Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

OpenAI वर गंभीर आरोप! Google आणि Meta सोबत शेअर केला जातोय यूजर्सचा वैयक्तिक डेटा? कंपनीवर खटला दाखल; नेमकं प्रकरण काय?

OpenAI वर यूजर्सचा वैयक्तिक डेटा Google आणि Meta सोबत शेअर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी कॅलिफोर्नियामध्ये कंपनीविरोधात खटला दाखल करण्यात आला असून, यूजर्सच्या प्रायव्हसीवर मोठे प्रश्न उपस्थित झाले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 16, 2026 | 11:27 AM
OpenAI वर गंभीर आरोप! Google आणि Meta सोबत शेअर केला जातोय यूजर्सचा वैयक्तिक डेटा? कंपनीवर खटला दाखल; नेमकं प्रकरण काय?

OpenAI वर गंभीर आरोप! Google आणि Meta सोबत शेअर केला जातोय यूजर्सचा वैयक्तिक डेटा? कंपनीवर खटला दाखल; नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:
  • OpenAI वर ChatGPT यूजर्सचा डेटा Google आणि Meta सोबत शेअर केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
  • खटल्यानुसार, Meta Pixel आणि Google Analytics सारख्या ट्रॅकिंग टूल्सचा वापर केला जात होता.
  • या आरोपांमुळे AI चॅटबोट्स वापरणाऱ्या करोडो यूजर्सच्या प्रायव्हसीबाबत चिंता वाढली आहे.
AI कंपनी OpenAI वर आता एक गंभीर आरोप करण्यात आला आहे, यामुळे आता कंपनीवर खटला देखील दाखल करण्यात आला आहे. यामध्ये कंपनीवर असा आरोप करण्यात आला आहे की, चॅटजीपीटीचा वापर करणाऱ्या यूजर्सचा डेटा त्यांच्या स्पष्ट परवानगिशिवाय गुगल आणि मेटासोबत शेअर केला जात आहे. दाखल करण्यात आलेल्या खटल्यामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, चॅटजीपीटीला विचारले जाणारे प्रश्न, ईमेल एड्रेस आणि इतर खाजगी माहिती ट्रॅकिंग टूल्सद्वारे या कंपन्यांपर्यंत पोहोचवली जात आहे. हा खटला कॅलिफोर्नियाच्या फेडरल कोर्टात दाखल करण्यात आला आहे.

WhatsApp Update: iPhone यूजर्सची प्रायव्हसी वाढणार! मेसेज वाचताच आपोआप होणार डिलीट, सुरु झाली नव्या फीचरची चाचणी

चॅटजीपीटीवर हा डेटा शेअर करण्याचा आरोप

दाखल करण्यात आलेल्या खटल्यानुसार, चॅटजीपीटी वेबसाईटवर असे ट्रॅकिंग टूल्स लावण्यात आले होते, जे यूजर्सच्या अ‍ॅक्टिव्हिटी रेकॉर्ड करत होते. यामध्ये मेटा पिक्सेल आणि गूगल ॲनालिटिक्स सारखे टूल्स समाविष्ट असल्याचा देखील दावा करण्यात आला आहे. असा आरोप करण्यात आला आहे की, या टूल्सद्वारे यूजर्सची माहिती आपोआप गुगल आणि मेटापर्यंत पाठवली जात होती. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप ओपनएआयने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. (फोटो सौजन्य – Pinterest) 

यूजर्सच्या प्रायव्हसीवर प्रश्न

दाखल करण्यात आलेल्या खटल्यामध्ये असं म्हटलं आहे की, आज असे अनेक लोकं आहेत, जे AI चॅटबोट्सना त्यांच्या वैयक्तिक सल्लागाराप्रमाणे मानतात. यूजर्स एआय चॅटबोटसोबत आरोग्याविषयीचे प्रश्न, कायदेशीर बाबी, आर्थिक प्रकरणे आणि वैयक्तिक समस्या देखील शेअर करतात. याच कारणामुळे यूजर्सना अशी आशा असते की, त्यांची माहिती सुरक्षित राहावी आणि कोणासोबत शेअर केली जाऊ नये. मात्र आता करण्यात आलेल्या आरोपानंतर एआय चॅटबोट्सचा वापर करणाऱ्या यूजर्सच्या प्रायव्हसीवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण हा प्रश्न करोडो लोकांच्या प्रायव्हसी आणि सुरक्षेचा आहे.

Instagram चं नवं Instants बनलंय डोक्याला ताप? कसं कराल बंद? फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस

ट्रॅकिंग सिस्टिम कशी काम करते?

मेटा पिक्सेल आणि गूगल ॲनालिटिक्स सारख्या टूल्सचा वापर वेबसाईटवरील ट्रॅफिक समजण्यासाठी आणि जाहिराती पाहण्यासाठी केला जातो. या टूल्समुळे समजत की, यूजर्स काय पाहत आहेत आणि यूजर्सना कोणत्या गोष्टीमध्ये जास्त आवड आहे. उदाहरणार्थ, जर कोणी इंटरनेटवर नवीन टीव्ही सर्च केलं आणि नंतर त्याला वेगवेगळ्या वेबसाइटवर टीव्हीच्या जाहिराती दिसू लागतात, तर अनेकदा अशाच प्रकारच्या ट्रॅकिंग सिस्टीम कार्यरत असतात. कंपनीवर करण्यात आलेले आरोप खरे सिद्ध झाले, तर याचा अर्थ असा होईल की, ChatGPT वर विचारलेल्या प्रश्नांचा वापर लोकांना टारगेटेड जाहिराती दाखवण्यासाठी केला गेला.

Web Title: Is openai sharing users personal data with google and meta lawsuit filed against the company read in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 16, 2026 | 11:27 AM

Topics:  

  • chatgpt
  • google
  • openai

संबंधित बातम्या

ChatGPT वापरत असाल तर लक्ष द्या! सुरक्षेवरून मोठा वाद, OpenAI विरोधात कोर्टात धाव
1

ChatGPT वापरत असाल तर लक्ष द्या! सुरक्षेवरून मोठा वाद, OpenAI विरोधात कोर्टात धाव

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स
2

फोल्डेबल फोन पाहिजे, पण बजेट कमी? 3 लाखांच्या iPhone Duo पेक्षा हे आहेत स्वस्त पर्याय; खरेदीपूर्वी जाणून घ्या फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.