iPhone 16 Pro म्हणजे फक्त वेळेचा अपव्यय! टेक एक्झिक्युटिव्ह आदित्य अग्रवालचं वक्तव्य चर्चेत
ॲपलच्या फ्लॅगशिप आयफोन 16 सीरीजची जगभरात क्रेझ आहे. आयफोन 16 सीरीज लाँच होताच खरेदीसाठी लोकांनी मोठी गर्दी केली होती. आयफोनच्या खरेदीसाठी अनेकजण 20 ते 22 तास रांगेत उभे होते. आयफोन 16 सीरीज अनेक अपग्रेडेड फीचर्स आणि ऍपल इंटेलिजन्ससह लाँच करण्यात आली आहे. अनेकांना हे नवीन फीचर्स प्रचंड आवडत आहेत. आयफोन 16 सिरीज लाँच झाल्यानंतर युजर्सना काही समस्यांचा सामना करावा लागला. iPhone 16 Pro मध्ये टच आणि स्क्रीन लॅग सारख्या समस्या निर्माण झाल्या. त्यामुळे युजर्सनी प्रचंड नाराजी व्यक्त केली.
हेदेखील वाचा- मुकेश अंबानींची दिवाळी मेगा ऑफर, फक्त 12,483 रुपयांमध्ये घरी घेऊन जा iPhone 16
अशातच आता iPhone 16 Pro म्हणजे फक्त वेळेचा अपव्यय, असं वक्तव्य टेक एक्झिक्युटिव्ह आदित्य अग्रवाल यांनी केलं आहे. त्यांचं हे वक्तव्य सध्या चांगलंच चर्चेत आहे. भारतात जन्मलेले टेक एक्झिक्युटिव्ह आदित्य अग्रवाल यांना ॲपलचा नवीनतम आयफोन फारसा आवडला नाही. याला त्यांनी ‘वेळेचा अपव्यय’ म्हटले आहे. याबाबत त्यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर एक पोस्ट देखील शेअर केली आहे. त्यांच्या या पोस्टला अनेक युजर्सनी मजेशीर रिप्लाय दिले आहेत. (फोटो सौजन्य – pinterest)
I “upgraded” from the iPhone 14 Pro to the iPhone 16 Pro. I literally cannot tell the difference. It took me 24 hours to set up the new phone properly etc. It just feels like a waste of time. And I do not understand where this “Apple Intelligence” is???? — Aditya Agarwal (@adityaag) October 3, 2024
आदित्य अग्रवालला नवीन iPhone 16 Pro चे फीचर्स फारसे आवडले नाहीत. अग्रवाल म्हणाले की, मी आयफोन 14 प्रो वरून आयफोन 16 प्रो वर अपग्रेड केले आहे आणि मला दोन्हीमध्ये काही फरक दिसत नाही. नवीन फोन योग्यरित्या सेट करण्यासाठी मला 24 तास लागले. वेळ वाया गेल्यासारखे वाटते. मला अद्याप ॲपलची ‘ॲपल इंटेलिजन्स’ समजलेली नाही. ते कशामुळे कार्य करते हे मला समजू शकत नाही.
हेदेखील वाचा- Amazon-Flipkart Sale 2024: Flipkart-Amazon सेलमधून iPhone विकत घेतला! पण MFNP तपासले का? नंतर पश्चाताप नको
आदित्य अग्रवाल यांनी फेसबुकवर प्रोडक्ट इंजिनिअरिंग डायरेक्टर म्हणून दीर्घकाळ काम केले. भारतात जन्मलेले एक्झिक्युटिव्ह जवळपास 6 वर्षे फेसबुकशी संबंधित होते. 2010 मध्ये गोव्यात अग्रवाल यांच्या लग्नाला फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्गही उपस्थित होते. त्याने ड्रॉपबॉक्समध्ये सीटीओ म्हणूनही काम केले आहे.
Apple ने iPhone 16 सिरीज लाँच केली आहे. या सिरीजअंतर्गत कंपनीने iPhone 16 (बेस मॉडेल), iPhone 16 Plus, iPhone 16 Pro आणि iPhone 16 Pro Max हे स्मार्टफोन लाँच करण्यात आले. Apple च्या नवीनतम iPhone 16 Pro मध्ये 6.3-इंचाचा LTPO सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे, जो 120 Hz च्या रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. यात A18 Pro बायोनिक चिपसेट आहे. 16 Pro मध्ये 48MP मुख्य कॅमेरा, 12MP पेरिस्कोप टेलीफोटो आणि 48MP अल्ट्रावाइड सेन्सर आहे. iPhone 16 Pro गडद काळा टायटॅनियम, ब्राइट व्हाइट टायटॅनियम, नॅचरल टायटॅनियम आणि न्यू डेझर्ट टायटॅनियम अशा चार आकर्षक रंगात लाँच करण्यात आला आहे.