Instagram चं नवं Instants बनलंय डोक्याला ताप? कसं कराल बंद? फॉलो करा स्टेप बाय स्टेप प्रोसेस
फोटो शेअरिंगचा गेम बदलणार? Instagram च्या Instants अॅपची सर्वत्र चर्चा, Snapchat ला टक्कर देणार?
इंस्टाग्राम पॉप-अप नोटिफिकेशनद्वारे इंस्टंटबाबत माहिती देत आहे. इंस्टाग्राम इनबॉक्समध्ये इंस्टंट एक मिनी फोटो स्टॅकप्रमाणे दिसत आहे. या मिनी फोटो स्टॅकवर टॅप केल्यानंतर यूजर्सना नव्या फीचरबाबत माहिती शेअर केली जात आहे. जसे की, फीचर कसे काम करते, इत्यादी. इंस्टंट ओपन केल्यानंतर तुम्हाला कॅमेऱ्याच्या खालील बाजूला एक शटर बटन दिसणार आहे आणि त्याखाली तुम्ही फ्रेंड्स आणि क्लोज फ्रेंड्सपैकी एक पर्याय निवडू शकता. इंस्टंट बाय डिफॉल्ट फ्रेंड्सवर सेट करण्यात आले आहे. जेव्हा तुम्ही शटर बटनवर क्लिक करता, त्यावेळी कॅप्चर झालेला फोटो तुमच्या मित्रांकडे पाठवला जातो. जर तुम्ही क्लोज फ्रेंडसोबत फोटो शेअर करत असाल तर तुम्हाला मॅन्युअल क्लोज फ्रेंड निवडावी लागणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
इंस्टाग्रामने इंस्टंटद्वारे फोटो पाठवण्याची प्रोसेस स्पष्ट केली नाही. त्यामुळे यूजर्स इंस्टाग्रामवरील फ्रेंड लिस्टमधील अशा लोकांसोबत देखील फोटो शेअर करत आहेत, ज्यांच्यासोबत त्यांना फोटो शेअर करायचे नाहीत. यामध्ये अनडू चा पर्याय देखील देण्यात आला आहे. मात्र हा पर्याय जोपर्यंत समोरील यूजर तुम्ही पाठवलेला फोटो ओपन करत नाही, तोपर्यंतच काम करतो. अनेक यूजर्सनी तक्रार केली आहे की, त्यांना समजत देखील नाही की इंस्टंटमध्ये फोटो कधी शेअर केला जातो. यामुळे यूजर्सचा मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला आहे. अनेकजण आता हा पर्याय बंद करण्याचा मार्ग शोधत आहेत.
Jio vs Airtel: किंमत एकच पण फायदे वेगळे… व्हॅलिडीटी अन् डेटासह कोण ठरणार खरा किंग? जाणून घ्या
इंस्टाग्राममध्ये इंस्टंट बंद करण्यासाठी सर्वात आधी तुमच्या प्रोफाईलवर जा आणि स्क्रीनच्या वरच्या उजव्या बाजूला दिसणाऱ्या थ्री-लाइन मेनूवर टॅप करा. आता सेटिंग ओपन करा. आता कंटेट प्रेफरेंस सेक्शनमध्ये जा. इथे तुम्हाला “Hide Instants in Inbox” पर्याय दिसेल. आता यासमोरील टॉगल ऑन करा. आता तुम्हाला इनबॉक्समध्ये इंस्टंट पाहायला मिळणार नाही. लक्षात ठेवा की, टॉगल ऑन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मित्रांकडून देखील इंस्टंट पाठवले जाणार नाहीत.






