WhatsApp Update: iPhone यूजर्सची प्रायव्हसी वाढणार! मेसेज वाचताच आपोआप होणार डिलीट, सुरु झाली नव्या फीचरची चाचणी
WABetaInfo च्या एका ब्लॉग पोस्टमध्ये शेअर केलेल्या माहितीनुसार, हे फीचर अॅपलच्या टेस्टफ्लाइट प्रोग्रामद्वारे व्हॉट्सअॅप बीटा iOS वर्जन 26.19.10.72 चालवणाऱ्या काही यूजर्ससाठी उपलब्ध आहे. मोठ्या रोलआऊटपूर्वी अॅप स्टोअर वर्जन वापरणाऱ्या मर्यादित यूजर्सना देखील हा पर्याय दिसू शकतो. (फोटो सौजन्य – Pinterest)
रिपोर्टनुसार, हे नवीन फीचर व्हॉट्सअॅपच्या डिसअपीयरिंग मेसेज कंट्रोल्सअंतर्गत आफ्टर रिडींग ऑप्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. हे फीचर यूजर्सना त्वरित काउंटडाउन सुरु करण्याऐवजी रिसीवरने मेसेज वाचल्यानंतर तो डिलीट करण्याचा पर्याय देतो. यूजर्स मेसेज वाचल्यानंतरचा टाईमर पाच मिनिटे, एक तास किंवा 12 तासांवर सेट करू शकतात. जर रिसीव्हरने मेसेज ओपन केला नाही तर व्हॉट्सअॅप 24 तासानंतर मेसेज आपोआप डिलीट करणार आहे. हे नवीन फीचर व्हॉट्सअॅपमध्ये आधीपासूनच उपलब्ध असलेल्या डिसअपीयरिंग मेसेज सिस्टिमसोबत मिळून काम करते. डिसअपीयरिंग मेसेज सिस्टिममध्ये सध्या 24 तास, 7 दिवस आणि 90 दिवसांचा टाईमर देण्यात आला आहे. यूजर्स या सेटिंगचा वापर इंडिविजुअल चॅट्सवर करू शकता किंवा हे फीचर सर्व नवीन संभाषणासाठी डिफॉल्ट स्वरुपात सेट करू शकतात.
Instagram चं नवं Instants बनलंय डोक्याला ताप? कसं कराल बंद? फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस
हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे की नवीन टायमर ऑप्शनल असल्याचे म्हटले जात आहे आणि तो मॅन्युअली चालू करावा लागेल, तसेच जोपर्यंत यूजर्स हे फीचर चालू करत नाहीत, तोपर्यंत सध्याचे चॅट्स पूर्वीप्रमाणेच काम करतील. पोस्टमध्ये असं देखील सांगण्यात आलं आहे की, निवडलेल्या टायमरनुसार सेंडरच्या बाजूची मेसेजची प्रत डिलीट केली जाऊ शकते, तर मेसेज वाचल्यानंतरच रिसीवरसाठी काउंटडाउन सुरू होईल. हे फीचर सर्व यूजर्ससाठी कधी उपलब्ध होईल हे व्हॉट्सॲपने अद्याप जाहीर केलेले नाही, परंतु येत्या काही आठवड्यांत ते अधिक बीटा टेस्टर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.






