Tech Tips: तुमची Smart TV ही देतेय का हे संकेत? चला तर मग आता डिव्हाईस बदलण्याची वेळ आली आहे...
तुमचे आवडते शो आणि सिरीज बघण्यापासून अगदी गेम खेळण्यापर्यंत स्मार्ट टिव्ही तुमच्यासाठी बरीच फायद्याची आहे. पण जर ही स्मार्ट टिव्ही बिघडली तर आपण वैतगतो. लोकं वर्षानुवर्षे एकचं टिव्ही वापरतात आणि नवीन टिव्ही खरेदी करण्याचा विचार देखील करत नाहीत. पण तुमची टिव्ही जेव्हा काही संकेत देते, तेव्हा तुम्ही समजलं पाहिजे की आता नवीन टिव्ही खरेदी करण्याची वेळ आली आहे.
नवीन टिव्ही नक्की कधी खरेदी करावा याबाबत अनेकांना माहिती नसतं, त्यामुळे नवीन टिव्ही खरेदी केल्यानंतर अनेक लोकं पश्चाताप करतात. अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला असे काही संकेत सांगणार आहोत, जर तुम्हाला ते तुमच्या टिव्हीवर दिसू लागले तर तुम्ही समजून घ्यावे की टीव्ही बदलण्याची वेळ आली आहे. चला जाणून घेऊया अशा 4 संकेतबाबत, जे सांगतात की आता तुमच्या स्मार्ट टीव्हीला रिटायर करण्याची वेळ आली आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
जर तुमच्या स्मार्ट टिव्हीच्या स्क्रीनवर रेषा, रंग असंतुलन किंवा अचानकपणे डिमिंग आणि फ्लिकरिंग दिसत असेल तर तुमची टिव्ही तुम्हाला संकेत देत आहे की तिला रिटायर करण्याची हीच योग्य वेळ आहे. विशेष करून OLED टिव्हीमध्ये डिमिंग याचा अर्थ त्याचे डाइओड्स हळूहळू खराब होत आहेत. स्क्रीन पूर्णपणे खराब होण्यापूर्वी टीव्ही बदलणे चांगले होईल.
जर तुमच्या टिव्हीचा मेन्यू खूप स्लो झाला असेल, अॅप्स योग्य प्रकारे ओपन होत नसतील किंवा इनपूट बदलण्यात समस्या येत असतील याचा अर्थ तुमच्या स्मार्ट टिव्हीचा सॉफ्टवेअर खराब किंवा स्लो झाला आहे. अशा परिस्थितीत, तुम्ही टीव्ही अपडेट्ससाठी नक्कीच तपासावे किंवा फॅक्टरी रीसेट करावे. जर तरीही कोणतीही सुधारणा झाली नाही, तर ते हार्डवेअर नवीन वैशिष्ट्यांना समर्थन देऊ शकत नाही याचे लक्षण आहे. जर कंपनीने सुरक्षा अपडेट्स देणे बंद केले असेल, तर ही आणखी गंभीर बाब आहे. यामुळे टिव्हीमध्ये अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. त्यामळे अशा परिसस्थिती टिव्ही बदलण्याचा निर्णय योग्य ठरतो.
जर तुमचा टिव्ही गेमिंग कंसोल, पीसी किंवा नवीन मीडिया स्ट्रीमर्ससह योग्य प्रकारे काम करत नसेल, जसं की हाय रिफ्रेश रेट, VRR किंवा HDMI 2.1 ची कमी असेल, तर अशा परिस्थितीत तुम्ही नवीन अनुभव घेऊ शकत नाही. इनपुट लॅग किंवा स्क्रीन फाटणे यासारख्या समस्या देखील याचा परिणाम आहेत. तुमची टिव्ही देखील असे संकेत देत असेल तर समजून जा की टिव्ही बदलण्याची वेळ आली आहे.
जर तुमच्या टिव्हीची साऊंट क्वालिटी बिघडू लागली असेल, पॉपिंग साउंड किंवा डिस्टॉर्शन हे इंटरनल ऑडिओ सिस्टम बिघाड झाल्याचे लक्षण असू शकते. जर तुमच्याकडे नवीन स्पीकर सिस्टीम असेल पण टीव्ही त्याच्याशी सुसंगत नसेल तर नवीन टीव्ही खरेदी करणे हा एक चांगला पर्याय असेल.
TV चा फुल फॉर्म काय आहे?
टेलिव्हिजन
TV वेळोवेळी अपडेट करणं गरजेचं आहे का?
हो
TV खरेदी करण्यापूर्वी कोणत्या गोष्टी चेक कराव्या?
साऊंट क्वालिटी, रिफ्रेश रेट, टिव्हीचा सॉफ्टवेअर