फोटो सौजन्य - pinterest
जगभरातील Microsoft युजर्स कधीही 19 जुलैचा दिवस विसरू शकत नाहीत, कारण ह्या दिवशी Microsoft विंडोज वर चालणारे जगभरातील लॅपटॉप आणि कंम्युटर ब्लू स्क्रीन ऑफ डेथला (बीएसओडी) बळी पडले होते. Microsoft विंडोजवर काम करणारे सर्व लॅपटॉप आणि कंम्युटर अचानक क्रॅश झाले होते. युजर्सना त्यांच्या लॅपटॉप आणि कंम्युटरवर एक निळ्या रंगाची स्क्रिन दिसत होती. ज्यामध्ये सांगितलं जात होतं की, तुमचा संगणक अडचणीत आहे आणि रीस्टार्ट करणे आवश्यक आहे. त्यामुळे अनेक कामं ठप्प झाली होती. विमानतळ, रुग्णालय, बँका, सरकारी कार्यालये कंपन्यामधील अनेक ठप्प झाली होती. इंडिगो एअरलाइन्सची सुमारे 200 उड्डाणे रद्द करण्यात आली. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. Microsoft डाऊनचा परिणाम ब्रिटनमध्ये देखील झाला होता. ब्रिटनमधील स्काय न्यूज चॅनेल बंद झालं होतं.
हेदेखील वाचा – CrowdStrike च्या ‘या’ कर्मचाऱ्यामुळे झाला होता जगावर परिणाम? एक अपडेट आणि कामं झाली होती ठप्प
Microsoft डाऊनचा जगभरात परिणाम झाला होता. या घटनेनंतर मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नडेला यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलं होतं की, CrowdStrike ने एक अपडेट जारी केलेल्या अपडेटमुळे जगभरातील Microsoft युजर्सवर परिणाम झाला आहे. या घटनेनंतर आता कंपनीने पुन्हा एकदा एक अलर्ट जारी केलं आहे. कंपनीने म्हटलं आहे की, CrowdStrike अटॅक भविष्यात पुन्हा होण्याची शक्यता आहे. हा अटॅक थांबवता येणार नाही. Microsoft ने जारी केलेल्या या अलर्टमुळे जे युजर्स किंवा ज्या मोठ्या कंपन्या केवळ Microsoft सिस्टमवर अवलंबून आहेत, त्यांना काळजी घेणं गरजेचं आहे.
हेदेखील वाचा – मायक्रोसॉफ्ट विंडोज सर्व्हर डाऊन प्रकरणी सीईओ सत्या नडेला यांचं मोठं वक्तव्य; X वर शेअर केली पोस्ट
जगभरातील अनेक कंपन्या केवळ Microsoft सिस्टमवर अवलंबून आहेत. या कंपन्यांची सर्व कामं Microsoft सिस्टमव्दारे केली जातात. यामध्ये बँका, विमानसेवा, दवाखाने, सरकारी कार्यालये अशा अनेकांचा समावेश आहे. 19 जुलै रोजी जेव्हा अचानक Microsoft सिस्टम क्रॅश झाली होती, तेव्हा या कंपन्यांकडे कोणताही इतर पर्याय नव्हता, त्यामुळे या कंपन्यांची कामं ठप्प झाली. विमानतळावर हस्तलिखित बोर्डिगं पास देण्यात आले होते.
Microsoft सिस्टम डाऊनमुळे सुमारे 200 उड्डाणे रद्द करण्यात आली होती. याचा प्रवाशांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला होता. त्यामुळे जर भविष्यात पुन्हा Microsoft सिस्टम क्रॅश झालं किंवा या सिस्टमवर CrowdStrike अटॅक झाला तर अनेक कामं ठप्प होऊ शकतात. जग थांबणार नाही, पण जगभरातील निम्मी कामं नक्कीच ठप्प होतील. Microsoft च्या या अलर्टनंतर संशोधकांनी देखील चिंता व्यक्त केली आहे. Microsoft ने त्यांच्या प्रत्येक स्थरावर बारकाईने लक्ष देणं गरजेचं आहे. 19 जुलै रोजी CrowdStrike वर सायबर अटॅक झाल्यामुळे जभरातील Microsoft विंडोज वर चालणारे जगभरातील लॅपटॉप आणि कंम्युटर ब्लू स्क्रीन ऑफ डेथला (बीएसओडी) बळी पडले होते, असं सांगितलं जात होतं. पण CrowdStrike या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला आहे.