone SE 4 च्या मदतीने तुम्ही कमी प्रकाशात उत्कृष्ट फोटोग्राफी करू शकाल.
पुढील जनरेशनच्या iPhone SE 4 ची किंमत US$459 म्हणजेच अंदाजे 38,500 रुपये आणि US$499 म्हणजेच अंदाजे 42,000 दरम्यान असू शकते. अलीकडच्या काळात iPhone SE 4 ची खूप चर्चा होत आहे. आयफोनप्रेमी त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत.