मुकेश अंबानींची दिवाळी मेगा ऑफर, फक्त 12,483 रुपयांमध्ये घरी घेऊन जा iPhone 16
ई कॉमर्स फ्लॅटफॉर्म फ्लिपकार्ट आणि Amazon वर सेल सुरु झाला आहे. Flipkart च्या बिग बिलीयन डेज आणि Amazon च्या फेस्टिव सेलमध्ये आयफोनवर प्रचंड डिस्काऊंट देण्यात आलं आहे. या सेलमधून आयफोन खरेदी करणं ग्राहकांसाठी फायद्याचे ठरत आहे. सेलमध्ये ग्राहकांना iPhone 15 Pro, iPhone 15 Pro Max तसेच POCO स्मार्टफोन्सवर जबदस्त डिस्काऊंट मिळणार आहे. iPhone 15 Pro चे बेस व्हेरिएंट 89,999 किमतीत तुम्ही खरेदी करू शकता.
हेदेखील वाचा- फ्लिपकार्ट सेलमधून ऑर्डर केला iPhone 15, एका फोनसाठी आले दोन डिलीव्हरी बॉय! नेमकं प्रकरण काय
iPhone 15 Pro सोबत, iPhone 15 Pro Max देखील सेल दरम्यान 1,19,900 रुपयांच्या किमतीत उपलब्ध असणार आहे. या मॉडेलवर 5,000 रुपयांची बँक सूट आणि 5,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस देखील उपलब्ध आहे. ऑफरनंतर iPhone 15 Pro Max ची किंमत 1,09,999 रुपये असणार आहे. पण जर Amazon आणि Flipkart च्या सणासुदीच्या सेलमध्ये तुम्ही iPhone खरेदी करणे चुकवले असेल, तर आता तुमच्यासाठी एक नवीन ऑपर येत आहे. आता मुकेश अंबानी यांनी नवीनतम iPhone 16 वर एक उत्तम ऑफर आणली आहे. (फोटो सौजन्य – pinterest)
दिवाळीच्या आधी, रिलायन्स डिजिटलवर डिस्काऊंटसह iPhone 16 खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. बँक सवलतीसोबतच ॲपलचे नवीनतम मॉडेल विनाखर्च EMI वर खरेदी करण्याचीही संधी आहे. जर तुम्ही iPhone 16 खरेदी करण्याचा विचार करत असाल. यासाठी रिलायन्स डिजिटलने बेस्ट डीलची प्रतीक्षा संपली आहे.
Apple ने आपला नवीनतम iPhone 16 सप्टेंबर महिन्यात लाँच केला आहे. कंपनीने अनेक प्रगत फीचर्ससह नवीन मॉडेल बाजारात आणले आहे. हे मॉडेल मुकेश अंबानींच्या रिटेल चेन रिलायन्स डिजिटलमध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. त्याचा 128GB व्हेरिएंट 79,900 रुपयांच्या किंमतीला लाँच करण्यात आला आहे. रिलायन्स स्टोअरवर या फोनवर 5,000 रुपयांचे बँक डिस्काउंट उपलब्ध आहे. या सवलतीनंतर त्याची किंमत 74,900 रुपयांपर्यंत खाली येईल.
हेदेखील वाचा- कोणत्या देशात मिळणार सर्वात स्वस्त iPhone 16? जाणून घ्या प्रत्येक देशतील iPhone 16 ची किंमत
तुमच्याकडे ICICI, SBI किंवा कोटक बँकेचे क्रेडिट कार्ड असल्यास, तुम्ही 5000 रुपयांच्या झटपट डिस्काऊंटचा लाभ घेऊ शकता. या सवलतीनंतर किंमत 74,900 रुपये होईल. तुम्ही रिलायन्स डिजिटलवर विनाखर्च EMI सह फक्त 12,483 रुपयांच्या हप्त्यांमध्ये iPhone 16 घरी आणू शकता.
डिस्प्ले: iPhone 16 मध्ये 6.1-इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले आहे. यात डायनॅमिक आयलंड, फेस आयडी, 60 हर्ट्झ रिफ्रेश रेटसाठी सपोर्ट आहे. डिस्प्लेची कमाल ब्राइटनेस 2000nits आहे.
प्रोसेसर आणि स्टोरेज: Apple ने Lotus A18 चिपसेटसह iPhone 16 लाँच केला आहे. हा फोन तीन स्टोरेज पर्यायांमध्ये लाँच करण्यात आला आहे, ज्यामध्ये 128GB, 256GB आणि 512GB चा समावेश आहे.
कॅमेरा: iPhone 16 मध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48MP प्रायमरी कॅमेरा आहे. यात 12MP अल्ट्रा वाइड कॅमेरा लेन्स देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 12MP फ्रंट कॅमेरा सेन्सर फ्रंटला देण्यात आला आहे.
इतर वैशिष्ट्ये: हा फोन नवीनतम iOS 18 वर चालतो. ऍपलचा दावा आहे की त्याला धूळ आणि पाण्यापासून संरक्षणासाठी IP68 रेटिंग मिळाली आहे. फोनमध्ये Wi-Fi 7, NFC, Dolby Atmos आणि Spatial Audio सारखी वैशिष्ट्ये उपलब्ध आहेत.