फोटो सौजन्य - JIO
Reliance Jio ने त्यांच्या Jio Bharat सिरीज अंतर्गत भारतात नवीन 4G फोन लाँच केला आहे. यापूर्वी कंपनीने Jio Bharat V2, V2 Karbon लाँच केले होते. यानंतर कंपनीने Jio Bharat B1 देखील लाँच केला होता. आता Jio Bharat सिरीज अंतर्गत Jio Bharat J1 4G लाँच करण्यात आला आहे. Reliance Jio चा कीपॅड असलेला नवीन 4G फोन आहे.
Jio Bharat J1 4G हा 4G कीपॅड फोन आहे, जो नवीन डिझाइन आणि फीचर्ससह लाँच करण्यात आला आहे. जिओ ॲपच्या सर्व सेवा या फोनमध्ये उपलब्ध आहेत. याशिवाय, Jio Bharat J1 4G मध्ये UPI व्यवहारांसाठी JioPay, लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी JioCinema चा पर्याय देखील आहे. त्यामुळे हा कीपॅड फोन युजर्सना नक्कीच एक चांगला अनुभव देणार आहे.
हेदेखील वाचा – Motorola लाँच करणार जगातील सर्वात स्लिम फोन; कंपनीने X वर जारी केला टिझर
Jio Bharat सिरीज अंतर्गत लाँच करण्यात आलेल्या आधीच्या फोनच्या तुलनेत Jio Bharat J1 4G ह्या फोनची किंमत अधिक आहे. Jio Bharat J1 4G भारतात 1799 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा फोन ग्राहकांना सिंगल ब्लॅक/ग्रे कलर ऑप्शनमध्ये उपलब्ध असेल. युजर्स हा फोन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म असलेल्या Amazon वरून खरेदी करू शकतात. कमी बजेट आणि उत्कृष्ट फीचर्समुळे Jio Bharat J1 4G ग्राहकांच्या पसंतीस उतरू शकतो.
हेदेखील वाचा – Microsoft युजर्सवर पुन्हा एकदा CrowdStrike अटॅक होण्याची शक्यता; कंपनीकडून अलर्ट जारी
Jio Bharat J1 4G नवीन डिझाइनसह लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 2.8 इंचाचा डिस्प्ले आहे. यामध्ये 2,500mAh ची मोठी बॅटरी आहे. मोठ्या बॅटरी आणि मोठ्या स्क्रीनमुळे 4G फीचर फोन कमी बजेट असलेल्या लोकांसाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. या फोनमधील जिओ टीव्हीच्या मदतीने लोक आरामात टीव्ही पाहू शकतात.
फोन खरेदी करण्यापूर्वी ग्राहकांनी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, Jio Bharat J1 4G हे लॉक केलेले डिव्हाइस आहे. म्हणजेच यामध्ये फक्त जिओ सिम वापरता येणार आहे. Jio Bharat J1 4G मध्ये युजर्सना JioCinema, Jio TV, JioPay, यासांरख्या अॅप्स वापरता येणार आहे. तसेच युजर्स या फोनमध्ये Jio चे इतर काही अॅप्स देखील वापरू शकतील. युजर्स jioCinema आणि Jio TV वर लाईव्ह कंटेट पाहू शकतात.